kanchan naikawadi
kanchan naikawadi 
सप्तरंग

‘फिट’ राहाल, तर ‘हिट’ व्हाल! (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

बिझनेस वुमन - कांचन नायकवडी, संस्थापक संचालक, इंडस हेल्थ प्लस
‘आरोग्यम्‌ धनसंपदा’, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्‍य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वांत मोठी ठेव असते. मात्र आपण काही झाल्याशिवाय डॉक्‍टरकडे जात नाही. आजार बळावल्यानंतर आपल्याला धक्का बसतो. भारतात सध्या ’प्रिव्हेंटिव्ह हेल्थ’कडे दुर्लक्ष झाले आहे.

आपल्याला काही त्रास किंवा आजार होण्याआधीच आपण आपल्या आरोग्याशी काळजी घेतली पाहिजे. आरोग्याच्या विविध तपासण्या नियमित केल्या पाहिजे. माझे वडील १८ वर्षांपूर्वी अचानक कर्करोगाने गेले आणि मला मोठा धक्का बसला. मात्र आता दुसऱ्या कोणाचे पालक असे अचानक जाऊ नये या विचाराने मी कंबर कसली आणि ‘इंडस हेल्थ प्लस’ची पायाभरणी केली. 

‘इंडस हेल्थ प्लस’च्या माध्यमातून वेगवेगळ्या शारीरिक तपासण्या केल्या जातात. आता तर ’जेनेटिक टेस्टिंग’ तंत्रज्ञानदेखील आले आहे. साधारण तपासणीच्या माध्यमातून तुम्हाला आज काय झाले आहे, ते कळते. मात्र ’जेनेटिक टेस्टिंग’मुळे भविष्यात काय आजार उद्‌भवण्याची शक्‍यता आहे ते कळू शकते. म्हणजे कुटुंबामध्ये आपल्या आजी-आजोबा किंवा आई-वडिलांना मधुमेह, रक्तदाब किंवा कर्करोग असल्यास भविष्यात आपल्यालाही होण्याची शक्‍यता आहे का, याची माहिती मिळू शकते. आपण एखादे महागडे वाहन विकत घेतल्यावर त्याची देखभाल डोळ्यात तेल घालून करतो, तशी आपली स्वतःच्या शरीराची तपासणी करतो का? ती केली पाहिजे! त्यामुळे आपले आज आणि उद्या आपण अधिक चांगले करू शकतो. 

सध्याचे जीवन हे धकाधकीचे झालेले आहे. यात वेळेचे गणित योग्यरीतीने सोडविणाराच पुढे जातो. पण यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते आहे. नुसते वरून चांगले दिसणं म्हणजे ‘फिट’ नाही, तर आतून शरीर निरोगी आणि फिट राहणे गरजेचे आहे. सोने, चांदी, संपत्ती म्हणजे श्रीमंती नव्हे! पैसे मिळविताना तब्येत दुर्लक्षित राहून बिघडली, तर त्या मिळकतीचा उपभोग घेता येणार आहे का, त्यामुळे फिट राहाल तर आयुष्यात हिट व्हाल! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT