Sunita-Jangam
Sunita-Jangam 
सप्तरंग

#MokaleVha समस्यांवर बोलू काही

सुनीता एन. जंगम

मी विवाहिता असून लॉकडाउनमध्ये माझ्या पतीचा व्यवसाय बंद पडला. नैराश्‍यात ते घर सोडून गेले व तीन महिन्यांनंतर परत आले. दरम्यानच्या काळात माझी एका व्यक्तीशी जवळीक झाली. आता नवरा आल्यानंतर तो, ‘नवऱ्याला सर्व सांगेन’ असे  धमकावतो.
- प्रथम तुम्ही त्या व्यक्तीची मदत घेऊन फार मोठी चूक केली. तुमच्या पतीनेही असे वागायला नको होते. आता झाले गेले विसरा, पतीला त्यांच्या नैराश्‍यातून बाहेर काढा. सदरील व्यक्तीबरोबर अजिबात संपर्क ठेवू नका. त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर, पोलिसांची मदत घ्या. योग्य वेळ पाहून पतीलाही त्या व्यक्तीबद्दल कल्पना द्या. कधी-कधी वाईट परिस्थितीत माणसाच्या हातून चुका होतात. परंतु, लगेचच ती चूक सुधारणे गरजेचे असते. त्यामुळे घाबरू नका, धैर्याने तोंड द्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी विवाहित पुरुष असून मला एक मुलगा आहे. पत्नी खूप भांडखोर असून सतत आत्महत्येच्या धमक्या देते. त्यामुळे मी नेहमीच तणावाखाली असतो. तिला खूप समजावले, पण उपयोग झाला नाही. 
- तुमची पत्नी अशी का वागते, याचा विचार करणे आवश्‍यक आहे. ती सर्वांशीच भांडते, याचा अर्थ तिला काही मानसिक समस्या आहे का, तुमच्याविषयी काही गैरसमज आहे का, की लहानपणाच्या एखाद्या घटनेचा परिणाम आहे हे सर्व तपासणे गरजेचे आहे. त्यातून तुम्हाला तिच्या भांडखोर वृत्तीचे कारण समजेल. त्यानुसार समुपदेशक सल्ला देतील. अशा समस्या एकतर शारीरिक किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित असतात. यावर समुपदेशनाद्वारे पूर्णपणे उपाययोजना करता येते. 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT