Bhavishya
Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १७ मार्च २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार : फाल्गुन शुद्ध ४, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ९.०६, चंद्रास्त रात्री १०.०३, सूर्योदय ६.४२, सूर्यास्त ६.४३, विनायक चतुर्थी, भारतीय सौर फाल्गुन २६ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८६३ : भारतातील अत्यंत कर्तबगार व सुधारणावादी संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांचा कवळाणे (जि. नाशिक) येथे जन्म. पडदा पद्धती, बालविवाह, कन्याविक्रय, अस्पृश्‍यता यांना बंदी करणारे कायदे केले. विधवा विवाहाला संमती दिली.
१९०९ : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्यापंडित डॉ. रा.ना.दांडेकर यांचा जन्म. तीसहून अधिक पुस्तकं आणि पाचशेहून अधिक शोधनिबंध मिळून कित्येक हजार पानांत  समावलेली, त्यांच्या लेखणीतून उतरलेली ‘भारतविद्या’ हा आदर्श संशोधन पद्धतीचा वस्तुपाठ म्हणून भविष्याच्या हाती आलेला अमूल्य ठेवा आहे.
१९३७ : प्रसिद्ध मराठी कवी व बडोदा संस्थानचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचे निधन. चंद्रिका हा त्यांचा संग्रह प्रसिद्ध आहे. मिल्टनच्या काव्याची त्यांनी रुपांतरे केली आहेत.
१९७१ : सुप्रसिद्ध सनईवादक शंकरराव गायकवाड यांचे निधन.

दिनमान -
मेष :
आर्थिक सुयश लाभेल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.
मिथुन : काहींचे वैचारिक व बौद्धिक परिवर्तन होईल. मनोबल उत्तम राहील.
कर्क : मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.
सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.
तुळ : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
धनु : प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मकर : महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. नोकरीत प्रगती होईल.
कुंभ : आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मीन : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT