Horoscope and Astrology
Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 3 ऑगस्ट 2021

सकाळ वृत्तसेवा

दिनविशेष

१८८६ : नामवंत हिंदी कवी मैथिलीशरण गुप्त यांचा जन्म. त्यांचे सुमारे चाळीस स्वतंत्र ग्रंथ आणि सहा अनुवादित ग्रंथ प्रकाशित झाले. त्यांच्या ‘भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्याना ‘राष्ट्रकवी’ म्हणून मान्यता.

१८९८ : आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी व कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा जन्म. त्यांनी पंजाब विद्यापीठातून ‘शास्त्री’ आणि कलकत्त्यातून ‘काव्यतीर्थ’ या पदव्या मिळविल्या.

१९०० : महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीचे, ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारे पराक्रमी नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म. त्यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार ‘पत्री सरकार’ या नावाने प्रसिद्ध होते.

दिनमान

मेष : कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल.

वृषभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

मिथुन : वाहने सावकाश चालवावीत. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

कर्क : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या पत्रांचे व्यवहार पार पडतील.

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : गुरुकृपा लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

तूळ : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृश्‍चिक : व्यवसायातील निर्णय पुढे ढकलावेत. काहींना प्रवासाचे योग.

धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : नवीन परिचय होतील. काहींची बौद्धिक प्रगती होईल.

कुंभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मीन : काहींना प्रवासाचे

योग येतील. गुरुकृपा लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT