सप्तरंग

संदेसे आते हैं... (सखी गोखले)

सखी गोखले

लंडन कॉलिंग
लहानपणी मी मुंबईच्या शाळेत बसने जायचे. त्या बसमध्ये वेगवेगळ्या वर्गातील मुलं असायची. आम्ही एकाच परिसरातून यायचो आणि म्हणून आमची विभागणी तीन नंबरच्या बसमध्ये केली गेली. आठवड्यातले पाच दिवस आणि दिवसातले दोन तास आम्ही एकत्र असायचो. हळूहळू मैत्री वाढली आणि शाळेपासून घराकडच्या प्रवासात खेळ, अंताक्षरी, आणि गप्पा रंगू लागल्या. त्या काळात ‘बॉर्डर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता आणि त्याची गाणी खूप प्रसिद्ध होती. आम्ही ‘संदेसे आते हैं..’ एकदा तरी बसच्या प्रवासात गायचो. आम्ही इतक्‍या जोरात गायचो की रस्त्यावरचे पादचारी वळून-वळून पाहायचे. बस घरी पोचल्यावर आवाज अजून चढायचे. एकापरीने शाळेतून येताना ते गाणं म्हणणं उपरोधिकच होतं! गेले काही दिवस बातम्या वाचताना भीती एका भुंग्यासारखी सतत डोक्‍याभोवती फिरते. ‘संदेसे आते हैं...’ चा अर्थ अचानक उलगडल्यासारखा वाटतो. असं वाटतंय त्या गाण्यानं आपला वेळ घेतला आणि माझ्यासमोर त्या परिपक्व शब्दांना, रंगमंचावर एका मोठ्या प्रकाश पाडणाऱ्या स्पॉटलाईट खाली स्वतःला सादर केलं. मला अर्थ कळल्यावर माझ्या डोळ्यात थोडेसं पाणी आलं आणि तो प्रयोग संपल्यावर मी टाळ्या वाजवल्यावर माझंच कौतुक केल्यासारखं शब्दांनी मागं वळून मला ‘अभिनंदन’ म्हटलं!

वीस वर्षांपूर्वी भारताने कारगिल युद्धामध्ये अनेक सैनिक गमावले. मी सहा वर्षांची होते, बाबा ही त्याच वर्षी आम्हाला सोडून गेले. कुठलंच दुःख पूर्णपणे कळत आणि पचत नव्हतं. आता वाटतंय, एवढी पुढं आलीय मी की, डोळ्यातलं पाणी आणि मनात खोलवर रुतलेल्या यातनांवर माझा काहीच ताबा नाही. 

गंमत अशी आहे की, हे लिहितानाही हेडफोनमधून मेहदी हसनच्या आवाजामधले, अहमद फराजचे 

‘किस किस को बतायेंगे, जुदाई का सबब हम? 
तू मुझसे खफा है तो जमाने के लिए आ।
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड के जाने के लिए आ।’
हे शब्द खोलवर जाताहेत...

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

SCROLL FOR NEXT