director  sakal
सप्तरंग

एका वादग्रस्त दिग्दर्शकाची

‘परफेक्शनिस्ट’चे बिरुद लावले जाते. हॉलीवूडमध्ये पहिल्यांदा ‘परफेक्शनिस्ट’ या शब्दाचा वापर स्टॅनली कुब्रिक या दिग्दर्शकासाठी करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

अमृता केसरी

सिनेमा क्षेत्रात ‘परफेक्शनिस्ट’ हा शब्द आजकाल अगदी सहज वापरला जातो. जी व्यक्ती सिनेमातले आभासी जग तयार करताना अगदी बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून असतो, स्क्रीनवरच्या गोष्टी पाहताना त्या प्रत्यक्षात जशा आहेत तशाच असल्या पाहिजेत, याचा आग्रह धरतो, हे साध्य करण्यासाठी तो किंवा ती जीवाचा आटापिटा करते,

त्याला ‘परफेक्शनिस्ट’चे बिरुद लावले जाते. हॉलीवूडमध्ये पहिल्यांदा ‘परफेक्शनिस्ट’ या शब्दाचा वापर स्टॅनली कुब्रिक या दिग्दर्शकासाठी करण्यात आला. स्टॅनली कुब्रिक या दिग्दर्शकाचा जगभरात प्रचंड फॅनफॉलोइंग आहे. सिनेमा सिद्धांत आणि तंत्र या दोन्ही गोष्टी बदलण्यात कुब्रिकचे नाव आघाडीवर आहे. साहित्यावर सिनेमानिर्मिती आणि ते करताना कथानकाची आपल्या विशेष दिग्दर्शकीय शैलीत दृश्यांची मांडणी ही स्टॅनली कुब्रिकची खासियत आहे. यासाठीच त्याला बियाँड द ऑस्कर म्हटले गेले

आणि तो सिनेमा क्षेत्रातला पहिला परफेक्शनिस्ट ठरला. याची रंजक गोष्ट लेखक नरेंद्र बंडबे यांच्या ‘कुब्रिक’ या पुस्तकातून समजते. सिनेमाचा अभ्यास आणि सिनेमाचे पॅशन असणाऱ्यांसाठी हे पुस्तक फार महत्त्वाचे आहे.

स्टॅनली कुब्रिक यांनी आपल्या ५८ वर्षांच्या कारकिर्दीत फक्त १३ सिनेमे बनवले. ते सिनेमा क्षेत्रात नावाजले. त्यांचा प्रत्येक सिनेमा हा त्या काळातल्या प्रसिद्ध आणि वादग्रस्त साहित्यावर बनलेला होता. कुब्रिक या पुस्तकातही साहित्याचा सिनेमा बनण्याची प्रक्रिया नक्की कशी घडली, याची सविस्तर माहिती आहे.

स्टुडिओ सिस्टम, स्टार सिस्टम, सिनेमास्कोप, न्यू व्हेव, ग्राफिक तंत्रज्ञानाचा आविष्कार अशा सिनेमाक्षेत्रात आलेल्या प्रवाहांचा आलेख नक्की कसा होता, याचा अंदाज कुब्रिक हे पुस्तक वाचताना येतो. यासाठी हे एक माहितीपूर्ण पुस्तक आहे.

पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि ज्येष्ठ सिनेमा समीक्षक आणि लेखक अशोक राणे यांची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत त्यांनी स्टॅनली कुब्रिकचे जागतिक सिनेमातले महत्त्व, लेखकाचे कुब्रिकन असणे अशा गोष्टी नमुद केल्या आहेत. लेखकाच्या प्रवाही शैलीचा उल्लेख करताना राणे यांनी बंडबेंचा सिनेमा अभ्यासातल्या प्रवासाबद्दल आवर्जून लिहलेय. कुब्रिकच्या प्रत्येक सिनेमानिर्मितीमागची गोष्ट अगदी जितकी रंजक तितकीच क्लिष्ट आहे. ती साधी सोपी करण्याचे काम या पुस्तकात झालेय.

हे पुस्तक फक्त स्टॅनली कुब्रिकच्या सिनेमानिर्मितीपर्यंत मर्यादित राहत नाही. १९५० ते १९९९ या जवळपास ५० वर्षांतल्या सामाजिक, राजकीय आणि साहित्यिक घडामोडींचा वेध घेते. अमेरिका आणि रशिया या दोन जागतिक महासत्तांचा राजकीय प्रवासही या पुस्तकात अनुभवायला मिळतो.

अमेरिकेचे ३२वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुसवेल्ट, जे एफ केनडी ते अगदी जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कारकि‍र्दीत नक्की काय-काय घडले? दुसरे महायुद्ध, त्याचा जगाच्या अर्थकारण आणि समाजकारणावर नक्की काय परिणाम झाला? शीतयुद्धातली दोन्ही महासत्तांमधली रस्सीखेच, यामुळे होणारी जगाची कुचंबना, अमेरिका-रशियाची लष्करी धोरणं असे बरेच काही पुस्तकात वाचायला मिळते. राजकीयदृष्ट्या जग अस्वस्थ असताना अमेरिका आणि युरोपातल्या समाजातली अस्वस्थता, त्याचा परस्पर नातेसंबंधांवर झालेला परिणाम, त्यातून झालेली साहित्यनिर्मिती आणि त्यासंदर्भातले वाद याची माहिती संदर्भासहित लेखक नरेंद्र बंडबे यांनी कुब्रिक पुस्तकात दिली आहे.

कुब्रिक हा हॉलीवूडमधला अतिशय वादग्रस्त फिल्ममेकर होता. त्याच्या परफेक्शनिस्ट सवयीमुळे तो नेहमी चर्चेत राहिला. ब्लादीमीर नाबोकोवची ‘लोलिता’, अँथनी बर्गीसचे ‘अ क्लॉकवर्क ऑरेंज’, हॉवर्ड फास्टचे ‘स्पार्टाकस’ आदी गाजलेल्या वादग्रस्त कादंबऱ्यांवर कुब्रिकने सिनेमे बनवले. कुब्रिकच्या सिनेमांची जॉन्रा नेहमी बदलत राहिला.

मग तो पाथ ऑफ ग्लोरी(१९५७) सारखा युद्धपट असो किंवा बॅरी लिंडन (१९७५) हा ऐतिहासिक सिनेमा, २००१ ए स्पेस ओडिसी (१९६८) सारखे अगदी किचकट पण त्याचे मानवी उत्क्रांतीचा आढावा घेणारे सिनेमे असो. या सर्व सिनेमांची निर्मिती आणि महत्त्व या पुस्तकात आले आहे.

कुब्रिक आपल्या सिनेमाच्या स्टाईलमुळे लक्षात राहिला. त्याचे वैयक्तिक आयुष्यही तेवढेच प्रभावी आणि उत्कंठावर्धक होते. हॉलीवूडच्या चकाचौंदपासून दूर तो लंडनमधल्या एका घरात कित्येक वर्षे अज्ञातवासात राहिला. त्यातून एक गमतीशीर गोष्ट घडली. याची सखोल मांडणी कुब्रिक पुस्तकात आहे. यामुळे हे एका दिग्दर्शकाचे चित्र-चरित्र न राहता ते त्यापलिकडे जाऊन इंग्रजी किंबहुना जागतिक सिनेमाच्या इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनांची पाने उलगडून टाकणारे पुस्तक ठरते.

२०१८ मध्ये कान्स या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘२००१-ए स्पेस ओडिसी’ या कुब्रिकच्या सिनेमाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष स्क्रीनिंग केले गेले. या स्पेस ओडिसीचा पन्नासावा ‘वाढदिवस’ इंटरनॅशनल अस्ट्रोनॉमिकल युनियननेही साजरा केला. त्या ‘मुहूर्ता’वर त्या खगोलशास्त्रीय संस्थेने आपल्या विश्वातील ‘प्लुटो’ ग्रहाच्या एका उपग्रहाला कुब्रिक असे नाव दिले. याचा अर्थ असा की स्टॅनली कुब्रिक हा दिग्दर्शक सर्वकालिक आहे. याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो.

स्टॅनली कुब्रिक यांनी आपल्या ५८ वर्षांच्या कारकिर्दीत फक्त १३ सिनेमे बनवले. ते सिनेमा क्षेत्रात नावाजले. त्यांचा प्रत्येक सिनेमा हा त्या काळातल्या प्रसिद्ध आणि वादग्रस्त साहित्यावर बनलेला होता. कुब्रिक या पुस्तकातही साहित्याचा सिनेमा बनण्याची प्रक्रिया नक्की कशी घडली, याची सविस्तर माहिती आहे. स्टुडिओ सिस्टम, स्टार सिस्टम, सिनेमास्कोप, न्यू व्हेव, ग्राफिक तंत्रज्ञानाचा आविष्कार अशा सिनेमाक्षेत्रात आलेल्या प्रवाहांचा आलेख नक्की कसा होता, याचा अंदाज कुब्रिक हे पुस्तक वाचताना येतो. यासाठी हे एक माहितीपूर्ण पुस्तक आहे.

(लेखिकेने अनेक वृत्तसंस्थांमध्ये काम केले असून, सध्या त्या लंडनमध्ये माध्यम क्षेत्रातल्या संशोधनावर काम करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT