

ऊसदराबाबत बुधवारी (ता. ५) थेट मुख्यमंत्र्यांनाच जाब विचारणार आहे, असा थेट इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
esakal
प्रमुख मागण्या
एफआरपी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने रद्द करा
शेतकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नयेत
कारखान्यांच्या लेखापालांवर कारवाई करा
Kolhapur Sugar Factory Owners : कोल्हापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी मागील हंगामाची एफआरपी थकवली आहे. त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. एफआरपीपेक्षा कमी दर जाहीर करणे कायद्याचा भंग आहे. असे करणाऱ्या तीन कारखान्यांना तुम्ही नोटीस काढली नाही. गेल्या हंगामातील आरएसएफ (रेव्हिन्यू शेअरिंग फॉर्म्युला) नुसार २०० रुपये दिले नाहीत. कायदा फक्त शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना नाही का? आता ऊसदराबाबत बुधवारी (ता. ५) थेट मुख्यमंत्र्यांनाच जाब विचारणार आहे, असा थेट इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ऊसदर बैठकीत ते बोलत होते.