Astrology and Horoscope
Astrology and Horoscope Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 19 मे 2021

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : वैशाख शुद्ध ७, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६, सूर्यास्त ७.०१, चंद्रोदय दुपारी १२.०४, चंद्रास्त रात्री १.२०, बुधाष्टमी, भारतीय सौर वैशाख २९ शके १९४३.

दिनविशेष -

१९०४ : आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार आणि टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे निधन.

१९१३ : भारताचे सहावे राष्ट्रपती व स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म.

१९३८ : ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचा जन्म. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला आहे.

१९६१ : संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते, साम्यवादाचे आणि योगशास्त्राचे गाढे अभ्यासक कॉम्रेड विष्णुपंत चितळे यांचे निधन.

१९६९ : प्रसिद्ध इतिहास व पुराणसंशोधक आबा चांदोरकर यांचे निधन. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग मार्तंड चांदोरकर. पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळात संशोधक म्हणून काम करीत असताना त्यांनी ‘शिवशाहीचा लेखनालंकार’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. ते ताम्रपटांचे संशोधन करण्यात व महानुभाव लिपीचा अर्थ लावण्यात तज्ज्ञ होते.

दिनमान -

मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.

वृषभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मिथुन : अचानक धनलाभ संभवतो. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : नवीन परिचय होतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

तुळ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

धनु : अचानक धनलाभाची शक्यता आहे. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मकर : कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील.

कुंभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मीन : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. हितशत्रुंवर मात कराल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT