Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २५ जून

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार - आषाढ शु. ४, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय स. ९.३७, चंद्रास्त रा. १०.५८, भारतीय सौर ४, शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८३८ - प्रसिद्ध बंगाली कादंबरीकार बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतील ‘वंदे मातरम’ या गीताचा स्वातंत्र्यलढ्यात मोठाच परिणाम झाला होता. 
१८७९ - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर विल्यम फॉदरगिल कक यांचे निधन. हायडेलबर्ग येथे असताना त्यांनी तारेच्या साह्याने संदेशवहन करण्याचे प्रात्यक्षिक पाहिले व त्यामुळे विद्युत तारायंत्र करण्याकडे त्यांचे लक्ष वेधले.
१९१८ - कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
१९३१ - भारताचे सातवे पंतप्रधान विश्वनाथप्रताप सिंह यांचा जन्म.
१९३४ - महात्मा गांधींना पुणे महापालिकेने मानपत्र दिले, त्या वेळी त्यांच्यावर बाँबहल्ल्याचा प्रयत्न.
१९७९ - हवेली तालुक्‍याचे शिल्पकार, पिंपरी-चिंचवड पालिकेचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर यांचे निधन.
१९८३ -  कपिलदेवच्या नेतृत्वाखाली  भारताने वेस्ट इंडीज संघाचा ४३ धावांनी पराभव करून प्रुडेन्शिअल विश्वकरंडक जिंकला. या सामन्यात मोहिंदर अमरनाथला ‘ंमॅन ऑफ द मॅच’ पारितोषिक देण्यात आले.
१९९४ - लंडन येथील ॲलेक्‍स केली या शालेय क्रिकेटपटूने एकही धाव न देता दहा गडी बाद करण्याचा विक्रम केला.
२००० - मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या, मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या माजी कार्यकारी सदस्य रविबाला सोमण-चितळे यांचे निधन.

दिनमान -
मेष :
मुलामुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्‍न दुपारनंतर सोडवू शकाल. काहींना सुसंधी लाभेल. 
वृषभ : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. अडचणी कमी होतील. .
मिथुन : लहानसहान प्रवासाचे योग येतील. परंतु प्रवासात काळजी घ्यावी. 
कर्क : आरोग्य चांगले राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
सिंह : खर्चाचे प्रमाण कमी होईल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मनोरंजनाकडे कल राहील.
तूळ : व्यवसायातील कामे मार्गी लागतील. दुपारनंतर मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. 
वृश्‍चिक : मानसिक बल वाढेल. मन आशावादी राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
धनू : महत्त्वाचे निर्णय दुपारनंतर घ्यावेत. दुपारपूर्वी मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.
मकर : जिद्द व चिकाटी वाढणार आहे. दुपारनंतर वादविवाद नकोत. 
कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. 
मीन : आरोग्य चांगले राहील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT