Amitabh Bachchan and Hema Malini Sakal
सप्तरंग

निवृत्तांना आत्मविश्‍वासाची पालवी !

विसाव्‍या शतकाच्या शेवटापर्यंत माणूस नोकरीतून निवृत्त झाला की, त्याच्या आयुष्यात सगळं काही झालं, असं इतरांना तर वाटायचंच; पण त्याला स्वतःलासुद्धा ते मान्य असायचं.

जी. बी. देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com

विसाव्‍या शतकाच्या शेवटापर्यंत माणूस नोकरीतून निवृत्त झाला की, त्याच्या आयुष्यात सगळं काही झालं, असं इतरांना तर वाटायचंच; पण त्याला स्वतःलासुद्धा ते मान्य असायचं.

विसाव्‍या शतकाच्या शेवटापर्यंत माणूस नोकरीतून निवृत्त झाला की, त्याच्या आयुष्यात सगळं काही झालं, असं इतरांना तर वाटायचंच; पण त्याला स्वतःलासुद्धा ते मान्य असायचं. वर्ष २००३ मध्ये अमिताभने साठी गाठली आणि बी. आर. चोपडांचे चिरंजीव रवी चोपडांच्या दिग्दर्शनाखाली ‘बागबान’ चित्रपटात तो झळकला. चाळीस वर्षं एका बँकेत नोकरी करून निवृत्त झालेल्या सेवानिवृत्ताची भूमिका या चित्रपटात अमिताभच्या वाट्याला आली आणि तेव्हापासून ‘वय म्हणजे केवळ एक आकडा आहे, अधिक काही नाही’ हा वाक्‍प्रचार भारतातील बुद्धी नाठी झालेल्या सगळ्या साठीवाल्यांच्या डोक्यावर स्वार झाला; आणि का होऊ नये? ‘बागबान’ चित्रपटात एक मध्यमवर्गीय पेन्शनर असूनही सदासर्वकाळ थ्री पीस सूटमध्ये वावरणारा रुबाबदार, ऊर्जावान अमिताभ; आणि लग्नाला चाळीस वर्षं होऊन नात लग्नाला आलेली असताना, स्वप्नसुंदरीचं बिरुद जराही फिकं न पडू देणारी हेमा मालिनीसारखी प्रेमळ बायको असेल, तर ‘आपलं सगळं आटोपलं’ असं त्या पेन्शनरला का वाटावं? अमिताभने ‘बागबान’मधील निवृत्त बँक अधिकारी राज मल्होत्रा रंगवला आणि भारतातील सगळ्या पेन्शनरांनी जणू कात टाकली. ज्येष्ठ नागरिकांमध्ये जगण्याचा नवीन उत्साह, नवीन ऊर्मी उफाळून आल्या; पण ‘बागबान’ची मूळ कथा ही केवळ अमिताभ-हेमामालिनीची निवृत्तीनंतरची प्रणय-कथा नव्हती, तर बी. आर. चोप्रांच्या चित्रपटांतल्या परंपरेप्रमाणे तिच्यातून ठोस सामाजिक संदेश दिला गेला होता.

अमिताभ आणि हेमामालिनी चाळीस वर्षांच्या संसारातून चार मुलं, तीन सुना आणि दोन नातवंडं इतका पसारा वाढल्यानंतर आणि सगळी मुलं घर सोडून बाहेरगावी उपजीविकेसाठी गेल्यानंतर एक समाधानी आयुष्य जगत असतात. मित्राच्या मालकीच्या भाड्याच्या घरात त्यांचं पूर्ण आयुष्य गेलेलं असतं. आयुष्यभर मुलांना त्यांच्या पायावर उभं करण्याच्या नादात निवृत्तीच्या वेळी या दाम्पत्याकडे कुठलीही शिल्लक उरत नाही. आपली मुलंच आपली संपत्ती आहेत, या भावनेने त्यांच्यासोबत उर्वरित जीवन व्यतीत करण्याचा इरादा हे दोघं मुलांपुढे व्यक्त करतात आणि मुलांचं खरं रूप बाहेर येतं. आईने सहा महिने एकाकडे व वडिलांनी दुसऱ्याकडे अशा क्रमाने रहावं, असा प्रस्ताव मुलं देतात. पहिल्या सहा महिन्यांतच हे नवरा-बायको स्वप्नातून वास्तवात येतात आणि पुन्हा जुन्या घरात आपलं आपण एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. चारीच्या चारीही मुलं इतकी वाईट निघावीत, हे मनाला पटत नाही; पण मुद्दा पटवून घेण्यासाठी ते स्वीकारावं लागतं. या दरम्यान, अपत्यहीन दाम्पत्य परेश रावल आणि त्याच्या पत्नीचा प्रेमळ सहवास अमिताभला लाभतो. पत्नी हेमामालिनी दुसऱ्या मुलाकडे रहायला गेलेली असताना झालेल्या विरहयातनांच्या धगीत अमिताभने लिहिलेली त्याची जीवनकहाणी ‘बागबान’ ह्या नावाने प्रसिद्ध होते. हे लिखाण अमिताभने परेश रावल दाम्पत्याच्या मालकीच्या कॅफेटेरियामध्ये बसून त्यांच्या प्रेरणेने केलेलं असतं. एक पाश्चिमात्य प्रकाशन कंपनी हे पुस्तक प्रकाशित करते आणि त्या मिळकतीतून त्यांच्या भविष्याच्या चिंता सुटतात. सिनेमात एक उपकथा सलमान खानचीसुद्धा होती. अमिताभने स्वतःच्या चार मुलांशिवाय या अनाथ मुलाला आधार दिलेला असतो. शेवटी सख्ख्या मुलांऐवजी हा मुलगा आणि त्याची बायकोच त्यांच्या मानलेल्या या माय-बापांना योग्य तो सन्मान देतात. सलमान खानच्या पब्लिकमधील भाईगिरीला शोभू नये इतकी ही सभ्य भूमिका होती.

पुढे काय घडणार याचा अंदाज लागण्यासारखी ही कथा होती; पण या चित्रपटाला ग्लॅमर लाभलं होतं सुंदर हेमामालिनी आणि आकर्षक अमिताभमुळे. स्वप्नसुंदरी हेमामालिनी सर्वांत सुंदर ज्या चित्रपटांमध्ये दिसली असेल, त्यातील हा एक चित्रपट होता. अमिताभ बच्चनच्या आवाजातील चार श्रवणीय गाणी होती. ‘सोणी तेरी चाल सोणीये’, ‘होरी खेले रघुवीरा अवध मे’ इ. गाण्यांत अमिताभ आणि हेमाची केमिस्ट्री लाजवाब ठरली होती. साठीत पोहोचलेल्या अमिताभ-हेमाने इतक्या दिमाखदारपणे या भूमिका साकारल्या होत्या, की त्याची तोड मिळणे कठीण. पण, या चित्रपटाचं ठळक आकर्षण ठरलं होतं ते शेवटाला अमिताभने त्याच्या सत्कार समारंभात केलेलं भाषण. साडेआठ मिनिटांचं अखंडपणे चित्रित करण्यात आलेलं हे स्वगत, अमिताभच्या चेहऱ्यावर थेट कॅमेरा लावून चित्रित करण्यात आलं होतं. कॅमेऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून इतकं दीर्घ, भावनाप्रधान स्वगत सादर करणं, ही एक कमाल होती.

‘एक बाप अगर अपने बेटे की जिंदगी का पहला कदम उठाने में उसकी मदत कर सकता है... तो वोही बेटा अपने बाप के आखरी कदम उठाने में उसे सहारा क्यो नही दे सकता?’

‘मा-बाप जिंदगी की पेड की जड है. पेड चाहे कितना भी हरा-भरा हो जाये, लेकीन उसकी जड काटने से वो हराभरा नही रह सकता.’

‘तुम हो तो हम है... हम है तो सब कुछ है... वरना कुछ नही, कुछ भी नही.’

तोपर्यंतच्या जीवनातील अनुभवांतून आलेले सगळे भाव क्रमाक्रमाने अमिताभच्या चेहऱ्यावर येत जातात. त्यात निष्कपट मनाच्या माणसांविषयी आदर, म्हाताऱ्या आई-वडिलांप्रती मुलांच्या असभ्य वागणुकीविषयी घृणा, आयुष्याच्या जोडीदाराविषयीची प्रेम आणि कृतज्ञतेची भावना; आणि म्हातारे झालो म्हणून कामातून गेलो असं कुणी समजू नये, असं सांगणारा दुर्दम्य आत्मविश्वास... इतके विविध भाव अमिताभच्या चेहऱ्यावर, डोळ्यांत स्फटिकासारखे स्वच्छ वाचता येतात. ‘बागबान’ चित्रपट या दृश्यातील अमिताभच्या साडेआठ मिनिटांच्या सलग स्वगतासाठी बघावाच. डॉ. अचला नागर या लेखिकेने ‘बागबान’ची कथा लिहिली होती; पण भावनांनी ओथंबलेलं शेवटचं स्वगत सलीम-जावेद ह्यांनी लिहिलं होतं, असं म्हटलं जातं. कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ ह्या मराठी नाटकातील ‘ताट द्यावं, पाट देऊ नये’ ह्या उक्तीचा विस्तार होता ‘बागबान’ चित्रपट. मुलांवर प्रेम करा, त्यांच्या पाठीशी उभं राहा, त्यांना पायावर उभं राहण्यास मदत करा; पण म्हातारपणासाठी त्यांच्यावर विसंबून राहण्याची वेळ येऊ देऊ नका, हा मथितार्थ.

वृद्ध झालेल्या आई-बापांना तरुण मुलांनी योग्य तो मान-सन्मान आणि आदर देण्याचा संदेश देणाऱ्या ह्या चित्रपटाचा अर्क उतरला होता अमिताभच्या शेवटच्या दीर्घ स्वगतात.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे जाणकार अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT