किंग पेले sakal
सप्तरंग

लाँग लिव्ह किंग पेले

फिफा विश्वकरंडक १९५८ मध्ये स्वीडनमध्ये झाला

सकाळ वृत्तसेवा

- अाल्बर्ट कुलासो

फिफा विश्वकरंडक १९५८ मध्ये स्वीडनमध्ये झाला, तेव्हा मी युवाही नव्हतो, फुटबॉलचं आकर्षण मात्र निश्चित होतं. आताप्रमाणे तेव्हा झगमगाट नव्हता. स्पर्धेची माहिती वर्तमानपत्रांतून, तसंच रेडिओद्वारे तुटपुंजी मिळायची. तेव्हा एक नाव सातत्याने कानावर येत असे. ते म्हणजे पेले. ब्राझीलचा हा १७ वर्षीय खेळाडू. आम्हाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं, पण तशी माध्यमं नव्हती. स्वीडनमधील विश्वकरंडकानंतर एके दिवशी एक फ्रेंच मासिक हाती पडलं आणि मी पार हुरळून गेलो. त्या मासिकाच्या मुखपृष्ठावर ब्राझील संघातील सीनियर खेळाडू निल्टन सांतोस, गिलमार व अन्य खेळाडू पेले याला खांद्यावरून मिरवत असतानाचं छायाचित्र होतं.

या मासिकातील आतील पानावरील मजकूर ब्राझील फुटबॉल संघ व पेले याच्यावरच होता. कोण हा पेले, या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ट्रेस कोरासोएसमधील झोपडपट्टीतील धुळीने माखलेल्या रस्त्यावर वडिलांकडून फुटबॉलचे धडे घेत हा मुलगा विश्वविजेता बनला होता.

अंतिम लढतीत त्याने दोन गोल केले आणि ब्राझील जगज्जेता बनविण्यात भरपूर योगदान दिलं. तेव्हापासून पेले हे नाव कायमचं मनात घर करून राहिलं.

निस्सीम चाहता या नात्याने माझाही ऋणानुबंध जुळला; पण कधी प्रत्यक्ष भेटलो नाही, त्याचा जादुई खेळ अनुभवला. सत्तरच्या दशकात पेले भारतात आला तेव्हाही त्याच्या फुटबॉल कौशल्याने रोमांचित झालो होतो. पेले माझ्यासाठी कायमस्वरूपी आदर्श बनला. पेले खेळत असताना इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडियाचा जमाना नव्हता, तरीही जागतिक स्टार बनणारा पेले हाच पहिला फुटबॉलपटू आहे. त्याने दहाव्या क्रमांकाच्या जर्सीला नैपुण्याचं प्रतीक बनवलं. ब्राझीलच्या १९८२ मधील विश्वकरंडक संघाचे व्यवस्थापक टेले सांताना यांनी सांगितलं होतं की, ‘‘पेले अष्टपैलू होता. तो कोणत्याही जागी सहजपणे खेळू शकत असे आणि गरज भासल्यास गोलरक्षणही करायचा.’’ ब्राझीलने मेक्सिकोत १९७० मध्ये तिसऱ्यांदा विश्वकरंडक जिंकला, तेव्हा त्याचं अष्टपैलूत्व प्रखरपणे प्रदर्शित झालं. तो संघासाठी प्रेरणास्रोत, निर्माता आणि गोलस्कोअररही होता.

सुमारे दोन दशकांच्या कारकीर्दीत पेले याने क्लब आणि देशासाठी सर्व मानसन्मान मिळवले. तीन विश्वकरंडक स्पर्धा खेळलेला तो एकमेव

लाँग लिव्ह किंग पेले फुटबॉलपटू आहे. ब्राझीलियन क्लब सांतोस एफसी संघात तो १८ वर्षं होता. या कालावधीत त्याने संघाला लिबेर्तादोरेस कप आणि इंटरकाँटिनेन्टल कप जिंकून देण्यास मदत केली. बेनफिका हा माझा आवडता संघ; पण इंटरकाँटिनेन्टल कप स्पर्धेत सांतोस संघाने त्यांना ५-२ असं हरवलं, त्यावेळेस पेलेचा चाहता या नात्याने मी आवडत्या संघाचा पराभव पचवला होता.

मीच का, बेनफिका क्लबचा गोलरक्षक कॉस्ता परेरा याच्यावरही पेलेने गारुड केलं होतं. परेरा सामन्यानंतर म्हणाला होता, ‘‘महान माणसाला रोखण्याच्या सुप्त इच्छेने मी आलो होतो; पण खात्री पटली की, ज्याने माझ्यावर वर्चस्व राखलं, तो या ग्रहावर आमच्याप्रमाणे जन्मलेला नाही.’’ ब्राझीलियन अध्यक्ष जानियो क्वाद्रोस यांनी १९६१ मध्ये पेले याला अधिकृतपणे राष्ट्रीय संपत्ती जाहीर केलं, त्यामुळे तो युरोपात खेळू शकला नाही. या कारणास्तव तो कधीच बॅलॉडीओरसाठी पात्र ठरू शकला नाही. पेले याला श्रद्धांजली वाहताना ब्राझीलचा सध्याचा सुपरस्टार नेमार म्हणाला, ‘‘पेले याच्यापूर्वी फुटबॉल हा एक साधा खेळ होता. पेलेने आमूलाग्र बदल केला. त्याने फुटबॉल मनोरंजनात्मक बनवलं. तो गरीब, कृष्णवर्णीयांचा आवाज बनला आणि विशेषतः ब्राझीलला दृष्टी दिली. पेले आमच्यातून निघून गेलाय; पण फुटबॉलमधील या अद्‍भुत सम्राटाच्या आम्हा प्रजेसाठी त्याच्या स्मृती आणि त्याची महानता निरंतर अजरामर आहे.’’

लाँग लिव्ह किंग पेले!

( लेखक अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे माजी सचिव आहेत. गोवा फुटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी या नात्याने त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली आहे. )

(शब्दांकन : किशोर पेटकर )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT