How Shabbir Sayyad worked hard and Government recognised it with Padma Shri 
सप्तरंग

'पद्मश्री'पर्यंत पोचलेला अत्यंत साधा माणूस.. शब्बीर सय्यद मामू!

सूर्यकांत नेटके

मच्या शिरूर कासार जवळच्या दहीवंडी गावातील निस्वार्थीपणे गोरक्षण करणारे शब्बीर सय्यद मामु यांना आज भारत सरकारचा पद्मश्री हा मोठा बहुमान जाहीर झाला आणि तो 2007 सालचा तो दिवस आठवला.

पहिली बातमी मी 'सकाळ'' मध्ये प्रकाशित केल्याचा आनंद लपवू शकत नाही. पत्रकाराने एखादे काम समाजासमोर आनले तर ते पद्म पुरस्कारापर्यत जाऊ शकते हे मामुच्या रूपाने स्पष्ट झाले. 

मी शिरूर कासारला 'सकाळ'ला तालुका बातमीदार म्हणून काम करत होतो. पत्रकार म्हणून मान सन्मान मिळत असला तरी आर्थिक बाजूने कमकुवतता.  2007 साली पशुगनणा होती. त्यामुळे पत्रकार म्हणून मिरवत असताना पैसेही मिळावेत या हेतूनेही कामाचा शोध सुरू असायचा.

मित्र असलेले शिरूर कासारचे तत्कालीन पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. धिमधिमे यांनी पशुगणनेचे काम दिले. त्यात माझ्या गावासह दहीवंडीही गाव होते. तेथे पशुगणना करायची असल्याने ओळखीचे कोणी तरी असावे म्हणून मित्र  बाळासाहेब उत्तम बडे याला बरोबर घेतले. पशुगणना करताना करताना मामुच्या गाई दिसल्या. बाळुला विचारले आणि मामुचे गोरक्षणाची माहिती मिळाली.

घरी गेलो, तासभर चर्चा केली. एक चांगली बातमी मिळाल्याचा आनंद झाला. बातमी कोणाला सांगायची नाही हे बाळूला ठासून सांगितले. दुसरया दिवशी सकाळ मध्ये पहिल्या पानावर बातमी आली. माझ्या बरोबर सातत्याने असणारे स्व. विजयकुमार झिंजुर्डे यांनाही बातमीची खबर लागू दिली नाही.  

लोकांतून आणि 'सकाळ'कडून कौतुक झाले. 'सकाळ'ला बातमी आल्यावर दोन दिवसानी बीडवरून पत्रकार संजय मालानी, लैलेश बारगजे, गोविंद शेळके, ल अतुल कुलकर्णी, शशि केवडकर आले आणि सगळ्या वृत्त वाहिन्यांवरही मामु झळकले.

मामुच्या गाई चरायला कासटचे माळरान होतेच. पण जनावरांना निवारा असावा म्हणून पुण्यातून निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आणि आमच्या गावचे जयश कासट यांनी आर्थिक मदत दिली. मी स्वतः उभा राहून पंधरा दिवसांत निवारा शेड उभारले. हौद बांधला. नंतरही बरयाच वेळा गरजेनुसार बातम्या छापल्या.

जयश कासट ही सातत्याने मदत करतच होता. त्यावेळी बातम्यावर  टीका टिप्पणीही होत होती.  कृतज्ञता म्हणून मामुनी जयश व माझे नाव असलेला बोर्ड लावला. (आजही माझे व जयश कासटचे नाव असलेला घरासमोर बोर्ड उभा आहे)

मामु सतत भेटतात. आठ दिवसापूर्वी गावी गेलो भेट झाली. विचारपुसही केली. मामुचे गोरक्षण भरभराटीला यायला जयश कासट आणि परिवाराचा मोठा वाटा आहे. 

आज मामुला भारत सरकारचा पद्मश्री सन्मान जाहीर झाला आणि तो दिवस आठवला.

पद्मश्री मिळालेल्या मामुची पहिली बातमी छापून काम समाजासमोर आणल्याचा आणि बातमी आल्यावर भरभरून मदत करणारे जयश कासट यांना झालेला आनंद किती मोठा असेल. ग्रामीण भागातील एक साधा- सुधा पत्रकार चांगलं काम बातम्यातून समाजासमोर आणू शकतो आणि त्या माणसाला भारत सरकारचा पद्मश्री मिळू शकतो.
हे जिवंत उदाहरण पद्मश्री शब्बीर सय्यद मामु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chardham Yatra: नव्या वर्षात बदरी-केदारसह चारी धामांमध्ये मोबाईल नेण्यास बंदी; रीलवर प्रशासनाची कडक 'नजर'

Latest Marathi Live Update: मुख्यमंत्री फडणवीसांकडून गणेश नाईक यांचे कौतुक

CM Yogi Lion Chair: योगी आदित्यनाथ बसणार सिंहासनावर! उत्तराखंडशी आहे स्पेशल कनेक्शन, खुर्चीची वाचा वैशिष्ट्ये

BMC Mayor Politics : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या महापौर पदाची परंपरा कायम राहणार? राजकीय हालचालींना वेग

धक्कादायक घटना! अमरावतीत हॉटेलमध्ये पर्यटक युवतीवर अत्याचार; परप्रांतीय युवती महाराष्ट्रात फिरण्यासाठी आली अन् काय घडलं..

SCROLL FOR NEXT