सप्तरंग

शिशुवर्गातील कविता आणि त्यांचा ‘गर्भितार्थ’!

‘व्हेगाबॉम्ब डॉट कॉम’वर प्रसिद्ध झालेल्या व माझी पुतणी नोनिकानं पाठवलेल्या लेखानुसार, ‘जॅक आणि जिल’ हे खरं तर फ्रान्सचा सोळावा राजा लुई व त्याची पत्नी मेरी अँत्वोनेट् आहेत.

करण थापर saptrang@esakal.com

तुमच्यापैकी अनेकांना ‘जॅक अँड जिल’ ही कविता माहीत असावी. ते दोघं एका टेकडीवर चढले, जॅक खाली पडला आणि जिल त्याच्यापाठोपाठ गडगडत खाली आला...ही एक निष्पाप, मुलांसाठीची आनंददायी कविता वाटते. मात्र, या कवितेचा खरा अर्थ अधिक गूढ आणि भयंकरही आहे असं पुढं आलं आहे. आणि खरं तर, हा अर्थ मला आवडत असलेल्या शिशुवर्गातील अनेक गंमतगाण्यांच्या बाबतीतही आहे.

‘व्हेगाबॉम्ब डॉट कॉम’वर प्रसिद्ध झालेल्या व माझी पुतणी नोनिकानं पाठवलेल्या लेखानुसार, ‘जॅक आणि जिल’ हे खरं तर फ्रान्सचा सोळावा राजा लुई व त्याची पत्नी मेरी अँत्वोनेट् आहेत. त्यांचा १७९३ मध्ये शिरच्छेद केला गेला. अशा प्रकारे लुईचं डोकं उडालं (लॉस्ट हिज क्राऊन) आणि जिल त्याच्यापाठोपाठ (गडगडत) आली. शिशुवर्गात शिकलेली आणखी एक कविता ‘बा बा ब्लॅक शिप’चे संदर्भ तर आणखी जुन्या काळातील आहेत. पहिल्या किंग एडवर्डनं तेराव्या शतकात शेतकऱ्यांच्या लोकरीवर अत्यंत मोठा कर लावला होता. राजासाठी एक तृतीयांश, चर्चसाठी एक तृतीयांश आणि शेतकऱ्यांसाठीही एक तृतीयांश. या प्राचीन कवितेचा शेवट होता, ‘मात्र, गल्लीच्या टोकाला रडत बसलेल्या मुलासाठी मात्र काहीच नाही.’ दुसऱ्या शब्दांत, लोकरीचं उत्पादन करणाऱ्या लोकांसाठी मात्र अगदीच कमी! तुम्हाला ‘ओल्ड मदर हब्बर्ड’ ही कविता आठवते का? पोर्टलवरील लेखावर विश्‍वास ठेवायचा तर ती कुणी महिलाही नसणार! ‘ओल्ड मदर हब्बर्ड’ ही कार्डिनल वोल्सी असावी. तिच्यावर आठव्या हेन्रीची खप्पामर्जी झाली. कारण, तो तिच्यापासून घटस्फोट घेऊ शकला नाही. इथं राजा म्हणजे ‘पुअर डाँग’ आणि घटस्फोट म्हणजे ‘बोन’. ‘कब्बर्ड’ म्हणजे कॅथॉलिक चर्च...असंय बघा.

जॉर्जी पॉर्जी आणि रिंगा रिंगा...

आता, माझी आणखी एक आवडती कविता ‘जॉर्जी पॉर्जी पुडिंग अँड पाय.’ या कवितेच्या अनेक चावट आवृत्त्या प्रचलित आहेत, ज्यांचा उल्लेख मी इथं करू शकत नाही. मात्र, त्या मला वाटतात तितक्या चुकीच्याही नाहीत.

या आवृत्त्यांनुसार जॉर्जी दुसरा कुणी नसून, ड्यूक ऑफ बकिंगहॅम जॉर्ज व्हीलर्स होता. तो पहिल्या किंग जेम्सचा प्रियकर होता अशा अफवा त्या वेळी होत्या. त्यामुळेच त्यानं चुंबन घेताच मुली मोठ्यानं किंचाळत असत का? आणि मुलं त्याच्याशी खेळायला आल्यावर तो पळून का बरं जात असे?

शिशुवर्गात असताना माझ्या शिक्षकांनी मला शिकवलेली आवडती कविता होती ‘रिंगा रिंगा रोझेस.’ ‘व्हेगाबॉम्ब डॉट कॉम’मधील लेखानुसार, ते खरं तर ‘रिंग अराउंड द रोझी’ असं आहे. या कवितेचं मूळ १६६५ मधील महाभयंकर प्लेगच्या साथीशी असल्याचं दिसतं. ‘वुई ऑल फॉल डाऊन’चा अर्थ ‘आपण सर्वजण मृत्युमुखी पडतो.’ नशीब, शाळेतील बागेत गोल गोल फिरत ही कविता गाणाऱ्या मुलांना कवितेच्या खऱ्या अर्थाबद्दल कोणतीही कल्पना नसते!

मनोरंजक गोष्ट अशी की, शिशुवर्गात शिकवल्या जाणाऱ्या या सर्व कविता ट्यूडर-काळातील (पंधरावं शतक - सन १४८५ ते १६०३) आहेत. ‘मेरी मेरी क्वाइट कॉन्ट्ररी’चा संदर्भ क्वीन मेरीशी आहे. तिनं तिचा अल्पकाळ जगलेला सावत्रभाऊ सोळावा एडवर्ड व देखणी व यशस्वी सावत्रबहीण एलिझाबेथ यांच्या कालखंडाच्या मधल्या काळात राज्य केलं. ‘सिल्व्हर बेल’ आणि ‘कॉकलशेल्स’ ही एखाद्याचा छळ करण्यासाठी वापरात असलेली त्या काळातील प्रसिद्ध हत्यारं होती. ‘प्रेटी मेड्स ऑल इन रो’ हा शेकडो महिलांची, त्या प्रोटेस्टंट असल्यानं केलेल्या हत्यांचा संदर्भ देण्यासाठी केलेली, मृदू शब्दयोजना आहे!

मेरीनं तिचे वडील आठवे हेन्री यांच्या मृत्यूनंतर कॅथॉलिसिझम बळपूर्वक लादण्याचा प्रयत्न केला होता. तिनं सत्तेचा दुरुपयोग करत देशाला ‘चर्च ऑफ इंग्लंड’मध्ये धर्मांतरित केलं. त्या काळातीलच आणखी एक कविता ‘थ्री ब्लाइंड माइस’. ते तिघं म्हणजे मेरीनं जाळून मारलेले तीन प्रोटेस्टंट बिशप होत. पाखंडी आणि देशद्रोही असल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवले गेले. ह्यूज लॅटिमर, निकोलस रॅडली, थॉमस क्रान्मर हे कॅंटरबरीचे प्रमुख बिशप होते.

‘जिवंत जाळणं पुरेसं नव्हतं म्हणून की काय, तिनं या तिघांचे डोळे काढले आणि त्यांचे तुकडे तुकडे केले,’ असंही या कवितेत म्हटलंय. तुम्ही यापुढं ज्याला भेटाल त्या बिशपचा उल्लेख ‘उंदीर’ असा करा, असं मात्र ही कविता सांगत नाही हे तेवढंच खरं! शेवटी, ‘लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन’ कशाकडं अंगुलिनिर्देश करते असं तुम्हाला वाटतं? याबद्दलचे अनेक सिद्धान्त पुढं येतात, त्यातील एक सिद्धान्त असा, ‘पुलाचा पाया भरताना जोपर्यंत एका मनुष्याचा बळी दिला जात नाही तोपर्यंत पूल कोसळत राहतो!’ याला ‘नरबळी’ असंही म्हणतात.

दुर्दैवानं, हा लेख ‘ट्विंकल ट्विंकल लिटल् स्टार’ या कवितेच्या मुळाविषयी भाष्य करत नाही. मला प्रश्‍न पडतो की, ते काय असावं बरं? या कवितेत अगदी सहज आलेल्या पंजाबी उदाहरणांवरून हे आपल्या घराजवळचं काहीतरी असणार असंच वाटतं!

(सदराचे लेखक हे दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

(अनुवाद : महेश बर्दापूरकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor Praises Modi : काँग्रेसवरील नाराजीच्या चर्चांमध्ये शशी थरूर यांनी केलं मोदींचं पुन्हा कौतुक!

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

SCROLL FOR NEXT