Nature Sakal
सप्तरंग

निसर्गाच्या सत्तेवर विश्वाचा !

ते युगही निसर्गमय होतं. जीवनाचा प्रत्येक पैलू निसर्गामुळे प्रभावित झाला होता. निसर्गापेक्षा वेगळं जीवन अस्तित्व शक्य नव्हतं. हा संपूर्ण काळ जंगली प्राणी तसंच वृक्ष-झाडांनी चहूबाजूंनी घेरलेला होता.

सकाळ वृत्तसेवा

ते युगही निसर्गमय होतं. जीवनाचा प्रत्येक पैलू निसर्गामुळे प्रभावित झाला होता. निसर्गापेक्षा वेगळं जीवन अस्तित्व शक्य नव्हतं. हा संपूर्ण काळ जंगली प्राणी तसंच वृक्ष-झाडांनी चहूबाजूंनी घेरलेला होता.

- डॉ. राजेद्रसिंह saptrang@esakal.com

ते युगही निसर्गमय होतं. जीवनाचा प्रत्येक पैलू निसर्गामुळे प्रभावित झाला होता. निसर्गापेक्षा वेगळं जीवन अस्तित्व शक्य नव्हतं. हा संपूर्ण काळ जंगली प्राणी तसंच वृक्ष-झाडांनी चहूबाजूंनी घेरलेला होता. पण मानसिक विकासासोबत सुख आणि सुरक्षेचं भान जन्माला आलं आणि त्यामुळे क्रौर्याचा विकास होऊ लागला, त्याला आर्यकाळ मानलं जाऊ लागलं. हे आर्य ऋषी आणि मुनींप्रमाणे ‘परमब्रह्मा’च्या चिंतनात लीन नव्हते. आपली जीवनशैली सुधारणाऱ्या साधनांच्या शोधात ते अधिक व्यग्र होते. आपल्यापेक्षा अधिक प्रगत संस्कृतीच्या आर्येतरांना पराभूत करण्यासाठी त्यांच्याशी लढणं सोपं काम नव्हतं.

परिणामी आर्येतरांविरुद्धच्या युद्धात विजय संपादन करण्यासाठी आर्यांनी आपल्या देवतांकडे मदतीची प्रार्थना केली. तेव्हापासून युद्ध सुरू करण्यापूर्वी इंद्राची प्रार्थना केली जाते. ‘हे निश्चल आणि निर्भीड इंद्रदेवता, आसमंताचा कानाकोपरा हादरून जाईल अशी, विजेची चमक आणि ढगांच्या गडगडाटासारखी आपली धारदार तलवार शत्रूविरुद्ध वापरण्याची शक्ती द्या’ अशी इंद्रदेवतेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रार्थना केली जायची.

देवतांच्या सैन्याचे आणखी एक नायक वरुण बलवान आणि सशक्त होते. त्यांनीच आकाशाला उंच उचलून पृथ्वी आणि स्वर्ग एकमेकांपासून वेगळे केले. नद्या समुद्रात विलीन व्हायच्या; पण समुद्र कधी उफाळला नाही. त्यातही वरुण देवतेची शक्ती प्रकट व्हायची. ऋग्वेदात वरुणाचं वर्णन या जगाच्या भविष्याचं संचालन आणि नियंत्रण करणाऱ्या देवतेच्या रूपात करण्यात आलं आहे.

‘वनेषु व्यतरिक्षं ततान वाजर्मत्सु पय उस्त्रियासु ।

हृत्य क्रतुं वरुणो अप्स्वग्निं दिवि सूर्यमदधात्सोममद्रो ।।’

अर्थात, वरुणाने वनांचं सौंदर्य पसरविलं आहे, घरांना मजबूत केलं आहे आणि क्षीरपात्रात दूध भरलं आहे. वरुणानेच हृदयांमध्ये चांगले भाव, जलात अग्नी, आकाशात सूर्य आणि पर्वतावर सोम दिला आहे. याचप्रकारे आर्यांची महत्त्वपूर्ण देवता होती अग्नी.

‘हे जाज्वल्यमान! तुम्हीच अक्षय सूर्याला आकाशाच्या यात्रेसाठी प्रवृत्त केलं, मानवाला प्रकाश प्रदान केला’ (ऋग्वेद १०, १३०-५). ‘तुम्ही शरीराचे रक्षक आहात, रक्षण करा. तुम्हीच दीर्घायुष्य देणारे आहात, मला दीर्घायुष्य द्या. तुम्हीच मस्तकाला प्रतिभा प्रदान करणारे आहात, माझ्या मस्तिष्काला प्रतिभा द्या. हे देवा, माझ्या शरीरात जे काही कमी असेल, त्याची पूर्तता करा.’

‘एक एवाग्निर्बहुधा समिद्ध एक;

सूर्यो विश्वमनु प्रभूतः

एकोषाः सर्वामिदं विभात्येकं वा इदं विबभूव सर्वम्।’

(ऋग्वेद, ८.५८.२)

अर्थात, एक अग्नी आहे, जो अनेक स्थानांवर जळत असतो. एक सूर्य आहे, जो सर्वत्र प्रकाशित आहे. एक उषा आहे, जी या सर्वांना प्रकाशमान करते. तो जो परमेश्वर आहे, त्यात हे सर्व आहेत.

‘अग्नीही तोच आहे, आदित्यही तोच, वायूही तोच आहे, चंद्रही तोच, प्रकाशही तोच आहे, ब्रह्माही तोच, जलही तोच आहे, प्रजापतीही तोच (ऋग्वेद, ३२.१). अग्नी, सूर्य आणि यमासारख्या विविध देवता आता एकच आणि त्याच रूपात मानल्या जाऊ लागल्या.

‘इन्द्रं मित्रं वरुणमग्निमाहुरथो दिव्यः स सुपर्णी गरुत्मान्।

एकं सद्विप्रा बहुधा वदंत्यग्नि मातरिश्वानमाहुः।’

(ऋग्वेद १.१६४.४६)

अर्थात, ते त्याला इंद्र, मित्र, वरुण, अग्नी म्हणतात. त्यावरही तो दिव्यता देणारा गरुड (सूर्य) आहे. एकाच गायकाला अनेक नावं देतात; त्याला अग्नी म्हणा, यम म्हणा, मातारिश्र्वन म्हणा ( गोष्ट एकच आहे ). अशाप्रकारे वेदांमध्ये निसर्गाच्या प्रत्येक अंगाची भगवान देवतेच्या रूपात पूजा केली जाते.

वैदिक काळ संपता-संपता ब्रह्मांडाच्या ऐक्याची कल्पना करण्यात आली होती. परमेश्वराच्या धारणेचा पूर्णतः उदय झाला होता आणि आधीच्या सर्व देवदेवता त्याच्या इच्छेचं पालन करणाऱ्या आहेत, असं मानलं गेलं होतं. वास्तवात आता बहुतांश वैदिक देवतांची उपेक्षा झाली होती, काही तर पूर्णपणे विस्मरणात गेले होते आणि काहींची मान्यता नावापुरतीच उरली होती. अर्थात, त्यांना सर्व वैदिक शक्तींपासून वंचित ठेवण्यात आलं होतं. (क्रमश:)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT