Omicron patients sakal media
सप्तरंग

कोरोनाचा वेगळा ‘पेपर’ येऊ शकतो?

डॉ.राहुल रनाळकर

दोन वर्षांपासून कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग अस्वस्थ आहे. कोरोनाचा पहिला फटका मार्च २०२० मध्ये बसला. लॉकडाउनचं अंधार युग सुरू झालं. अनेक उद्योगधंद्यांवर कोरोनानं प्रहार केले. अनेक उद्योग कायमचे बंद झाले. अचानक ओढावलेल्या स्थलांतरामुळे मजूर वर्गाचे अतोनात हाल झाले. ठराविक क्षेत्रांनी उचल खाल्ली, मात्र अधिकांश क्षेत्रांवर कोरोनाची काळी छाया पसरली. साधारण डिसेंबर २०२०, जानेवारी-फेब्रुवारी २०२१च्या मध्यापर्यंत गाडी रुळावर येतेय, असं वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. ही लाट एवढी भयंकर होती, की असंख्य कुटुंबांची अक्षरशः वाताहत झाली, अनेक जीव गेले. ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर हे तेव्हा परवलीचे शब्द बनले होते. कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस या व्हेरियंटनीही दुसऱ्या लाटेत मोठी जीवितहानी केली.

डिसेंबर २०२१ च्या शेवटच्या आठवड्यापासून आता तिसऱ्या लाटेचा जोर वाढतोय. जगभर ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचा धुमाकूळ सुरू आहे. जेवढा संसर्ग अधिक, तेवढे मृत्यूचे प्रमाण कमी असं एक सूत्र सध्या जगभर प्रचलित झालं आहे. दक्षिण आफ्रिकेत जेवढ्या वेगाने ओमिक्रॉनचा प्रभाव वाढला, तेवढ्याच वेगाने तो कमीही झाला, असं असलं तरीही ओमिक्रॉनचा प्रभाव कमी जाणवण्यामागे आत्तापर्यंत वेगाने झालेलं लसीकरण हे प्रमुख कारण असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र आपण स्वेटर घालून थंडीत फिरत असलो म्हणजे थंडी नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. थंडी आहे, पण स्वेटरमुळे ती कमी प्रमाणात जाणवते. अशाच प्रकारे लसीकरणाचे कवच लाभल्याने ओमिक्रॉनचा सामना करण्याची प्रतिकार क्षमता आपल्यात निर्माण झाली आहे, हा सरळ सरळ अर्थ आहे.

आपल्याकडे जोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात नाही अथवा गंभीर स्वरूप धारण करत नाही, तोपर्यंत सर्वसामान्य नागरिक जागृत होत नाहीत. पहिल्या लाटेत लोकांच्या मनात कोरोनाबाबत प्रचंड भीती होती. त्यामुळे लॉकडाउन यशस्वी झाला. संसर्ग वाढला; पण मृत्यूचं प्रमाण या लाटेत कमी होतं. दुसऱ्या लाटेत लोकांच्या मनातील भीती गेली; पण ही लाट एवढी भयंकर होती, की ऑक्सिजन, बेड आणि रेमडेसिव्हिर मिळविणे म्हणजे आयुष्य मिळविणे, असंच जणू समीकरण बनलं होतं. स्मशानभूमींमधील विदारक दृश्ये अस्वस्थ करणारी होती. भीती फार उरली नसली, तरी जवळच्या व्यक्तींना गमावण्याचं डोंगराएवढं दुःख अनेक कुटुंबांनी सोसलं. ज्या कुटुंबांनी दुसऱ्या लाटेत मृत्यू जवळून पाहिला, केवळ त्यांच्यामध्ये गांभीर्य जाणवत होतं. अन्य मंडळी कोरोना खरंच आहे की नाही, यावर चर्चा करण्यात मग्न होती. पहिल्या लाटेत डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली. अनेकांचा जीवदेखील गेला. मात्र फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून पहिल्या टप्प्यात लसीकरण झाल्यानं दुसऱ्या लाटेचा तडाखा मोठा असूनही वैद्यकीय क्षेत्राला फार मोठा फटका बसला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

दुसऱ्या लाटेत बेड, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची एवढी कमतरता भासेल, असं स्वप्नातही कोणाही वैद्यकीय तज्ज्ञाला किंवा सरकारातील अधिकाऱ्याला वाटलं नव्हतं. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता बेडची कमतरता तिसऱ्या लाटेत जाणवेल, अशी शक्यता वाटत नाही. ऑक्सिजन किंवा रेमडेसिव्हिरची तर गरज लागण्याची शक्यताही कमी दिसतेय. या तिन्ही पातळ्यांवर सज्जता चांगल्या प्रकारची आहे. रेमडेसिव्हिर तर वापरात येण्याची शक्यता धूसर आहे. रेमडेसिव्हिरमुळे निर्माण झालेल्या म्युकरमायकोसिसचे अत्यंत घातक परिणाम काही रुग्णांवर दिसले, म्युकरमायकोसिसचा पेपरही अनपेक्षितपणे आला, वैद्यकीय क्षेत्राची प्रचंड तारांबळ उडाली.
त्यामुळे रेमडेसिव्हिरचा उपयोग यापुढे कोरोनासाठी अशक्यप्राय आहे.

आता प्रश्न उरतो, तो म्हणजे तिसऱ्या लाटेचा प्रभाव किती काळ टिकेल, कोणत्या घटकांवर तो राहील. आधीप्रमाणे अनपेक्षित पेपर कोरोनानं टाकला म्हणजे त्याला कसं सामोरं जायचं? याची नेमकेपणानं माहिती, अचूक अंदाज सध्या कोणीही वर्तवू शकत नाही. सकारात्मक बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे सुरू झालेले बूस्टर डोस आणि १५ ते १८ वयोगटातील युवकांचे सुरू झालेले लसीकरण. तज्ज्ञ असं सांगताहेत, की १५ वयोगटाखालील मुलांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग अधिक वाढल्यास पेपर पुन्हा चुकू शकतो. त्यातल्या त्यात शून्य ते चार वयोगटातील चिमुरड्यांमध्ये संसर्ग वाढल्यास चिंतेत अधिक भर पडू शकते. एवढ्या लहान शिशूंवर उपचार करण्यासाठी उपलब्ध लोकसंख्येच्या तुलनेत व्यवस्था आपल्याकडे नाही. प्रत्येक वेळी ज्याची सज्जता ठेवली, त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडत आलंय. ओमिक्रॉन सौम्य असल्यानं तो पटकन निघून जाईल, असं म्हणत निष्काळजीपणा बाळगण्यात काही अर्थ नाही. आवश्यक तेवढी खबरदारी घेत पुढे जात राहायचं, सध्यातरी एवढंच आपल्या हाती आहे. आत्ताचा पेपर सोपा की अनपेक्षितरीत्या कठीण हे स्पष्ट होण्यासाठी अजून काही काळ नक्कीच जाऊ द्यावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT