शिल्पा
शिल्पा  sakal
सप्तरंग

कंपनीची स्थापनाच जपानमध्ये!

प्राची कुलकर्णी-गरुड prachihere@gmail.com

आयटी कंपन्यांमध्ये अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं घेतली की, त्यांत महिलांची संख्या तुलनेने कमीच आढळते. एखादीच शेरील सॅंडबर्ग थेट सीओओ होत बिलियनेअर्सच्या यादीत जाऊन बसते. पण, शिल्पा व्यापारींनी नुसतं हे समीकरण मोडीतच काढलं नाही, तर थेट वयाच्या २६ व्या वर्षी स्वतःची कंपनी सुरू करत जपानमध्ये व्यवसाय करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मानसुद्धा मिळवला.

व्यापारी मूळच्या पुण्यातल्या. त्यांची आई कलाकुसरीचे क्लास चालवायच्या. या क्लासची जाहिरात द्यायला जाणं - कमी शब्दांत ती बसवणं, त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करणं हे काम लहानपणापासूनच शिल्पा करत होत्या. हा व्यवसाय करता करता त्यांच्या आईने पुण्यातील प्रसिद्ध ज्ञानदीप शाळा सुरू केली. या शाळेच्या आज चार शाखा आहेत. शिल्पा यांना व्यवसायाचं बाळकडू मिळालं ते असं काहीसं.

लहानपणापासून त्यांना विज्ञानाची गोडी होती. पुण्यातल्या ज्योतिर्विद्या परिसंस्थेत जाऊन आकाशदर्शन करणं अशा सगळ्या गोष्टी सुरू होत्या. पुण्यातल्याच सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून त्यांनी बारावी पूर्ण केलं. बायोलॉजी शिकायचं नाही हे ठरलेलं असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स विषय घेतला. पुढे इंजिनिअरिंग करताना त्यांनी जपानी भाषा शिकायला सुरुवात केली. पदवी पूर्ण झाल्यावर काही काळ त्यांना नोकरी मिळेना. पण पुढे याच शिक्षणाचा फायदा झाला आणि फुजित्सुमध्ये पहिली संधी मिळाली.

इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी घेतलेली असली तरीही त्यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या पहिल्याच नोकरीत नेतृत्व केलं. सुरुवातीपासूनच त्यांना प्रोजेक्ट लीड करण्याची संधी मिळत गेली. जपानमधल्या वास्तव्यात त्यांना लक्षात आलं की, इथं वक्तशीरपणा आणि परफेक्शनला खूप जास्त महत्त्व आहे. जपानमध्ये हे धडे गिरवत असतानाच त्यांना स्वतः काहीतरी सुरू करण्याची ऊर्मी होती. चारच वर्षांत त्यांनी फुजित्सुची नोकरी सोडली आणि स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘‘मला माझी भारताबरोबर, आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ कायम ठेवायची होती आणि त्याबरोबरच आपल्या लोकांना रोजगार मिळवून देण्याची इच्छा होती. या विचारातून इंडिकस सॉफ्टवेअरची सुरुवात झाली,’’ शिल्पा सांगतात.

पण वयाच्या २६ व्या वर्षी कंपनी सुरू करणं हे सोपं नाहीच. पण शिल्पा म्हणतात, ‘‘त्या वयात अपयश काय असतं ते माहीतच नव्हतं, त्यामुळे भीती अशी नव्हतीच, साहजिकच हे धाडस आहे असा विचार न करता थेट कंपनी सुरू करण्याचं पाऊल उचललं.’’ सध्या या कंपनीचं जपानमधलं काम त्या पाहतात, त्यांची बहीण परदेशातलं काम सांभाळतात. सुरुवातीला या कंपनीने कस्टम सॉफ्टवेअर बनवलं. त्यानंतर मात्र प्रॉडक्ट डेव्हलपमेंटवर भर देत ‘कांटीनीओ’ हा लो कोड, नो कोड आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म डेव्हलप केला. या माध्यमातून कोणालाही त्यांच्या संकल्पनांना प्रॉडक्टरूपात मूर्त रूप देणं शक्य होतं. सिलिकॉन व्हॅलीतल्या पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार या प्लॅटफॉर्मला मिळाले आहेत.

काम करताना शालेय जीवनापासून जपलेल्या आवडी आणि छंद मात्र त्यांनी कधीच मागे पडू दिले नाहीयेत. शाळेत असतानाच आकाशदर्शन, पेंटिंग, ट्रेकिंग, नृत्य अशा अनेक गोष्टींची शिल्पांना गोडी होती. आजही या सगळ्या गोष्टी त्या आवर्जून करतात. लहानपणी भरतनाट्यम शिकलेल्या शिल्पा आता टॅंगो नृत्य शिकत आहेत. ‘‘टॅंगो हा एक असा नृत्यप्रकार आहे, ज्याला फॉर्म नाही. तुमचा पार्टनर तुम्हाला गाइड करत जातो आणि तुम्ही तसं नाचत राहता, त्यामुळे हे नृत्य शिकणं मला फारच इंटरेस्टिंग वाटलं. आता मी यात बऱ्यापैकी तज्ज्ञ झाले आहे.’’ याशिवाय त्यांचं ट्रेकिंगही नियमितपणे सुरू असतं. अगदी इतकं की, जर सलग काम करावं लागलं, तर सलग काम करून ते संपवेन आणि मग नंतर सलग फिरायचा ब्रेक घेईन असं त्या म्हणतात.

आता संस्कृत श्लोक पटकन शोधता येतील, त्याचे अर्थ लावता येतील, असा एखादा प्लॅटफॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने उभा करायचा, असं शिल्पा यांचं स्वप्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT