teenage
teenage 
सप्तरंग

पौगंडावस्थेचे ज्ञान मिळवू या!

डॉ. सुषमा देशमुख

ऋतुरंगाचे पहिले वळण
बाळरूपातून पौगंडावस्थेत पदार्पण
मोठे होत असल्याची
थोडीशी खुशी व धास्ती
वेगवेगळ्या त्रासांची
अनामिक भीती,
चला मन मोकळे करू या
पौगंडावस्थेचे ज्ञान मिळवू या!

नीलाताई, त्यांची मुलगी मंजिरी व नात श्रावणी यांना घेऊन अगदी वेळ काढून आल्या होत्या. श्रावणी साधारणत: दहा-अकरा वर्षांची गोड, बोलक्‍या डोळ्यांची, एक चुणचुणीत मुलगी! तिच्या आईच्या, मंजिरीच्या चेहऱ्यावर थोडा काळजीचा भाव होता. मंजिरी म्हणाली, 'डॉक्‍टर, श्रावणी फक्त अकराच वर्षांची आहे. तिला मासिक पाळी पण सुरू झाली. अशी इतक्‍या लवकर कशी चालू झाली? तिला तर काहीच कळत नाही. मलाच खूप काळजी वाटते. मला थोडं सांगाल का? मी हिची कशी काळजी घेऊ. माझ्या मैत्रिणीची मुलगी 14-15 वर्षांची आहे. ती तर खूपच विचित्र वागते. श्रावणीत पण तसेच बदल येतील काय?' मी तिला हसत म्हटलं, 'अगं मंजिरी, तू पण त्यातून गेली आहेस. हे स्त्रीच्या आयुष्यातील पहिलं महत्त्वाचं वळण आहे. 'पौगंडावस्था' म्हणजे दहा ते एकोणीस वर्षांपर्यंतचा वयोगट.' आज आपण याविषयी सविस्तर माहिती मिळवू.
पौगंडावस्था हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा कालावधी; ज्यामध्ये ती बालवयातून स्त्रीत्वाकडे पहिले पाऊल टाकते. या महत्त्वाच्या वळणावर तिने स्वत:बद्दल, होणाऱ्या बदलांबद्दल जाणून घ्यायला हवं. कारण तिच्या शरीरात वाढणाऱ्या स्त्री हार्मोन्समुळे शारीरिक व मानसिक बदल होतात. दहा-अकरा वर्षांपासून हे बदल चालू होतात.
शारीरिक बदल : शरीराची उंची वाढते, चरबीचे प्रमाण वाढून सर्व शरीराला गोलाई येते. स्तनांचा आकार मोठा होतो. डोक्‍यावरचे केस वाढतात, दाट, चमकदार होतात. त्वचेचा रंग उजळून सतेज होतो. काखेत व बाह्यजननेंद्रियावर केस येतात आणि हे सर्व बदल चालू असतानाच एक महत्त्वाचा बदल म्हणजे मासिक पाळी चालू होते.
मानसिक बदल : मुली अबोल, संकोची, आत्मकेंद्रित, त्रासिक होतात. पण स्वत:विषयी जागृत होतात. स्वत:च्या केशभूषेविषयी, वेशभूषेबद्दल जास्त सतर्क होतात. मुलांबद्दल आकर्षण निर्माण होते.
पौगंडावस्थेतील समस्या :-
1. वैद्यकीय 2. मानसिक 3. आहार 4. व्यायाम 5. व्यसन 6. मुलींवर होणारे अत्याचार
वरीलपैकी बऱ्याच समस्या केवळ योग्य समुपदेशन, मुलींवर विश्‍वास व त्यांचा आत्मविश्‍वास जागवणे यामुळे कमी होऊ शकतात. पौगंडावस्थेतील कुठल्याही समस्येमुळे मुलींचे आरोग्य धोक्‍यात येते. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाऊन त्याचे निराकरण केले पाहिजे.
1) वैद्यकीय : यामध्ये मासिक पाळीविषयी तक्रारी खूप प्रमाणात असतात. उदा. मासिक पाळी लवकर किंवा उशिरा सुरू होणे, किंवा न येणे, अनियमित रक्तस्त्राव, अतिस्त्रावी मासिक पाळी, पाळीच्या वेळी पोटात दुखणे. साधारणत: मासिक पाळी सुरू होण्याचे वय दहा ते पंधरा वर्षे आहे. जर पाळी नऊ वर्षांआधी सुरू झाली किंवा पंधरा वर्षांपर्यंत चालू झाली नाही, तसेच खूप तारुण्यपिटिका येत असतील, अंगावर जास्त केस येत असतील, लठ्ठपणा खूप वाढत असेल तर डॉक्‍टरांना भेटावे. काही वेळा जननेंद्रियामध्ये जन्मजात दोष असतो, कधी अंडकोषात गाठी होतात. अशावेळी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. अमेरिकेत ACOG 'अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्ट्रेकस्‌ ×ण्ड गायनाकॉलॉजी'च्या म्हणण्याप्रमाणे 'स्त्री'ने स्त्रीरोगतज्ज्ञांचा पहिला सल्ला वयाच्या तेरा ते पंधरा वर्षांमध्येच घेतला पाहिजे.
2) मानसिक : शरीरात होणाऱ्या बदलामुळे मुली चिडचिड्या होतात. उद्धटपणे वागतात तर कधी छोट्याशा कारणाने नैराश्‍य येते.
3) आहार : मुलींचा आहारविषयक दृष्टिकोन खूप बदललेला आहे. घरगुती, पौष्टिक आहाराविषयी अनास्था तर फास्टफूडचे आकर्षण यामुळे लठ्ठपणा वाढतोय. लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या ×निमियाचे (पंडूरोग) प्रमाण मुलींमध्ये खूप प्रमाणात आहे, तसेच कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वांची कमतरता पण आढळते. वाढत्या वयात या सर्व पोषक तत्त्वांची खूप गरज असते. त्याच्या अभावामुळे मासिक पाळीमध्ये अनियमितता येते. शरीराची प्रतिकारक्षमता कमी होते. त्यामुळे इतर आजारांना आमंत्रण मिळते.
4) व्यायाम : व्यायामाचे महत्त्व मुलींना वाढत्या वयात कळणे अत्यंत आवश्‍यक आहे. या वयातील मुलींनी कमीत कमी साठ मिनिटे जोमदार, शरीराची पूर्ण हालचाल असणारा व्यायाम केला पाहिजे.
या वयातच मुलींना योगासन, प्राणायामाची नियमित सवय लावावी. त्यामुळे मासिक पाळीविषयक तक्रारी बऱ्याच प्रमाणात कमी होतात.
5) व्यसन : पाश्‍चिमात्य संस्कृतीचे आकर्षण, मुलामुलींमधील मोकळेपणा यामुळे किशोरवयीन मुली सिगारेट, मद्यपान, हुक्का, नशायुक्त ड्रग्जना बळी पडत आहेत. त्यामुळे आरोग्य तर धोक्‍यात येत आहेच; पण अत्याचार, बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. जागतिक अहवालानुसार किशोरवयीन मुलामुलींमध्ये मोबाईल फोन हे चिंता करण्यासारखं व्यसन आहे. यामुळे मेंदूची, डोळ्यांची कार्यक्षमता कमी होत आहे. मुलींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, तिने या सर्व व्यसनांपासून दूर राहायला हवं.
6) मुलींवरील अत्याचार : बदलतं जग, व्यसन, नैतिक मूल्यांचा अभाव यामुळे कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहेत. सर्व मुलींनी भावुक विश्‍वात न जगता स्वत:च्या विकासाकडे, आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. स्वसंरक्षणासाठी सज्ज असले पाहिजे.
पौगंडावस्थेतील मुलींना घडवण्यासाठी मुलींना पालक व शिक्षक यांच्याकडून खूप सहकार्य मिळणे आवश्‍यक आहे.
आजची चिमुरडी, उद्याची माता आहे. त्यामुळे मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे, तिच्या वैद्यकीय व इतर त्रासांकडे लक्ष देणे याबद्दल पालकांनी सजग राहिले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT