Omicron Sakal
सप्तरंग

गर्दीपासून दूरच राहा...

ओमिक्रॉनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. रुग्णसंख्या जास्त असली तरी, लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे खूप गरज असेल तरच रुग्णालयांत जा. प्रत्येक घरातील मुलांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत.

डॉ. समीर दलवाई

ओमिक्रॉनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. रुग्णसंख्या जास्त असली तरी, लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे खूप गरज असेल तरच रुग्णालयांत जा. प्रत्येक घरातील मुलांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत.

ओमिक्रॉनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. रुग्णसंख्या जास्त असली तरी, लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे खूप गरज असेल तरच रुग्णालयांत जा. प्रत्येक घरातील मुलांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत. आपण एवढे जाणतो की, मुलांना कोविड सौम्य प्रकारचा होतो. तो गंभीर होत नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नका. डॉक्टरांकडून ऑनलाईन औषधोपचार घ्या, रुग्णालयातील गर्दीत जाऊन संक्रमणात अडकू नका.

११ मार्च २०२० रोजी, जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ ला जागतिक संक्रमणाचा, महामारीचा दर्जा दिला. त्यावेळी या संसर्गाबद्दल काही कल्पना नव्हती. त्यासोबत आपली अंधाधुंद लढाई सुरू होती. तेव्हा लस वगैरे काहीही उपलब्ध नव्हती. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स कोविडमुळे सर्वाधिक संक्रमित झाले होते. कितीतरी जास्त डॉक्टरांना क्वारंटाईन व्हावं लागलं. त्याचा परिणाम त्यांच्या कामावर आणि कुटुंबावर झाला.

पहिली लाट ओसरताना या संक्रमणापासून आपण कसं वाचू शकतो याची माहिती मिळाली. त्यामुळे डॉक्टर किंवा इतर लोकांचे प्राण वाचवू शकलो. जेव्हा डेल्टा व्हेरिएंटची दुसरी लाट भारतात आली तेव्हा मोठ्या प्रमाणावर बेड्स आणि ऑक्सिजनची गरज आपल्याला भासू लागली. कुठे ऑक्सिजन नाही तर कुठे औषधं उपलब्ध नव्हते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. मास्क आणि इतर कोविड प्रोटोकॉल पाळल्यामुळे डॉक्टरांना संसर्ग कमी झाला. नोव्हेंबरमध्ये सार्स कोविडचा एक नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन, दक्षिण आफ्रिकेत आढळला. आता तो जगभर पसरला आहे. ओमिक्रॉन हा सौम्य स्वरूपाचा असला तरी ओमिक्रॉनमुळे रुग्णालयांमध्ये दाखल होणारे रुग्ण आणि मृत्यूंची संख्या खूप कमी आहे. पण यात आनंद माणण्यात काही अर्थ नाही.

या अगोदर आलेल्या व्हेरिएंटचा फैलाव होण्यासाठी सुरुवातीला काही महिने लागले होते. मात्र ओमिक्रॉन हा अगदी दिवसांत सर्वत्र पसरला आहे. भारतात २ डिसेंबर २०२१ ला ओमिक्रॉनची पहिली केस आढळून आली आणि ६ जानेवारी २०२२ ला पहिला मृत्यूदेखील झाला. दररोज आपल्याला हजारोंच्या संख्येत केसेस बघायला मिळत आहेत. भारतात कोविड केसेस एका दिवसात ५६ टक्क्यांनी वाढल्या. हे सर्व बघत असताना मुद्दा हा आहे की, ओमिक्रॉनच्या संक्रमणात जरी लक्षणे कमी असतील किंवा धोका कमी असेल तरी तो ज्या झपाट्याने वाढतोय, त्यात डॉक्टर्समध्ये संक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. कोलकात्तामध्ये २ जानेवारीला १०० पेक्षा जास्त डॉक्टर पॉझिटिव्ह आलेत. मुंबईला ३०० डॉक्टर केवळ तीन ते चार दिवसांत कोविड पॉझिटिव्ह निघाले. दिल्लीत एका दिवसात १०० डॉक्टर संक्रमित झाले. आता या डॉक्टरांना विलगीकरणात ठेवावं लागतं. बहुतांश डॉक्टर्स विलगीकरणात असल्यामुळे डॉक्टर, नर्सेसची कमतरता जाणवायला लागली आहे.

आता रुग्णालयांचे स्टाफ मेंबर्सना जास्तीत जास्त संरक्षण देण्याला प्राधान्य आहे. डॉक्टरांना ताबडतोब दाखल करून त्यांना लवकरात लवकर कसं बरं करता येईल, याकडे भर दिला जात आहे. पण तरी जे रुग्ण दाखल होत आहेत त्यांच्यावर उपचार करायला डॉक्टर नाहीत, असं चित्र दिसून येतंय.

ही जर गंभीर परिस्थिती आपल्याला रोखायची असेल तर नागरिकांनी याबद्दल विचार करायला हवा. नागरिकांनी यात मोठे योगदान देणे गरजेचे आहे. मी हे यासाठी बोलतोय कारण मुंबईत जवळजवळ प्रत्येक घरात किमान दोन ते तीन व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे दिसत आहेत. जवळपास प्रत्येक घरात ही लक्षणे दिसत आहेत. प्रत्येक जण चाचणी करतो असं नाही. सर्वच जण कोविड पॉझिटिव्ह असतील असंही नाही; पण एवढी मोठी लाट मी माझ्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये किंवा माझ्यापेक्षा वरिष्ठ असणाऱ्या डॉक्टरांनी बघितलेली नाही. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत संक्रमणाचा एवढा वेग नव्हता.

जास्तीत जास्त नागरिकांना लक्षणे आहेत; पण ती सौम्य लक्षणे आहेत. या लक्षणांसाठी आपण ताबडतोब घाबरून रुग्णालयात धाव घेण्याची गरज नाही. जर सर्वांनी रुग्णालयात धाव घेतली तर रुग्णालयातील गर्दी वाढेल. उपचारांची गती आणि उपचारांची गुणवत्ता साहजिक कमी होईल. ज्यावेळी डॉक्टर किंवा नर्सेस तुमच्या संपर्कात येतील तेव्हा त्या डॉक्टरला संक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. संसर्ग झाल्यास त्यांना किमान सात दिवसांची सुट्टी घ्यावी लागेल. आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. मग रुग्णालयं चालवणार कोण? रुग्णांवर उपचार कोण करणार? हे प्रश्न निर्माण होतात.

विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर प्रत्येक घरातील मुलांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत. आम्हाला फोन येतो की, मुलाला ताप आहे. आपण एवढे जाणतो की, मुलांना कोविड सौम्य प्रकारचा होतो. तो गंभीर होत नाही. जर त्याचा ताप मोजत राहिलो, त्याला पॅरासिटामॉल देत राहिलो, थंड पाण्याने अंग पुसत राहिलो, सर्दी खोकल्यावरचे औषध दिले तर मुलांसंदर्भातील काळजी दूर करता येईल.

एवढंच नाही तर आयसोलेशनमध्ये जे डॉक्टर आहे, ते रुग्णांना ऑनलाईन सेवा देऊ शकतात. त्यामुळे रुग्णालयात डॉक्टरांवरचा भार न वाढवता, त्यांच्याशी ऑनलाईन बोलून, सल्ला घ्या. त्या डॉक्टरांना तुम्ही गंभीर आहे असं जाणवलं तर ते स्वतःच तुम्हाला रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतील. इंडियन अकॅडमी ऑफ पिडीयाट्रीक्स या संस्थेशी देशभरात ३० हजार बालरोगतज्ज्ञ संलग्न आहेत. त्यांनी डिजिटल प्लॅटफार्मवर ऑनलाईन सल्ल्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा घ्या, खूप आवश्यकता असल्याशिवाय डॉक्टरांकडे तुम्ही किंवा तुमच्या मुलांना नेऊ नका. कारण संक्रमणाचे प्रमाण वाढल्यास, रुग्णालयात गरज असेल तेव्हा डॉक्टर्स तिथे उपलब्ध नसतील. त्यामुळे नागरिकांनी योग्य तो विचार करावा, योग्य ती पावलं उचलावीत.

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT