Desh Premee
Desh Premee Sakal
सप्तरंग

...आणि विनोदाचाही अवकाश व्यापला

जी. बी. देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com

पडद्यावरील अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’ समाजवादी होता. गरीब, वंचितांच्या बाजूनं अन्यायाविरुद्ध बेधडक उभा ठाकणारा, आपल्या पद्धतीनं न्याय मिळवून देणारा आणि प्रस्थापितांची अक्षरश: धुलाई करणारा सलीम-जावेदचा मानसपुत्र ‘विजय’ स्वातंत्र्य, समता आणि धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कर्ता होता. भोवताली माजलेली बजबजपुरी, सडलेली व्यवस्था आणि गरिबांचा कुणी वालीच नाही की काय, अशा वातावरणानं संत्रस्त सामान्य माणसाची खदखद जेव्हा अमिताभच्या माध्यमातून जोरकसरीत्या बाहेर पडायची, तेव्हा समोरच्या रांगेतील प्रेक्षक सुखावून जात असे. ह्या व्यवस्थेविरुद्ध काहीच करता येत नसल्याच्या नैराश्यात अडकलेला अतिसामान्य गरीब प्रेक्षक अमिताभचा बिनधास्त नायक पडद्यावर बघून तेवढा वेळ का होईना, फुशारून जात असे.

मनमोहन देसाईंनी १९८२ मध्ये देशभक्तीवर आधारित ‘देशप्रेमी’ हा चित्रपट आणला. देशभक्तीच्या चित्रपटांचं अलिखित पेटंट तसं मनोजकुमारकडं होतं. चित्रपटात स्वत:चं नाव भारत ठेवून घेतलं, की नंतर मनोजकुमार त्याच्या चित्रपटात सगळे मसाला आयटम युक्तीनं पेरायचा. सायरा बानो, झीनत अमान, इतकंच काय हेमामालिनीलासुद्धा देशभक्तीच्या चित्रपटात मनोजकुमारनं पावसात भिजवलं होतं. पण देशभक्ती ह्या विषयातल्या सवंगपणात मनोजकुमारवर मात केली ती मनमोहन देसाईंनी. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ऐंशीच्या दशकापर्यंत चालणार्‍या ‘देशप्रेमी’च्या कथेत त्यांनी दोन अमिताभ फिट्ट केले होते. गांधीजींच्या ‘चले जाव’ आंदोलनात सामील झालेला स्वातंत्र्यतासेनानी मास्टर दीनानाथ हा पहिला अमिताभ. देसाईंनी तोंडी लावण्यापुरते ‘चले जाव’ आंदोलनाचे संदर्भ वापरले आणि नंतर मोठ्या खुबीनं गाडी वळवली त्यांच्या लाडक्या ‘लॉस्ट अँड फाउंड’ फॉर्म्यूल्याकडं. आदर्शवादी स्वातंत्र्यतासेनानी दीनानाथांच्या आदर्शवादाला कंटाळलेला त्यांचा टपोरी मुलगादेखील साकारला होता अमिताभनंच. पावणेतीन तासांच्या ह्या सिनेमात अमिताभच्या दुहेरी भूमिकेमुळं प्रेक्षकांना विना अमिताभची फ्रेम सहन करावी लागली नाही. सुरुवात आणि शेवट वगळता ‘देशप्रेमी’ असं सिनेमाचं नाव का असावं, हे कोडं अद्यापही सुटलेलं नाही.

अमिताभच्या अफाट क्षमतेचा वापर करून घेण्याची कला देसाईंना पूर्णत: अवगत होती. मेहमूदनं ‘गुमनाम’ चित्रपटात हैदराबादी बटलरच्या वेशातील ‘हम काले है तो क्या हुवा दिल वाले है’ ह्या गाण्यावर केलेला लुंगी डान्स अमिताभला ‘खातून की खिदमत में सलाम अपुनका’ ह्या गाण्यावर देसाईंनी करायला लावला आणि प्रेक्षागृहात धमाल झाली. त्या आधीच्या दशकात मेहमूदमुळं विनोदी कलाकारांना सेलिब्रिटी दर्जा प्राप्त झाला होता. ‘हम काले है तो’ गाण्यातील गबाळा मेहमूद आणि नाजूक, सुंदर, आकर्षक हेलन यांनी मजा आणली होती. तो हैदराबादी माहौल कुणी पुन्हा साकारू शकेल ही कल्पनासुद्धा हास्यास्पद ठरली असती. पण अमिताभनं ‘ओय पोट्टी, खादीम के हाता से मुँह मे डालको चबायेंगे क्या...पान’ सारख्या रॅप रचनेवर ह्या गाण्यापुरतं रंगवलेलं हैदराबादी पात्र मेहमूदच्या तोडीचं होतं. किशोरकुमारच्या आवाजातील ‘ताने दिन तंदाना’ आणि लक्ष्मीकांत- प्यारेलाल जोडीतील लक्ष्मीकांतनं मधे-मधे हैदराबादी हिंदीत उच्चारलेल्या ओळी कमालीचा परिणाम साधून गेल्या. वेगळ्या विनोदी कलाकाराचा हिंदी चित्रपटातला अवकाश अमिताभच्या चतुरस्र अदाकारीनं झाकोळला गेला होता. ह्याशिवाय ‘जा जल्दी भाग जा, नही बाबा नही’ हे विनोदी संवादात्मक गाणं करताना अमिताभनं रंगत आणली होती. तोतया इन्स्पेक्टर बनलेला अमिताभ खऱ्या पोलिस अधिकाऱ्यास (नवीन निश्चल) ‘जा तुझे छोड दिया, पहेली बार माफ किया’ असं म्हणतो तेव्हा धमाल होते.

मात्र, या चित्रपटाच्या संकल्पनेशी जोडलेलं गाणं होतं, ‘मेरे देशप्रेमीयों आपस में प्रेम करो, देशप्रेमीयों’. देशावर प्रेम करणं म्हणजेच देशातील आपल्या बांधवांवर प्रेम करणं, असा उच्च कोटीचा संदेश हे गाणं देतं. अत्यंत साध्या शब्दांत आनंद बक्षी यांनी देशप्रेमाची भावना या गीतामधून व्यक्त केली होती. मोहम्मद रफीचा खणखणीत आवाज आणि लक्ष्मी-प्यारेची सहजसोपी चाल, यामुळं हे गाणं श्रवणीय झालं आहे.

''नफरत की लाठी तोडो, लालच का खंजर फेको,

जिदके पिछे मत दौडो, तुम प्रेमके पंछी हो

मेरे देशप्रेमीयों, आपस में प्रेम करो''

असा संदेश लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला अमिताभ देतो, तेव्हा सामान्य प्रेक्षकांच्या शरीरावर देशभक्तीचे रोमांच उठल्याशिवाय राहत नाही. देशातील आजच्या परिस्थितीत वरील भावना अधिक ठळकपणे बिंबवण्याची गरज आहे.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT