lokbiradari 
सप्तरंग

मुख्य प्रवाहात आलेले माडीया झटताहेत त्यांच्या समाजासाठी

अनिकेत आमटे

हेमलकसा येथील लोकबिरादरी आश्रमशाळेमुळे अनेक आदिवासीबांधव विविध क्षेत्रांत पुढे जात आहेत. 1976 साली या शाळेची सुरवात झाली. शाळेच्या पहिल्या तुकडीत प्रवेश घेणारा कांदोडी गावचा पहिला विद्यार्थी कन्ना डोबी मडावी हा एमबीबीएस झाला आणि नंतर स्त्रीरोगतज्ज्ञ झाला. माडिया समाजातील पहिला डॉक्‍टर. स्वतः खूप मेहनत करून घरी कुठलेही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना या शाळेतील बरेच विद्यार्थी/विद्यार्थिनी डॉक्‍टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, पोलिस, फॉरेस्ट गार्ड, तलाठी, नर्स, एमएसडब्ल्यू असे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत शिक्षण घेऊन आज मुख्य प्रवाहात आले आहेत. मुख्य प्रवाहात आले असतानासुद्धा त्यांची नाळ त्यांच्या जमिनीशी, गावाशी आणि समाजाशी जुळलेली आहे. ही जमेची बाजू आहे.
त्यांना त्यांच्या भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. अनेक शिकलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समाजाला पुढे नेण्यासाठी गावातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि गावातील पालकांना शिक्षणाचे महत्त्व माडिया भाषेत पटवून देण्याचे कामसुद्धा ते करीत असतात. ज्या विद्यार्थ्याला गरज असेल, तर उच्च शिक्षणास आर्थिक साहाय्य मिळवून देण्याचे प्रयत्न हे सुशिक्षित विद्यार्थी करीत आहेत. मोजके अपवाद वगळता सर्वांची आदिवासी समाजाप्रति संवेदनशीलता टिकून आहे. असाच एक या शाळेचा माजी विद्यार्थी अंकुश मादी गावडे. आईचे नाव देवे मादी गावडे. सोबत सहा बहिणी. चार मोठ्या बहिणी आणि दोन लहान. आई-वडील शेतकरी. साधारण पाच एकर जमीन. पावसावर अवलंबिलेली भाताची शेती. गाव कोरेली बु. तालुका अहेरी. दुर्गम भाग. हेमलकशापासून साधारण 35 किलोमीटर लांब. घनदाट जंगल. घरी शिकलेले कोणी नाही. गावात जिल्हा परिषद शाळा आहे. त्यात चौथीपर्यंत शिक्षण घेतले. 2004 मध्ये पाचवीला लोकबिरादरी आश्रमशाळेत प्रवेश घेतला. मेहनती मुलगा होता. अभ्यास खूप करायचा. सर्व शिक्षकांच्या तासांना बसायचा आणि लक्षपूर्वक ऐकायचा. स्वभावाने शांत. पुढे दहावीपर्यंत तो लोकबिरादरी आश्रमशाळेत होता. मार्च 2009 मध्ये दहावीला 62 टक्के मिळवून पास झाला. दहावीत चांगले मार्क मिळवणाऱ्या आणि वर्गात पहिला दुसरा आणि तिसरा नंबरने पास होणाऱ्या मुलांना आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी या गावी पाठवत असू. पाथर्डीलाच शिक्षक असणारे मोरे सर एकदा हेमलकशाला आले होते. त्यांनी दरवर्षी दोन-तीन दहावी पास झालेल्या मुलांची जबाबदारी घेण्याची इच्छा आमच्याकडे व्यक्त केली होती. अंकुशच्या अकरावी व बारावीची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी येथून विज्ञान शाखेतून 70 टक्के गुण प्राप्त केले. इंजिनिअर होण्याचे त्याचे ध्येय होते. त्याप्रमाणे पुढे सीईटीची प्रवेश परीक्षा देणे आवश्‍यक होते. त्यादृष्टीने पुण्यात अभ्यास सुरू केला. यादरम्यान लोकबिरादरी प्रकल्पाशी निगडित असलेल्या माधुरी वारियत आणि डुंबरे सरांनी त्याला भरपूर मदत केली. मेहनत करून तो सीईटी उत्तीर्ण झाला. 2012 मध्ये भारतात नावाजलेल्या मुंबईमध्ये असलेल्या व्हीजेटीआय या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याला इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. पुढील चार वर्षे त्याने खूप मेहनत घेतली आणि 2016 ला तो इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर झाला. पुणे महानगरपालिकेने कनिष्ठ अभियंता निवडीसाठी परीक्षा ठेवली होती. त्या परीक्षेत अंकुश पास झाला. पुढे 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेत त्याला रस्ते विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी मिळाली. अशा अनेक यशस्वी गाथा आहेत. यात आम्ही आणि आमची शाळा हे प्रोत्साहन व संधी देण्याचे काम करते.
पुढील वाटचाल ही विद्यार्थी/विद्यार्थिनी यांनी करायची असते. अनेक विद्यार्थी/विद्यार्थिनी या शाळेत मिळालेल्या संधीचे खूप मेहनत घेऊन सोने करतात. आज त्यांच्या समाजात ते आयडॉल आहेत. या आयडॉलकडे बघूनच पालकांना वाटतंय की, आपण नाही शिकलो; पण आता आपल्या प्रत्येक मुलाला किंवा मुलीला शिक्षण दिले पाहिजे. ही जागृती खूप मोठ्या प्रमाणात पालकांमध्ये निर्माण झाली आहे, हे चांगले लक्षण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police : घराचा धागा पुन्हा जुळला; पोलिसांनी तरुणीला दिला मायेचा आधार

...तोपर्यंत नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही, बाळ्या मामांचा सरकारला इशारा, नेमकी अट कोणती?

Latest Marathi News Updates Live: बीडमध्ये हुंडाबळी प्रकरणात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

Asia Cup 2025: 'बुमराह जर UAE विरुद्ध खेळला, तर आंदोलन करेल', माजी भारतीय क्रिकेटपटूने कंल जाहीर

Yermala Crime : राष्ट्रीय महामार्गावर दिवसाढवळ्या वाहन लुटीच्या व्हायरल व्हिडीओ नंतर, स्थानिक गुन्हे शाखेला जाग

SCROLL FOR NEXT