Bhavishya
Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ७ फेब्रुवारी २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार : पौष कृष्ण ११, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, चंद्रोदय पहाटे ४, चंद्रास्त दुपारी २.१९, सूर्योदय ७.०७, सूर्यास्त ६.३०, षट्तिला (स्मार्त) एकादशी, भारतीय सौर माघ १७ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१५ : पुण्यातील ‘आर्यन’ हे पहिले चित्रपटगृह  गंगाधर नरहर ऊर्फ बापूसाहेब पाठक यांनी सुरू केले. प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता ‘हिऱ्याची अंगठी.’
१९७६ - चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांचे कलकत्ता येथे निधन.
१९९३ : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘पृथ्वी’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसा येथील चंडीपूर येथे यशस्वी चाचणी. 
२००० : दिगंबर जैन पंथीयांचे आद्य श्रद्धास्थान, तीर्थरक्षा शिरोमणी, तृतीय पट्टाचार्य आचार्य मुनीश्री १०८ आर्यनंदीजी महाराज यांचे अतिशय क्षेत्र नवागढ येथे निधन.
२००३ : ‘श्रमिकांचे जिवाभावाचे पुढारी’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कामगार नेते जीवनराव सावंत यांचे निधन.
२००३ : महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा ‘श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार’ सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांना जाहीर.

दिनमान -
मेष :
महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृषभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. एखादी चिंता लागून राहील.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो दुपारनंतर घ्यावेत. खर्चाचे प्रमाण कमी होईल.
कर्क : दुपारनंतर काहींना प्रतिकूलता जाणवेल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सिंह : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
कन्या : जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
तुळ : आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायानिमित्त प्रवास होतील.
वृश्‍चिक  : व्यवसायातील महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. 
धनु : खर्चाचे प्रमाण दुपारनंतर कमी होईल. मनोबल वाढेल.
मकर : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. प्रवासात काळजी घ्यावी.
कुंभ : सामाजिक व राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मन आनंदी राहील.
मीन : दिवस अनेक दृष्टीने चांगला जाईल. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara : पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT