Drawing Sakal
सप्तरंग

चित्रांकित अक्षरध्वनी

पृथ्वीतलावरचा कुठलाही घटक आपल्या चित्रात न घेता केवळ मानवी मुखातून पडणारे अमूर्त अक्षरस्वर घेऊन चित्रकार विजयराज बोधनकर यांनी चित्रे रेखाटली आहेत.

महेंद्र सुके

पृथ्वीतलावरचा कुठलाही घटक आपल्या चित्रात न घेता केवळ मानवी मुखातून पडणारे अमूर्त अक्षरस्वर घेऊन चित्रकार विजयराज बोधनकर यांनी चित्रे रेखाटली आहेत.

पृथ्वीतलावरचा कुठलाही घटक आपल्या चित्रात न घेता केवळ मानवी मुखातून पडणारे अमूर्त अक्षरस्वर घेऊन चित्रकार विजयराज बोधनकर यांनी चित्रे रेखाटली आहेत. पाटीवर अक्षरं गिरवताना त्यांना ती ध्वनिचित्रेच वाटायची. तेव्हापासून चित्रांमध्ये अक्षरध्वनीचा शोध घेऊन याच अक्षरांची तब्बल ३५ चित्रे त्यांनी काढली आणि ती आता मुंबईतील जहांगीर कलादालनात प्रदर्शित झाली आहेत.

विजयराज बोधनकर यांचे ‘रीड मी’ या शीर्षकांतर्गतच्या कलाकृतींचे प्रदर्शन २१ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील जहांगीर कलादालनात सुरू राहणार आहे. साधारण पहिल्या वर्गात असताना पाटीवर पांढऱ्या लेखणीने चित्र काढायचे. ते आईला दाखवायचे. आई म्हणायची, ही चित्रं नाहीत, ती बाराखडी आहे. अक्षरांत चित्र शोधणारे बोधनकर कालांतराने चित्रांमध्ये रंगले; पण बालपणी अक्षरांकित चित्रांचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आयुष्याच्या पन्नाशीनंतर तोच विचार आता कॅन्व्हासवर उमटला असून, या अक्षरध्वनीने चित्रमालिकेचे रूप धारण केले आहे.

कलावंतांजवळ अस्वस्थतेचं एक विद्यालय असतं. अवकाशाच्या पोकळीत याचे वर्ग भरतात. ध्यान लागलं की कधीतरी कुठूनतरी संवाद ऐकू येतात आणि अमूर्त जगाची पुसटशी ओळख होत जाते. झाडं, ढग, पाऊस म्हणताना ते मूर्त रूपात दिसतात; पण हवा म्हटल्यावर आपल्याला फक्त स्पर्शाची अमूर्त जाणीव होते. हवा दिसत नसते, त्याचप्रमाणे भीती, राग, दुःख, द्वेष, लोभ, वासना, वेदना, आनंद, क्रोध असे अनेक भावशब्द आहेत जी आपण रोजच्या वापरातून व्यक्त होत असतो; पण त्या भावना आकारहीन असतात. त्याला आकार नसतोच आणि नेमक्या याच गोष्टीचा बोधनकर शोध घेत आहेत.

या ‘रीड मी’ प्रदर्शनातील कलाकृतींचा थॉट अधिक विस्तारित केला तो गेल्या दोन वर्षांतील कोरोनाच्या काळात. निसर्गाच्या सान्निध्यात बदलापूरमधील त्यांच्या स्टुडिओत तो कॅन्व्हासवर आला. त्या निसर्गाच्या छटा, निसर्गातील वेगवेगळ्या घटकांचे सौंदर्यनादही त्यांनी रंगलेखनात चित्रित केले आहेत. वेगवेगळ्या रंगाच्या या चित्रांमध्ये निसर्गातील हिरवाईसह निळ्या रंगाची भव्यताही दिसते. काही चित्रांत एक लाल बिंदू लक्ष वेधून घेतो. निसर्गात तो कुठून आला, याची उत्सुकता रसिकांच्या मनात घर करते. अशा अनेक रंगछटा या कलाकृतीत दिसतात, काही निसर्गाचे नाद ऐकायला लावतात.

ही अक्षरचित्रे असली, तरी ती थेट त्याचा अर्थबोध करणारी नाहीत. आकार-उकारांचा भास होतो आणि ही अक्षरं आपल्याला रंगलेखनात गुंतवतात. अमूर्त शैलीतल्या या कलाकृती अर्थात भास-आभास निर्माण करतात. त्यातील अवकाशात घेऊन जातात. काही गडद रंगात अडकवतात. काही चित्रांतील विस्तीर्ण प्रकाश खुणावतो. वेगवेगळ्या रंगाची ही अक्षरयात्रा आपल्याला जीवनातल्या वैविध्यपूर्णतेचा आभास देऊन देतो.

mahendra.suke@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT