poetry google
सप्तरंग

कविता आणि कवी

- डॉ. नीरज देव


रसिका, कविता कशी असावी व कशी नसावी, यावर बराच ऊहापोह साहित्यातून आपण वाचतो. समीक्षक तर नको तितकी चिरफाड करतात. यावर आपली भूमिका मांडताना केशवसुतांनी ‘कविता आणि कवी’ या नावाची एक कविताच लिहिली आहे. ती १० जानेवारी १८९५ च्या ‘करमणूक’च्या अंकात प्रकाशित झालेली आहे. या कवितेच्या आरंभीच ते गातात,

अशी असावी कविता, फिरून
तशी नसावी कविता, म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
आहात मोठे पुसतो तुम्हाला।

कविता हा पूर्णतः कवीच्या अखत्यारीतला भाग असून, त्यावर भाष्य करण्याचा इतरांना अधिकारच काय, असा प्रश्न केशवसुत या कवितेतून विचारतात। तरुण कवी जसा तरुणीकडे मोहित होतो तसा कवी कवितेकडे मोहित होतो। तरुण जसा तरुणीला विनंती करतो तसाच कवी कवितेला सुवृत्ती करतो। ज्याप्रमाणे प्रियाराधन हे कोणी कसे करावे ते सांगत नाही त्याप्रमाणेच काव्यराधनाविषयी कवीलाही कोणी सांगू नये, असे केशवसुतांचे प्रतिपादन आहे. याचे कारण सांगताना ते गातात,

करुनिया काव्य जनात आणणे
न मुख्य हेतू तदीय मी म्हणे;
करुनि ते मनांत गुंगणे,
तदीय हा सुंदर हेतु मी म्हणे।



काव्याचा मुख्य हेतू कवीचे आत्मसमाधान, आत्मतृप्ती होय। लोकांना काय आवडेल ते पाहून जे काव्य रचतात ते केवळ लोकरंजनच करतात ते काव्य काव्य नसून नटीसारखा नाटकीपणाच होय. एका अर्थी पाहता त्यांचे हे म्हणणे योग्य आहे कारण केवळ सभारुचीचा विचार करून तयार होणारे काव्य असो वा नाट्यादी प्रकार सारे सवंगतेकडे झुकताना दिसतात। त्यात कलाकाराला कलेचा सच्चा आनंद उपभोगायला मिळत नाही.


असे सांगतात, की एकदा तानसेनला अकबराने विचारले, ‘‘तुझ्यापेक्षा चांगलं गाणारा जगात कुणी आहे का?’’ तानसेनने स्वतःच्या गुरूचे नाव सांगितले. अकबर म्हणाला, ‘‘त्यांना इथे आमंत्रित कर. मला त्यांचं गाणं ऐकायचं आहे.’’ त्यावर तानसेन उत्तरला, ‘‘बादशाह, ते इथे येणार नाहीत. ते कुणासाठीही गात नसतात, ते केवळ स्वतःसाठीच गातात. तुम्हाला जर त्यांना ऐकायचं असेल तर मध्यरात्री त्यांना कळू न देता गंगेच्या किनाऱ्यावर जाऊन तिथे लपून बसावे लागेल.’’ अकबर बादशाह त्यालाही तयार झाला. दोघेही गंगा किनाऱ्यावर जाऊन लपले. मध्यरात्रीच्या भयाण काळोखात तानसेनचे गुरू गायला लागले. त्यांचे ते मधुर गायन दिवस लोटले तरी अकबर विसरला नाही. त्याने न राहवून तानसेनला विचारले, ‘‘मला आजवर वाटत होतं, की केवळ तूच सर्वोत्तम गायक आहेस पण तुझ्या गुरूला ऐकल्यावर मला जाणवतं तू त्यांच्या शतांशसुद्धा नाहीस. तुझ्यात अन् त्यांच्यात एवढा फरक का?’’ तानसेन उत्तरला, ‘‘जहाँपनाह, मी पैसा, कीर्ती, राजा व प्रजारंजनासाठी गातो आणि माझे गुरू स्वांतःसुखाय गातात, आत्मानंदासाठी गातात म्हणून त्यांच्या गाण्यात अप्रतिम उंची आहे.’’


एकप्रकारे तीच गोष्ट सांगताना केशवसुत गातात, ‘तुम्हाला जर काव्याचा खरा आस्वाद घ्यायचा असेल तर कवीला कवितेसोबत सोडून द्या. जेथे कवी व त्याच्या कवितेचा मुक्तसंचार चाललेला आहे त्या खिडकीच्या खाली मुकाट उभे राहा व त्यांच्या गोड लीला पाहत तुम्ही नक्कीच परमानंदात नहाल.’ गंमत अशी, की आत्मसमाधान हेच काव्याचे प्रधान कारण मानणाऱ्या केशवसुतांनीच नंतरच्या काळात तुतारीसारख्या कविता लिहून समाजजागृतीचे काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : ''...त्यावेळी आज आपणच पेरलेल्या विषाची जाणीव त्यांना होईल, पण वेळ मात्र गेलेली असेल''

ENG vs IND: टीम इंडियाने बुमराहशिवाय दोन्ही कसोटी जिंकल्या! सचिन तेंडुलकर म्हणाला, 'त्याने सुरुवात चांगली...'

Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Tutari Express: तुतारी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा खोळंबा, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Virar News : अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण; माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

SCROLL FOR NEXT