Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १९ जुलै

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार - आषाढ कृ. १६, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय प. ४.२९, चंद्रास्त सायं. ६.१५, भारतीय सौर २८, शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१७४५ - पहिल्या बाजीरावाचे खंदे सहकारी आणि शिंदे-होळकर म्हणून गाजलेल्या जोडीतील पराक्रमी वीर पुरुष राणोजी शिंदे यांचे निधन.
१९३८ - खगोलशास्त्र व खगोलभौतिकी या क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म. १९६४ मध्ये केंब्रिजमधील शास्त्रज्ञ प्रा. फ्रेड हॉईल यांच्यासमवेत संशोधन करून त्यांनी गुरुत्वाकर्षणासंदर्भातील एक नवा सिद्धांत मांडला. 
१९४७ - म्यानमारमधील (ब्रह्मदेश) नेते उपाध्यक्ष आँग सान यांची रंगून येथे हत्या. सध्या ब्रह्मदेशातील (म्यानमारमधील) हुकूमशाहीविरोधी लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या आँग सान सू क्‍यी या त्यांच्या कन्या होत.
१९६९ - देशातील चौदा मोठ्या बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा वटहुकूम जारी. राष्ट्रीयीकरणानंतर भारतात ज्या वेगाने बॅंकिंग उद्योगाची भरभराट झाली, ती जगातही अपूर्व स्वरूपाची होती.
१९९२ - ज्येष्ठ उर्दू कवी मजरुह सुलतानपुरी यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे इक्‍बाल सन्मान पुरस्कार प्रदान.
१९९३ - ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी डॉ.बानू कोयाजी यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना समाजसेवेसाठीचा ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर.
१९९५ - सोलापूर आणि पुणे येथे रुग्णोपयोगी साहित्य संग्रहित करुन गरजूंना उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमाचे संस्थापक द. प्र. भावे ऊर्फ भावे गुरुजी यांचे निधन.
१९९८ - बोस्टन (अमेरिका) येथे झालेल्या अमेरिकन खुल्या कॅरम स्पर्धेत पुण्याच्या डॉ.अमित केळकरने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकाविले.
१९९९ - दक्षिण आफ्रिकेच्या पेन्नी हेन्सने महिलांच्या २०० मीटर बॅंकस्ट्रोक, सहाव्या जेनेट इव्हान आमंत्रित जलतरण स्पर्धेत विश्‍वविक्रम नोंदविला. तिने ही शर्यत २ मिनिटे २४.५१ सेकंदांत पूर्ण केली.

दिनमान -
मेष :
उत्साह, उमेद वाढेल. अनेक कामे हातावेगळी करण्यात यश लाभेल.
वृषभ : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. आर्थिक प्रगती होईल. मानसिक उत्साह वाढेल.
मिथुन : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
कर्क : खर्च वाढणार आहेत. एखादी मानसिक चिंता त्रास देईल.
सिंह : अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. कामे मार्गी लागतील.
कन्या : व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.
वृश्‍चिक : कामात अडचणी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही.
धनु : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. नवीन परिचय होतील. मानसिक उत्साह वाढेल.
मकर : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. अडचणी जाणवणार आहेत.
कुंभ : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. व्यवसायात स्थिती उत्तम राहील.
मीन : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सार्वजनिक कामात यश लाभेल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT