सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 24 डिसेंबर

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध १०, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ७.०४ सूर्यास्त ६.०३, चंद्रोदय दुपारी २.०४, चंद्रास्त रात्री २.४८, भारतीय सौर पौष ३ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९९ - नामवंत मराठी लेखक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचा जन्म. त्यांनी पन्नासांहून अधिक पुस्तके लिहिली असून त्यातील अनेक पुस्तकांच्या लाखापेक्षा जास्त प्रती खपल्या आहेत. त्यांचे ‘श्‍यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे.
२००१ - ज्येष्ठ चित्रकार व कलाध्यापक अरुण श्रीपाद फडणीस यांचे निधन.
२००३ - मराठीतील ज्येष्ठ समीक्षक, कादंबरीकार त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्यासह कमलेश्‍वर, प्रफुल्ल रॉय, सारा जोसेफ, ज्येष्ठ तमीळ कवी वैरमुथू आणि समीक्षक के. व्ही सुब्बण्णा यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या ‘डांगोरा एकानगरीचा’ या पुस्तकाला हा पुरस्कार घोषित झाला.

दिनमान -
मेष :
आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
वृषभ : मनोबल कमी राहील. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.अचानक धनलाभ संभवतो.
मिथुन : वैचारिक व बौद्धिक परिवर्तन होईल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.
कर्क : सामाजिक व राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मान व प्रतिष्ठा लाभेल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
कन्या : दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
तुळ : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक सौख्य लाभेल.
वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आरोग्य उत्तम राहील.
मकर : व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार मार्गी लावू शकाल. नोकरीत प्रगती होईल.
कुंभ : आत्मविश्‍वास वाढेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.
मीन : प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News : ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT