सप्तरंग

अभिजात श्रवणानंद

मंदार कुलकर्णी

आकाशवाणी ऐकणं हा कानसेनांसाठी अतिशय आनंदाचा भाग असतो. विशेषतः जुने, खूप मेहनत घेऊन तयार केलेले कार्यक्रम म्हणजे तर खजिनाच. इतके दिवस आकाशवाणीनं हे कार्यक्रम पुनःप्रसारित केले, तरच त्यांचा आनंद घेता यायचा; पण आता हा खजिना सदा सर्वकाळ उपलब्ध झाला आहे. आकाशवाणीनं newsonair या ॲपद्वारे एकीकडे देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांचे कार्यक्रम थेट ऐकण्याची सोय केली आहेच; पण त्याचबरोबर अनेक उत्तमोत्तम जुन्या कार्यक्रमांचा खजिनाही उपलब्ध करून दिला आहे. मुलाखती, श्रुतिका, साहित्यावर, संगीतांवर आधारित किती तरी कार्यक्रम तिथं ऐकायला मिळतात. ‘लेटेस्ट रेडिओ मॅगझिन्स’ या विभागात महाराष्ट्रभरातल्या आकाशवाणी केंद्रांचे उत्तमोत्तम ‘क्लासिक्स’ उपलब्ध आहेत. अगदी नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणच्या, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांचे विचार, त्यांच्या कला, त्यांचे आवाज या सगळ्यांची श्रवणानुभूती तुम्ही घेऊ शकता. कानसेनांसाठी ही पर्वणीच.

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक, समाजसेविका राणी बंग, संगीतकार जगदीश खेबूडकर यांच्या मुलाखती, संगीत नाटकांच्या वाटचालीचा वेध घेणारी ‘मर्मबंधातली ठेव ही’ ही मालिका, अच्युत गोडबोले यांच्या ‘मुसाफिर’ या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन अशा एक ना अनेक गोष्टी या खजिन्यात आहेत. ‘चित्रांगणातील स्वरवेल’, ‘तांबडं फुटलं’, ‘रंगभरारी’, ‘आशयघन’, ‘गांधी चिंतन’, ‘भावदर्पण’, ‘कथा वृत्तपत्राची’ अशा शीर्षकांचे कार्यक्रमही सज्ज आहेत. कायद्यापासून महिला सक्षमीकरणापर्यंत आणि साहित्यापासून संगीतापर्यंत अनेक गोष्टींवर आधारित असलेले हे कार्यक्रम. रोज नवनव्या गोष्टी त्यात समाविष्ट होत असल्यानं हा खजिना रिता होणाराच नाही. अक्षरशः शेकडो तासांचं प्रसारण या एवढ्याशा ॲपमध्ये बंदिस्त झालंय. हे कार्यक्रम अर्थातच फक्त ऐकण्यासाठीचे आहेत. त्यामुळे शब्दांतून चित्र तयार करण्यापासून आवाजाच्या आणि ध्वनीसंकेतांच्या उत्तम वापरापर्यंतच्या अनेक कल्पक गोष्टीही थक्क करतात. मुलाखतींपासून विशेष रूपकांपर्यंत आणि अभिवाचनापासून विशेष मालिकांपर्यंत कोणत्याही गोष्टीवर क्लिक करा आणि आस्वाद घ्या. विशेष म्हणजे, हे सगळं विनामूल्य आहे. कधीही ऐकावं आणि या श्रवणानंदात विरघळून जावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT