सप्तरंग

जाणून घ्या आजचे राशी भविष्य : 6 जुलै

सकाळ वृत्तसेवा

मेष : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. काही निर्णय धाडसाने घ्याल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. विरोधकावर मात कराल. मित्रांचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. 

वृषभ : आरोग्य चांगले राहील. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. मुलामुलींची प्रगती होईल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष फायदा होईल. 

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. मनोरंजनावर अधिक खर्च कराल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष आर्थिक लाभ होतील. 

कर्क : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल. शासकीय कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. व्यवसायात धाडस टाळावे. प्रॉपर्टीची कामे दिरंगाईने होणार आहेत. 

सिंह : आरोग्य चांगले राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. कटू बोलणे टाळावे. त्यामुळे शत्रुत्व निर्माण होईल. 

कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च होईल. 

तूळ : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. काहींना एखादी अधिकाराची जागा लाभेल. कर्तृत्त्वाला संधी मिळणार आहे. 

वृश्‍चिक : व्यवसायात वाढ होईल. तुमच्या राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. 

धनू : अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळवू शकाल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता राहणार आहे. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. 

मकर : तुमचे निर्णय अचूक येतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. शत्रुपिडा नाही. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल. 

कुंभ : उत्साह, उमेद वाढेल. लोकांना मदत कराल. कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. मनोरंजनाकडे अधिक लक्ष द्याल. मनोरंजनाच्या क्षेत्रातील व्यक्‍तींनी विशेष सावधगिरी बाळगावयास हवी. 

मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. कौटुंबिक सौख्य चांगले राहणार आहे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात विशेष कामगिरी करू शकाल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

Pune Bengaluru Highway: गणपती बाप्पांना निरोप अन् परतीच्या प्रवासात कोंडी! आनेवाडी टोलवर ५ किमी वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT