Rashi Bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य : 27 जून

सकाळ डिजिटल टीम

आजचे दिनमान 
मेष : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. आर्थिक कामे उरकून घ्यावीत. भागीदारी व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे. मनोबल वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. 

वृषभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभणार नाही. प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. प्रॉपर्टीचे व्यवहार विलंबाने होणार आहेत. विरोधकावर मात कराल. 

मिथुन : उधार, उसनवारी वसूल होईल. व्यवसायातील तुमचे निर्णय अचूक ठरतील. व्यवसायवाढीच्या दृष्टीने काही नवीन संबंध प्रस्थापित करू शकाल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष लाभ होतील. 

कर्क : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात यश लाभेल. नवे स्नेहसंबंध जुळतील. सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. 

सिंह : दानधर्म कराल. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना कामामधील अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. व्यवसायात तुम्हाला मनासारखे लाभ होतील. 

कन्या : काहींची परिचित व्यक्‍तींकडून फसवणुकीची शक्‍यता आहे. जबाबदारी वाढेल. कामाचा ताण वाढेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. कर्तृत्वाला संधी मिळेल. 

तुळ : उत्साह, उमेद वाढेल. तुम्ही आपले विचार व मते इतरांना पटवून द्याल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍ती विशेष यश संपादन करतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

वृश्‍चिक : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. आरोग्य उत्तम राहील. काहींच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. 

धनू : मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. कोणत्याही क्षेत्रात धाडसी निर्णय घेऊ नका. खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. 

मकर : कौटुंबिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. शत्रुपिडा नाही. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

कुंभ : हितशत्रूंच्या कारवाया बंद पाडण्यात यशस्वी व्हाल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. बोलण्यामध्ये कडकपणा टाळावा, अन्यथा कटू बोलण्यामुळे शत्रूत्व निर्माण कराल. 

मीन : आरोग्य उत्तम राहील. भागीदारी व्यवसायात चांगले वातावरण राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी आतुर ! अमेरिकेने इराणला पाठवला १५ कलमी शांतता प्रस्ताव, काय आहेत अटी ?

Chhatrapati Sambhajinagar: हॉटेल सहा हजार, सिलिंडर बाराशेच! हिशेब जुळेना ; पथके करतात तरी काय?

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

Chhatrapati Sambhajinagar:अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती शहरात; धार्मिक वातावरणाची निर्मिती

Chhatrapati Sambhajinagar: संलग्नीकरणाची शुल्कवाढ स्थगित; चार सदस्यीय समिती स्थापन, पुढील बैठकीत होणार निर्णय

SCROLL FOR NEXT