Amitabh Bachchan
Amitabh Bachchan Sakal
सप्तरंग

मेगास्टार ‘समांतर’मध्येही शहेनशहा...

जी. बी. देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com

टिनू आनंद दिग्दर्शित १९८९ या वर्षात आलेल्या ‘मै आझाद हूँ’ या चित्रपटात अमिताभ वेगळाच विषय घेऊन आला होता. खासगी वाहिन्या आणि इंटरनेटचे आजच्यासारखे थैमान सुरू होण्याच्या खूप आधी तेव्हाच्या दूरदर्शी मंडळींना मिडियाचा भस्मासूर होण्याचा धोका जाणवू लागला होता. या चित्रपटात अमिताभ नावाचा मेगास्टार होता म्हणून त्याला समांतर सिनेमा म्हणता येत नव्हते, इतकेच. अलीकडच्या काळात सामान्य माणसाच्या हाती रोजचा १.५ जी.बी. चा डेटा आला तसेच देशातील खासगी दूरदर्शनवाहिन्या उद्योगघराण्याच्या हाती गेल्या. परिणामी ‘मिडिया’ नावाचा लोकशाहीचा चौथा स्तंभ गोतास काळ होऊन बसला.

भांडवलदारांच्या हाती लोकशाहीचा हा स्तंभ गेल्यास त्याला वाकवून लोकशाहीच्या इमारतीची पाळंमुळं कशी खिळखिळी केली जाऊ शकतील त्याची झलक या चित्रपटात दाखविली गेली होती. प्रमुख भूमिकांमध्ये अमिताभ आणि शबाना आझमी प्रथमच एकत्र आले होते.

शबाना आझमी एका वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कार्यरत असते. त्या वृत्तपत्राच्या विक्रीत वाढ व्हावी म्हणून ती ‘आझाद’ नावाचे एक काल्पनिक पात्र तयार करून त्याच्या नावाने देशातील राजकीय भ्रष्टाचारावर प्रकाश टाकणारी एक कथा तिखट-मीठ लावून छापते. तिने छापलेल्या कथेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजते आणि वृत्तपत्राचा खप वाढू लागतो. राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगून असलेला वृत्तपत्राचा भांडवलदार मालक मनहरसिंग शबानाला ‘आझाद’च्या कथा सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करतो. आझाद हे पात्र जनतेच्या मनात रुजल्यावर ‘ हा आझाद कोण? ’ हे सांगण्याची वेळ त्यांच्यावर येते.

अमिताभ बच्चन आणि अन्नू कपूर हे दोघे तरुण गावोगाव बेकारीत फिरत असतात. शबाना अमिताभला अचूक हेरते आणि काही पैसे देऊन त्याला आझादची भूमिका पार पाडण्यास राजी करते. वृत्तपत्रातील तिच्या आधीच्या कथांत ‘आजाद’ त्याच्या मागण्या पूर्ण न झाल्यास एका निर्माणाधीन इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करेल असे शबानाने लिहून ठेवले असते. पण ती वेळ न आणता या तोतया आझादला एकदा लोकांपुढे आणून नंतर घालवून देऊ असे त्यांचे ठरते. पण मधेच घात होतो. गरिबी, भूक, बेरोजगारी आदी समस्यांचे जवळून आकलन झाल्यामुळे तोतया आझाद कठपुतळी बनायचं थांबवतो आणि प्रत्यक्षात त्या इमारतीवरून ठरल्या दिवशी उडी घेऊन प्राण देतो. त्यामुळे भांडवलदार, राजकारणी, अधिकारी आणि प्रसार माध्यम ह्यांचे मनसुबे उध्वस्थ होतात.

पूर्ण वेळ एका जुनाट ओव्हरकोट आणि गम बूट मध्ये वावरलेला अमिताभ या भूमिकेत पार बुडून गेला होता. सुरुवातीला श्रीमंतांच्या डोळे दिपवणाऱ्या दुनियेतील नवखेपण, नंतर गरीबांच्या समस्यांशी ओळख होऊ लागल्यानंतरची चिंता, सर्वसामान्यांच्या समस्या हाती घेऊन लढण्याचा निर्धार आणि धनाढ्य राजकारण्यांच्या कारस्थानाचा सुगावा लागताच जिवाची बाजी लावण्याची तयारी, इतकं सगळ करताना अमिताभ समांतर सिनेमातील तेव्हाच्या प्रस्थापित कलाकारांच्या दोन पावलं पुढे निघून गेला होता.

पंचतारांकित सुविधांचा आनंद घेत असताना, ’प्रभू, इन चीजोकी आदत पड जाती है’ असा इशारा देणारा अन्नू कपूर लक्षात राहिला होता. एका हुकूमशहाचा मूळ चेहरा कसा असतो ते मनहरसिंगने व्यवस्थित दाखवून दिले होते. शबाना आझमीने नेहमीप्रमाणे इथं उत्तमच अभिनय केला होता आणि राहिला बच्चन. लतादीदींनी शास्त्रीय गायनात रस घेतला असता तर...ह्या प्रश्ना प्रमाणेच अमिताभ समांतर चित्रपटामध्ये आला असता तर... असा प्रश्न हा चित्रपट पाहताना नक्कीच पडतो. असं वाटतं की समांतर चित्रपट अमिताभने गांभीर्याने घेतले असते तर नसीरउद्दीन शाह, ओम पुरी सारख्यांना त्या क्षेत्रात गंभीर स्पर्धा निर्माण झाली असती. रस्त्यावरच्या सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आझादच्या सर्वच छटा अमिताभने आपल स्टारडम सांभाळत पूर्ण ताकदीने व्यक्त केल्या होत्या. विद्यार्थी, शेतकरी, कामगार अशा सामान्य जनांच्या समुहाला चेतविण्याची क्षमता असणारे कैफी आजमी लिखित ‘इतने बाजू, इतने सर, गीनले दुश्मन ध्यानसे, हारेगा वो हर बाजी जाब खेलेंगे हम जी जान से ’ हे अमिताभने गायलेले गीत आणि जावेद अख्तरचे संवाद चित्रपटाचा आत्मा ठरले होते. राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा सर्वच स्तरांवर स्थिती कितीही गंभीर असो, सामान्य माणसाच्या ताकदीचे महत्व अधोरेखित करणारा अमिताभचा ‘आझाद’ जमिनीवरचा सुपर हिरो शाबित झाला होता.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT