social media 
सप्तरंग

Social Media Day : तुम्ही सोशल मीडियाचा की सोशल मीडिया तुमचा वापर करून घेतंय?

गौरव मुठे

ज्या गोष्टीने जगात क्रांती घडवून आणली आज तो सोशल मीडिया डे... सोशल मीडियाने आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उलथापालथीची क्रांती घडवून आणली असं देखील म्हणता येईल...

आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उलथापालथ
आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कंपन्या आपली उत्पादनं अगदी ऑफिसमध्ये बसल्याबसल्या विकता आहेत. आजूबाजूला घडणाऱ्या म्हणण्यापेक्षा जगातल्या एका कोपऱ्यात घडलेली गोष्ट अगदी काही क्षणात तुमच्यापर्यंत येऊन पोचतोय आणि राजकीय क्रांतीचं उत्तम उदाहरण म्हणजे भारतात पुन्हा एकदा निवडून आलेलं मोदी सरकार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने उत्तमप्रकारे सोशल मीडियाचा वापर करून देशाच्या कानाकोपरऱ्यापर्यंत प्रचार केला. 

तुम्हाला कधी प्रश्न पडलाय की, मी सोशल मीडिया कशासाठी वापरतोय?
मला तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही सोशल मीडियाचा वापर कशासाठी करता? तुम्ही कधी विचारला आहे हा प्रश्न स्वतःला की मी का वेळ घालवतो सोशल मीडियावर? तर उत्तर कदाचित असं मिळेल 
1. आवश्यक माहिती मिळवण्यासाठी
2.वेळ घालवण्यासाठी अर्थात टाईमपास म्हणून
3. आपल्या गोष्टी, आठवणी शेअर करण्यासाठी

पण, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फेसबुक,ट्विटर, यू टयूब, इन्स्टाग्राम आणि इतर अनेक माध्यमांचा स्वतःसाठी चांगला उपयोग करून घेताय. मात्र प्रत्यक्षात वास्तव खूपच वेगळं आहे. कारण सर्व सोशल मीडियाची माध्यमं तुमचा वापर त्यांच्या फायद्यासाठी करून घेताय.

तुमचा 'डेटा' वापरून कंपन्या कमवताय पैसा
सोशल मीडियावर तुम्ही तुमची माहिती टाकत असतात. शिवाय तुम्ही दिवासभरातील तुम्ही काय केलं,कुठे गेलात, कोणाला कुठे भेटलात ही माहिती देखील बऱ्याचदा शेअर करत असतात. मात्र याच तुमच्या माहितीचा 'डेटा' कंपन्यांना पैसे मिळवून देतात. 'सोशल मीडिया माध्यम' हे फक्त सामान्यांसाठी आहे. मात्र कंपन्यांसाठी ते निव्वळ व्यावसायिक माध्यमं आहेत. सामान्य माणसांच्या सवयी, आवडी-निवडी, त्यांचे उद्योग, व्यवसाय, खानपानाच्या सवयी या सर्व डेटाच्या आधारावर फेसबुक,ट्विटर, यू टयूब, इन्स्टाग्राम सारख्या परदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणावर पैसा कमविता आहेत. आपला तरुणांचा देश ही त्या कंपन्यांसाठी मोठी संधी आहे.

सोशल मीडिया कंपन्या तुमची माहिती वेगवेगळ्या ई-कॉमर्स कंपन्यांना पुरवत असतात. इथूनच खऱ्या वास्तवाला सुरुवात होते. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, सवयी काय आहेत. ते कुठे किती खर्च करताय. म्हणजेच जर तुम्ही एखादया मोठया हॉटेलमध्ये जेवायला गेलात किंवा एखाद्या मॉलमध्ये गेलात त्याबद्दल फेसबुक, इंस्टा किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमावर माहिती टाकली की त्यानुसार तुमचा खर्च करण्याची कितपत ऐपत आहे. तुम्ही कोणत्या क्लासमध्ये मोडतात याचा बॅकेण्डला सविस्तर डेटा तयार होत असतो आणि त्यानंतर व्यक्तीला कस्टमाइज्ड प्रोडक्टची माहिती दिली जाते. उदा. तुम्ही ऑफिसमध्ये बसल्याबसल्या एखादी टूव्हिलर किंवा एखाद्या प्रॉडक्ट्स विषयी बातमी किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला पुढच्या क्षणापासून त्यासंबंधित जाहिराती दिसायला सुरुवात होईल. इतकंच नाही तर एखाद्या जाहिरातीचा इतक्या मोठ्या प्रमाणावर भडिमार केला जाईल की तुमचं मन देखील ती घेण्यासाठी उद्युक्त होईल. शिवाय कस्टमाइज्ड जाहिराती दाखवल्या जातील की इथे ही वस्तु या किंमतीला मिळते आहे तर दुसऱ्या ठिकाणी ती अमुकच किंमतीला आहे. जेणेकरून एखाद्या ठिकाणी ती आताच स्वस्त मिळते आहे. त्यामुळे तुम्ही उद्या खरेदी करणारी वस्तु लगेच खरेदी करतात.

तुम्ही सोशल मीडियावर जेवढा वेळ अधिक घालवाल तेवढी जास्त माहिती आणि डेटा या कंपन्यांना मिळतो. यामुळे या कंपन्या अधिक चांगल्याप्रकारे तुमची माहिती घेऊन डेटा अ‍ॅनालिटिक्सच्या आधारे चांगले विश्‍लेषण करतात.

फेसबुकने मागितली माफी
गेल्यावर्षी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गने सर्वांची माफी मागितली होती. कारण होते की फेसबुकने तुमच्या माहितीचा गैरवापर केला. थोडक्यात तुमची काही खासगी माहिती फेसबुककडून लीक झाली किंवा केली गेली.

सोशल मीडियावर आपण नवीन खाते उघडताना टर्म्स अँड कंडिशनच्या रकान्यावर अगदी सर्रासपणे क्लिक करत असतो. पण तिथे आपण आपला डेटा फक्त जाहिरातीकरता वापरता येईल अशी परवानगी देत असतो. मात्र आपली इतर माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असे तिथे नमूद करण्यात आलेलं असतं. मात्र, फेसबुकला दिलेली माहिती आपल्याला न सांगता व्यावसायिक फायद्यासाठी क आणली गेली. फेसबुककडून गोपनीयतेचा भंग झाल्याने फेसबुकला जगभर माफी।मागावी लागली.

हॅलो अँलेक्सा
सध्या अमेझॉनने बाजारात 'अँलेक्सा' आणलं आहे. जे सध्या तुमचा आदेश ऐकुन तुमची आवडती गाणी किंवा एखाद्या गोष्टीबद्दल माहिती सांगते आहे. मात्र हे सगळं ते ऐकुन त्यानुसार होतं आहे. एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण जे दिवसभरात बोलतोय, एकमेकांशी संवाद साधतोय ते देखील ते यंत्र श्रवण करतंय. म्हणजे तुमचं बोलणं समजून घेऊन ते देखील एकप्रकारे माहिती 'डेटा' गोळा करतंय. त्यामुळे तुमची खूपच पर्सनल माहिती देखील भविष्यात या कंपन्यांना समजली तरी आश्चर्य वाटायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT