Book n-nayak sakal
सप्तरंग

उत्कंठावर्धक, वाचनीय सफर !

हिंदी चित्रपटसृष्टीने काही दशकांच्या अंतराने अनेकदा कात टाकली आहे. स्वप्नाळू नायक ते अँग्री यंग मॅन हा प्रवास पूर्ण केल्यानंतर नायकाला व्हाइट किंवा थेट ब्लॅक न दाखवता त्याच्या ग्रे शेड्सही दाखवायला सुरुवात केली.

महेश बर्दापूरकर barmahesh@gmail.com

हिंदी चित्रपटसृष्टीने काही दशकांच्या अंतराने अनेकदा कात टाकली आहे. स्वप्नाळू नायक ते अँग्री यंग मॅन हा प्रवास पूर्ण केल्यानंतर नायकाला व्हाइट किंवा थेट ब्लॅक न दाखवता त्याच्या ग्रे शेड्सही दाखवायला सुरुवात केली.

हिंदी चित्रपटसृष्टीने काही दशकांच्या अंतराने अनेकदा कात टाकली आहे. स्वप्नाळू नायक ते अँग्री यंग मॅन हा प्रवास पूर्ण केल्यानंतर नायकाला व्हाइट किंवा थेट ब्लॅक न दाखवता त्याच्या ग्रे शेड्सही दाखवायला सुरुवात केली आणि पारंपरिक नायकाची व्याख्या बदलली. हा ‘ ग्रे शेड’ असलेल्या नायकांचा ट्रेंड नव्वदच्या दशकात राम गोपाल वर्माने ‘सत्या’ सारख्या चित्रपटांतून सुरू केला व नंतर त्याचं विशाल स्वरूप अनुराग कश्‍यपनं साकारलं.

या लीगमध्ये आलेल्या व जम बसवलेल्या नायकांबद्दल, खरंतर ‘न-नायकां’बद्दल खूप कमी लिहून येतं, किंवा त्यांच्याबद्दल प्रेक्षकांना खूपच कमी माहिती असते. चित्रपटांसंबंधी गेली अनेक दशकं लेखन करणारे अमोल उदगीरकर यांनी अशाच कलाकारांविषयी ‘न-नायक’ या आपल्या पुस्तकातून सविस्तर माहिती दिली आहे, त्यांच्याबद्दलच्या अनेक ज्ञात-अज्ञात गोष्टी ओघवत्या आणि तरल भाषेत मांडल्या आहेत.

‘न-नायक’ हे पुस्तक सिनेरसिकांना केवळ ‘तोंड’ओळख असलेल्या व अत्यंत तुटपुंजी माहिती असलेल्या कलाकारांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतं. लेखकाने या सर्व कलाकारांचे सिनेमे पाहिले आहेत, काहींना समक्ष भेटला आहे, हे पुस्तक वाचताना जाणवतं.

या पुस्तकासाठीचे कलाकार निवडताना त्याने ‘सत्या’पासून ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’पर्यंतच्या काळात सिनेमात प्रवेश केलेल्या कलाकारांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचं दिसतं. यातील बहुतांश कलाकार (अपवादही भरपूर आहेत.) राम गोपाल वर्मा व अनुराग कश्‍यप या दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून प्रवेश केलेले आहेत, हा योगायोग नसावा. पुस्तकाची सुरुवात मनोज वाजपेयीवरील ‘ॲक्टिंग का किंग कौन?’ या लेखाने होते. ‘सत्या’चं यश ते ओटीटीवरील ‘द फॅमिली मॅन’मुळे घराघरांत पोचलेल्या मनोजचा प्रवास या लेखात उत्तम चितारला गेला आहे.

या मालिकेतच संजय मिश्रासारख्या अतिशय गुणवान नायकाबद्दलही सांगितलं जातं. इरफान खान आणि नवाजुद्दीन सिद्दिकी या हिंदी सिनेमाच्या नायकांची व्याख्या पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या नायकांबद्दलची माहितीही वाचकांना हवीहवीशी वाटणार, यात शंका नाही. छोट्या भूमिकांतून अविस्मरणीय अभिनय करणारे पंकज त्रिपाठी, पीयूष मिश्रा, बोमन इराणी, के. के. मेनन, पवन मल्होत्रा, प्रकाश बेलवडी अशा अनेक कलाकारांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवेशापासून त्यांच्या संघर्षातून यशस्वी होण्यापर्यंतचे किस्से लेखक सांगतो. यातील बहुतांश माहिती इंटरनेटवरील विविध मुलाखतींतून मिळवलेली दिसते. अन्यथा, उदाहरणच द्यायचं झाल्यास पीयूष मिश्रासारख्या बहुपेडी कलाकाराची भेट घेऊन त्याच्याबद्दल जाणून घेतल्यास त्याच्या आयुष्यातील अधिक कंगोरे उलगडून दाखवता आले असते. या कलाकारांबद्दल वाचताना यशपाल शर्मा, तिग्मांशू धुलिया, हुमा कुरेशी, जयदीप अहलावत आदी समलकालीन व संघर्षातून यशस्वी झालेल्या कलाकारांबद्दलची माहिती मिळत नसल्याची हुरहूरही जाणवत राहते. (अर्थात, या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित करण्याचं आश्‍वासन लेखक देतो.)

या ‘न-नायक’ या संकल्पनेत बसणाऱ्या कलाकारांच्या जोडीला लेखक ऋषी कपूर, फरहान अख्तर, अक्षय खन्ना, सुशांत सिंग, जिमी शेरगील यांच्याबद्दलही लिहितो, तर मध्येच खूप मागे जात टुणटुण आणि कादर खान यांच्याबद्दलही माहिती देतो. न-नायिका या व्याख्येत बसणाऱ्या काही अभिनेत्रींबद्दलची मनोरंजक माहिती पुस्तकात वाचायला मिळते. त्यातील राधिका आपटे आणि तब्बू या दोन अभिनेत्रींबद्दलची माहिती अधिक वाचनीय आहे. राधिका स्वीकारत असलेल्या आव्हानात्मक भूमिका व त्या साकारण्यातील सहजता याबद्दल लेखातून माहिती मिळते. मात्र, गिरीश कर्नाड यांच्या ‘उणे पुरे एक शहर’ या नाटकातील किंवा अनुराग बासूच्या रवींद्रनाथ टागोर यांच्या कथांवरील मालिकेत साकारलेली ‘चोखेर बाली’ या अप्रतिम भूमिकांचा उल्लेख दिसत नाही.

लेखकाने चित्रपटांत खूपच छोट्या, मात्र लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारणाऱ्या दीपक डोब्रियाल, सौरभ शुक्ला, जावेद जाफरी, गजराज राव यांच्याबद्दल अत्यंत पोटतिडकीने आणि आदराने लिहिलं आहे व त्यामुळे या कलाकारांचे चाहते नक्कीच खूष होतील. हे पुस्तक लेखकाने ‘वेब पोर्टल’वर लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे व त्यामुळे सदर लेखनामध्ये जाणवणाऱ्या शब्दसंख्येच्या मर्यादा पुस्तकातही जाणवतात. त्यामुळे काही लेख दिलेल्या माहितीचा विचार करता तोकडे वाटतात. मात्र, लेखकाने लिखाणाचे वेगवेगळे फॉर्म वापरत ही त्रुटी बऱ्याच अंशी भरून काढली आहे. ओटीटीसारख्या माध्यमाचा उपयोग करून मोठ्या संख्येने चित्रपट पाहणाऱ्या, मात्र त्यातील कलाकारांबद्दल अगदीच त्रोटक माहिती असणाऱ्या सिनेरसिकांसाठी हे पुस्तक संदर्भग्रंथाचं काम करेल. त्यादृष्टीने या पुस्तकाचं महत्त्व मोठं आहे. गंभीरपणे चित्रपट पाहणाऱ्या, कलाकारांबद्दल सतत अपडेट माहिती ठेवणाऱ्या जुन्या पिढीतील सिनेरसिकांनाही ही माहिती उपयुक्त ठरू शकेल, यात शंका नाही. लेखकाची भाषाशैली ओघवती आहे व कलाकारांची माहिती योग्य प्रसंगांची निवड करत अत्यंत तरलतेने दिली आहे. पुस्तकाची मांडणी उत्कृष्ट आहे व सर्व कलाकारांच्या रंगीत छायाचित्रांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे पुस्तक उत्कंठावर्धक व संग्राह्य झालं आहे.

पुस्तकाचं नाव : न-नायक

लेखक : अमोल उदगीरकर

प्रकाशक : इंद्रायणी साहित्य, पुणे (०२०-२४४५८५९८)

पृष्ठं : २३२,

मूल्य : ३०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Boycott: विकासाच्या बदल्यात फसवणूक? नवी मुंबईतील २७ गावांचा निवडणूकीवर बहिष्कार, राजकारण्यांच्या आश्वासनांचा अखेर कंटाळा

PM मोदी ख्रिसमसनिमित्त गेले चर्चेमध्ये, प्रभू येशूसमोर केली प्रार्थना; पाहा Video

धक्कादायक! पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं घेतला गळफास; महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नवऱ्यानं असं काय केलं?

CM Yogi Adityanath: दूरदृष्टीचा नेता आणि कवी मनाचा पंतप्रधान..! अटलजींच्या जन्मशताब्दीनिमित्त CM योगी आदित्यनाथ यांनी सांगितली आठवण

Ichalkaranji Election : दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही; मात्र इचलकरंजीत अर्जांसाठी प्रचंड झुंबड

SCROLL FOR NEXT