Horoscope and Astrology
Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 18 जुलै 2021

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : आषाढ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय दुपारी १.३०, चंद्रास्त रात्री १.२०, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१२, तिशाबी आव (ज्यू), भारतीय सौर आषाढ २७ शके १९४३.

दिनविशेष -

१९०९ - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि प्रख्यात बंगाली कवी विष्णू डे यांचा जन्म. बंगालीखेरीज त्यांनी इंग्रजीतही आठ-दहा ग्रंथ लिहिले.

१९६९ - विख्यात कादंबरीकार शाहीर अण्णा भाऊ साठे यांचे निधन. त्यांच्या ‘फकिरा’ व ‘वारणेचा वाघ’ वगैरे कादंबऱ्या खूप गाजल्या.

१९८० - भारताने ‘एसएलव्ही-३’ या अवकाशयानाद्वारे रोहिणी (आरएस-१) हा उपग्रह अंतराळात सोडला. या यशामुळे भारत हा उपग्रह सोडण्याची क्षमता असलेला जगातील सहावा देश ठरला.

१९८९ - ख्यातनाम संस्कृतज्ञ आणि पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे माजी संचालक डॉ. गोविंद केशव भट यांचे निधन. संस्कृत, इंग्रजी आणि मराठी या तीन भाषांमधील त्यांनी लिहिलेले सुमारे पाऊणशे ग्रंथ प्रकाशित आहेत.

१९९४ - ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’चे अध्यक्ष मुनीस रझा यांचे अमेरिकेत निधन. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरुपदही त्यांनी सांभाळले होते.

१९९४ - ‘शूमेकर लेव्ही-९’ या धूमकेतूचा सर्वांत मोठा ‘जी’ हा तुकडा विशाल गुरू ग्रहावर आदळला. या स्फोटाने जगातील सर्व अण्वस्त्रांपेक्षा जास्त ऊर्जा मुक्त झाली व पृथ्वीच्या आकाराचे काळे डाग गुरू ग्रहावर निर्माण झाले.

१९९५ - जनता दलाचे नेते व मालेगाव येथील आमदार निहाल अहमद यांना १९९४ चे ‘नॅशनल प्रेस ॲवॉर्ड’ जाहीर. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना नॅशनल प्रेस ऑफ इंडियातर्फे हा पुरस्कार दिला जातो.

१९९६ - उद्योगपती गोदरेज यांना जपान सरकारतर्फे ‘दी ऑर्डर ऑफ राईझिंग सन, गोल्ड रेज अँड नेक रिबन पुरस्कार’ प्रदान.

२००१ - सांगलीच्या राजमाता पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन यांचे निधन.

२००३ - पुलित्झर पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध लेखिका कॅरोल शिल्ड्‌स यांचे निधन. स्वतःचाच शोध घेणाऱ्या एका महिलेच्या जीवनकहाणीवर आधारित ‘द स्टोन डायरीज’ हे त्यांचे पुस्तक १९९३ मध्ये खूप गाजले. याच पुस्तकाला पुलित्झर पुरस्कार आणि कॅनडाच्या गव्हर्नर जनरलचा साहित्यविषयक पुरस्कारही मिळाला होता.

दिनमान -

मेष : वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आध्यात्माकडे कल राहील.

वृश्‍चिक : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

धनू : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.

मकर : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ : गुरुकृपा लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

मीन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT