मनमोराचा पिसारा : गोड स्वप्नं! sakal
सप्तरंग

मनमोराचा पिसारा : गोड स्वप्नं!

भेटीचे स्वप्नं डोळ्यात साठवून पोहचलीच ती...नदी किनारी...तो दुरूनच तीला दिसला...

सकाळ वृत्तसेवा

नेहमीची एक संध्याकाळ...थंडगार वारा...पक्ष्यांचे थवेच्या थवे घराकडे निघालेले...नदी पात्रात सूर्याचे सोनेरी किरणे उमटलेले पाहत...ठरलेल्या वेळी भेटायचे होते म्हणून ती निघाली आपल्याच धुंदीत... जरा वेगळ्याच खुशीत.

भेटीचे स्वप्नं डोळ्यात साठवून पोहचलीच ती...नदी किनारी...तो दुरूनच तीला दिसला...नदी काठावर नुसताच पाण्यात दगडे मारत...जणु तिची वाट पाहून थकलेला...तीच्या गाडीचा आवाज ऐकताच धावतच येवू लागला...नुसताच हसत, दोन्ही हात केसात फिरवत...लाजत हिरो सारखा.

ती ही लाजत, गालातच हसत गाडीवर हेल्मेट घालूनच बसून त्याला न्याहाळत होती...तो जसा जसा जवळ येत होता तशी तिच्या गालावर लाली व ओठांच्या पाकळ्या उमलल्या...हुरहूर ओढ...तो जरा थोडा दूरच उभा राहून पार थकल्यासारखा, कंबरेवर हात ठेवून वाकतो काय, लाजतो काय, हसतो काय...सारेच...दोघेही फक्त एकमेकांना फक्त लाजत पाहतच होते..काळ्या चेक्सचा कुर्ता, क्रिम रंगाचा लेगीन, क्रिम रंगाची मखमली ओढणी गळ्याभोवतीची घातलेली ती...आज जरा जास्तच सुंदर दिसत होती.

जसे तिने हेल्मेट काढला तसेच भिरभिर पूर्ण चेहऱ्यावर केस उडाले. कानातील मोठ मोठे कुंतल हवेने हलू लागले. पाहून सारे हे...जीव खाली वर होऊ लागला त्याचा...ती आपले केस, ओढणी सावरतच एकच धावत सुटली त्याच्याकडे...अगदी त्याचा घट्ट मिठीत....सगळी दुनिया एका बाजूला...अन् ते अविस्मरणीय क्षण एका बाजूला...शब्दात सांगणे कठीणच...काय नाव द्यावे या क्षणांना...का अशी जीवघेणी ओढ...एका भेटीसाठी तळमळ, हुरहूर...श्वासात तेजी...आता सर्व काही शांत…कित्येक मिनिटांनी तिने डोळे उघडले...तेव्हा डोळ्यासमोर नुसताच काळोख...सुन्न मन...आसवांचा पुर...ते एक गोड स्वप्नं होते...कधीही पूर्ण न होणारे...ती थोडी वैतागली, कावरीबावरी झाली. स्वतः ला सावरायला तीला बराच वेळ गेला. स्वतःशीच बोलून गेली काही का असेना पण स्वप्नं खूप गोड होतं...

-ज्योत्स्ना बोरकर, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : हडपसर, मांजरी, फुरसुंगीत जोरदार पावसाला सुरुवात

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT