‘काला पत्थर’मध्ये अमिताभ बच्चन व राखी. 
सप्तरंग

नायकालाच अपराधाची बोच...

जी.बी.देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com

स्वतःवरच नाराज असलेला धुमसता नायक म्हणजे १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काला पत्थर’ची कथा. नायक विजय (अमिताभ) पश्‍चात्तापाच्या आगीत होरपळत असतो. त्यामुळं सुरुवातीला अगदी कमी बोलणारा नायक हे वेगळेच प्रकरण होते. एका प्रवासी जहाजाचा कप्तान असताना वादळात सापडलेल्या जहाजावरून तो पळ काढतो. जिवावर उदार होऊन प्रवाशांना वाचविण्याचं कर्तव्य न बजावता ऐन वेळी कच खाण्याची महाभयंकर चूक त्याच्या हातून झालेली असते. जीवन सार्थक करण्याची संधी गमावल्यानंतर त्या एका चुकीचं प्रायश्‍चित्त करण्याच्या हेतूने हा तरुण सगळ्या सुखाचा त्याग करून कोळसा खाणीत खाण मजुराचं खडतर जीवन स्वीकारतो.

बिहारच्या धनबाद जिल्ह्यात चासनाला भूमिगत कोळसा खाणीत पाणी घुसून १९७५ मध्ये साडेतीनशे खाण कामगार ठार झाले होते. पाणीउपसा करणारे पंप परदेशातून येईपर्यंत सुमारे तीन महिन्यांचा काळ लोटला आणि त्या भीषण अपघातातील बळींचे मृतदेहसुद्धा धडपणे हाती आले नव्हते. या सत्य घटनेवर सलीम-जावेद यांची कथा बेतलेली होती. चित्रपटासाठी पटकथा तयार करताना मानवी स्वभावाचे विविध पैलू दर्शविणारी काही पात्रं त्यांनी उभी केली होती. ओव्हर ॲक्टिंगमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारा शत्रुघ्न सिन्हा तुरुंगातून पळून आलेला कैदी झाला होता. ‘काला पत्थर’ अमिताभनं आपल्या खांद्यावर उचलून नेला होता. जोरदार मुद्राभिनय आणि गंभीर संवादफेकीच्या बळावर त्यानं तो चित्रपट खिशात घातला होता. अमिताभवर चित्रित झालेल्या अनेक क्लोज-अप दृश्यात तुम्हाला जहाजाच्या पळपुट्या कप्तानाच्या डोळ्यांतील पश्‍चात्तापाची खंत दिसून येते, अन्यायाविरुद्ध हृदयात पेटलेल्या ज्वालामुखीची धग दिसते. शत्रुघ्न सिन्हाचे उठवळ पात्र ज्या नाटकीपद्धतीने हालचाली करते, काहीशी बालिश वाटतील अशी कृत्यं करत असते त्याविषयी प्रेक्षकांना तिटकारा येतो.

कर्तव्याला चुकलेल्या, व त्यातून आलेला न्यूनगंड घालवण्यासाठी एका शिकलेल्या युवकाने प्रायश्‍चित्त घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतो, पण इथं खासगी खाणमालकांकडून नफेखोरीकरिता होणारं मजुरांचं शोषण पाहून विजय आपोआपच खाण कामगारांच्या कष्टप्रद जीवनाचा आधार होतो.

स्वत:बाबत ‘‘कुछ लोग ऐसे भी तो होते है, जो कहीके नहीं होते’’ असा नैराश्यभाव आलेला हा नायक प्रत्येक प्रकारचे दु:ख स्वत:कडं घ्यायचा प्रयत्न करतो. खाणीतील एका घटनेत जखमी झाल्यांनतर भूल दिल्याशिवाय उपचार करण्याचा आग्रह धरतो तेव्हा उपचार करणारी राखी भूल दिल्याशिवाय खूप त्रास होईल असे सांगण्याच्या प्रयत्न करते, तेव्हा चिडून ‘‘व्हाय डोंट यू अंडरस्टँड?’’ असं म्हणते तेव्हा ‘‘माय पेन इज माय डेस्टिनी अँड आय कान्ट अॅव्हॉइड इट ’’ हे त्याचे वाक्य त्याच्या आयुष्याचं सार सांगून जातं. खाणीतील कोळशाच्या काळ्या डागांनी चेहरा आणि कपडे माखलेला एक मजूर अस्खलीत इंग्रजी बोलत आहे हे बघून, त्या वाक्याचा अर्थही न समजलेले अर्धेअधिक प्रेक्षकसुद्धा अमिताभवर जीव ओवाळून टाकण्यास तयार होतात.

या प्रसंगात दु:ख सहन करण्याचा निर्धार अमिताभनं जो डोळ्यांतून व्यक्त केला आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. शत्रुघ्न आणि अमिताभची आपसांतील खुन्नस आणि तिच्यातून निर्माण होणारा तणाव प्रेक्षकांना वेगळाच आनंद देतो. खाणीसाठी काही यंत्रसामग्री आणण्यासाठी एकदा अमिताभ आणि शत्रुघ्न ट्रकमध्ये बसून शहराकडे जात असता, शत्रुघ्न हटवादीपणानं ट्रकची चावी काढून एका ढाब्यावर टाइम पास करत असतो तेव्हा अमिताभ त्याला तिथंच सोडून शहरातील काम उरकतो आणि परत येतो. परतीच्या प्रवासात रस्त्यात उभ्या असलेल्या शत्रुघ्नला पुन्हा ट्रकमध्ये घेत असताना ज्या पद्धतीने अमिताभनं ट्रकचा गिअर टाकतो, ती एक ॲक्शन, तो एक खटका हृदयात घर करून बसतो. यश चोप्रांसारख्याचे दिग्दर्शन, सलीम-जावेदचे गोळीबंद संवाद हे सगळं चोख काम करतातच; पण या सगळ्यापेक्षा दशांगगुळं वरचढं ठरतो तो फक्त अमिताभ !

राजेश रोशनच्या छानशा चालीवर किशोरकुमारने गायलेले कर्णमधूर ‘इक रास्ता है जिंदगी’ हे गाणं हँडसम शशीकपूरवर छानपैकी चित्रित झालं होतं. खाणीत पाणी घुसण्याचा क्लायमॅक्स सुद्धा तेव्हा उपलब्ध तंत्रज्ञानाच्या तुलनेत उत्तमच साधला गेला होता. मात्र ‘काला पत्थर’मध्ये अमिताभच्या डोळ्यांतल्या पश्‍चात्तापाच्या धगीनं जो पडदा व्यापला गेला त्यात बाकी सगळं झाकोळून गेलं होत. ही धग कमी करण्यासाठीच जणू १९८१ मध्ये यश चोप्रांनी अमिताभला रोमँटिक अशा ‘सिलसिला’मध्ये प्रेमळ नायकाच्या भूमिकेत सादर केलं असावं. 

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : सुनेने दाखल केलेल्या दाव्यातून वगळण्याचा माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह इतरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

जेवताना उचकी लागली, नंतर नाकातून रक्त आलं अन्...; कॉलेजमध्येच विद्यार्थिनीसोबत अघटीत घडलं

DK Shivakumar's Escort Car Overturns: मोठी बातमी! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट कार महामार्गावर उलटली!

Latest Maharashtra News Updates : वडगाव येथे केळीच्या बागेत अर्भक सापडले

Narendra Modi: मोदींच्या सभेत महिलांचं 'खुर्ची युद्ध'! एकमेकींच्या डोक्यात घातल्या चेअर, Video Viral

SCROLL FOR NEXT