book review
book review 
सप्तरंग

बालकांचे हक्क आणि कायद्यांबाबत परिपूर्ण माहिती

डॉ. बबन जोगदंड

आजचा बालक उद्याचा सुजाण नागरिक आहे. बालकांचा लहानपणापासूनच व्यवस्थित विकास झाला, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर उद्याची चांगली पिढी निर्माण होऊ शकेल. परिणामी देशाच्या विकासास हातभार लागेल. बालकांच्या विकासासाठी असे नाना प्रकारचे प्रयोग होताना आपण पाहतो. आपलं बालक हे उत्तम संस्कारित, सुदृढ, विकसित व्हायला हवं; परंतु देशात अलीकडं मोठ्या प्रमाणात बालगुन्हेगारी वाढीस लागली आहे. सोशल नेटवर्किंगमुळं या गुन्हेगारीचं स्वरूपही बदलत चाललं आहे. एकोणिसाव्या शतकापर्यंत जगात बालगुन्हेगारी हा स्वतंत्र विचार नव्हता. लहान मुलांना मोठ्यांप्रमाणंच कठोर शिक्षा दिल्या जात आणि फटक्‍यांची शिक्षा दिली जाई. 1950 च्या सुमारास इंग्लंडमध्ये औद्योगिक संबंधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि माणसाकडं पाहण्याचा उदारमतवादी दृष्टिकोन मान्य झाला आणि त्यामुळंच पुढं बालकांसाठीचे कायदे, बालकांसाठीचं स्वतंत्र धोरण निर्माण होण्यास मदत झाली. कारण बालकांचे अधिकार, त्यांच्यासंबंधातले कायदे हेही त्यांच्या विकासाला पूरक ठरतात. बालकांचे हक्क कुणी हिरावून घेऊ नयेत, त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करू नये यासाठी कडक कायदे राबवले जातात. माता-पित्यांचं छत्र हरवल्यामुळं किंवा अनैतिक संबंधांतून जन्माला आलेली बालकं यांची परवड होऊ नये म्हणून अशा कायद्यांची गरज आहे. त्यामुळं असे कायदे बालकांसाठी वरदान ठरतात. अलीकडं बालकल्याण क्षेत्रात विविध लोक, संस्था कार्यरत आहेत. मात्र, त्यांना अजूनही बालकांच्या संदर्भातले कायदे, त्यांचे हक्क, त्यांच्या विकासासाठीचे उपक्रम पूर्णपणे माहीत नाहीत. हाच धागा पकडून डॉ. गणेश बोरकर यांनी "बालहक्क व कायदे : बालविकास-बालकल्याण' हे पुस्तक लिहिलं आहे. बालकल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांसाठी हे पुस्तक दिशादर्शक स्वरूपाचं आहे.
या पुस्तकात एकूण पाच विभाग असून, पहिल्या विभागात बालविकास, त्यांचे हक्क, त्यांचे संरक्षण याबाबत विस्तारानं मांडणी केली आहे. या प्रकरणांमधून बालकांची सद्य:स्थिती, बालकांविषयीचं राष्ट्रीय धोरण, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, संयुक्त राष्ट्रांची भूमिका अभ्यासता येते. दुसऱ्या विभागात बालकांच्या समस्यांवर प्रकाश टाकून त्यामध्ये बालगुन्हेगारी, बालकांना लैंगिक शिक्षण, सायबर क्राईमच्या विळख्यात बालपण, बालगुन्हेगारीसाठी कारणीभूत घटक, बालकामगार आणि बालगुन्हेगारीवरची उपाययोजना यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या विभागातून बालकांच्या समस्या आणि त्याच्यावर उपाययोजना कशी करायची याबाबत सविस्तर माहिती मिळते. तिसऱ्या भागात बालकांवरचे अत्याचार रोखण्याकरता प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर लेखकानं लिहिलं आहे. त्यामध्ये बालकांसाठीची मनोधैर्य योजना, स्त्रीभ्रूणहत्या आणि पोलिसांची कार्यवाही, बालन्याय अधिनियम 2000, महिला बंदींच्या मुलांसाठी कारागृहातल्या सोयी-सुविधा; विनयभंगाच्या घटना आणि त्यावरच्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या विभागातून आपणाला बालकांवरचे अन्याय, अत्याचार कसे रोखता येतील, त्यासाठीच्या काय योजना आहेत, कोणते कायदे आहेत याबाबत माहिती मिळते. चौथ्या विभागात बालकांसंदर्भातले कायदे नमूद करण्यात आले आहेत. यामध्ये बालकांच्या संदर्भातल्या सर्व कायद्यांची इत्थंभूत माहिती या प्रकरणातून आपणास मिळते. पाचव्या विभागात बालकांसाठी सरकारी स्तरावर राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. बालगुन्हेगारांसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांची माहिती देण्यात आली आहे. बालन्यायालय, परिविक्षा सेवा, रिमांडहोम, बालसुधार मंडळ, इंडस्ट्रिअल स्कूल, सर्टिफाईड स्कूल आदी संस्थांची माहिती आपल्याला या प्रकरणात मिळते. त्याचबरोबर ज्युवेनाईल जस्टिस ऍक्‍ट 1986, बालन्यायालय, राज्य सरकारच्या बालविकासाच्या योजना, नव्यानंच राज्य सरकारनं सुरू केलेलं मुक्त विद्यालय शिक्षण, केंद्र सरकारचे बालकांच्या विकासासाठीचे विविध कार्यक्रम; तसंच योजना या प्रकरणात घेण्यात आल्या आहेत.

अशा प्रकारे पाच विभागांत या पुस्तकाची लेखकानं मांडणी केली आहे. प्रत्येक विभागातल्या समाविष्ट प्रकरणातून बालकांशी संबंधित विविध मुद्‌द्‌यांची माहिती सुटसुटीतपणे आणि विस्तारानं या पुस्तकात आल्यानं हे पुस्तक या क्षेत्रात काम करणाऱ्यांना एक मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावू शकतं. बालकांच्या संदर्भातील माहिती या पुस्तकात बारकाईनं देण्यात आल्यामुळे बालकांसंदर्भात काय काय घडू शकतं आणि त्याच्या निवारणार्थ काय काय करता येऊ शकतं हेही आपल्याला समजतं. त्यामुळं हे पुस्तक केवळ बालविकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनाच उपयुक्त आहे, असं नाही तर हे पुस्तक विधिज्ञ, सर्वसामान्य नागरिक, डॉक्‍टर, महिला आणि बालविकास अधिकारी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, पत्रकारिता, समाजकार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र, विधी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरताही उपयुक्त आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ चित्रकार संतोष धोंगडे यांनी अत्यंत चांगलं रेखाटलं आहे. लेखकानं या पुस्तकाच्या माहितीसंकलनासाठी खूप मेहनत घेतलेली जाणवते.

पुस्तकाचं नाव : बालहक्क व कायदे : बालविकास-बालकल्याण
लेखक : डॉ. गणेश बोरकर
प्रकाशक : स्वयंदीप प्रकाशन, पुणे (9922224686)
पानं : 380, किंमत : 400 रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT