Representational image
Representational image 
सप्तरंग

ब्ल्यू व्हेल : जीवघेणा खेळ

मंगेश महाले

ब्ल्यू व्हेल सध्या चर्चचा विषय बनला आहे. शंभरहून अधिक मुलांना रशियात या खेळापायी स्वतःचे जीवन संपविले. नुकतात भारतात ब्ल्यूव्हेलमुळे मुंबईत पहिला बळी गेल्याची दुर्घना घडली. अंधेरीच्या परिसरात चैादा वर्षाच्या मनप्रीत सहानने या ब्ल्यू व्हेलपायी इमारतीवरून उडीमारून आत्महत्या केली. 

अपरिपक्व मनाच्या तरुणांना, लहान मुलांना जीवघेणा ठरणारा ब्लू व्हेल हा गेम कायमचा बंद करण्याच्या दिशेने राज्य सरकार पावले टाकत आहे. अंघेरीतील या घटनेची चैाकशी करून हा खेळ कसा थांबविता येईल याविषयी केंद्र आणि राज्य सरकारशी चर्चा करून कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

फडणवीस यांनी या गेमवर बंदी आणण्याचा निर्णय घेईल असे विधानसभेत जाहीर केले आहे. हा गेम खेळणार्‍या मनप्रित सहान या चौदा वर्षाच्या मुलाने मुंबईतील अंधेरीच्या शेर ए पंजाब कॉलनीमध्ये एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार उघड झाल्यापासून राज्यात सर्वत्र त्याच्याविषयी चर्चा सुरू झाली.  त्यातून या गेमची माहिती नसणार्‍यांना ती व्हायला लागली तेव्हा हे लोक नवी माहिती ऐकून अक्षरशः चक्रावून गेले. हा गेम रशियातील एका तरूणाने तयार केला आहे. आता त्याला अटकही करण्यात आली आहे. जगातील कमजोर, अपरिपक्व माणसांना या जगात जगण्याचा अधिकार नाही, हा उद्देश या गेम तयार करण्यामागे त्याचा होता.

सतत मोबाईलशी खेळण्याची सवय लागलेल्या मुलांच्या मनःस्थितीचा गैरफायदा घेऊन ब्लू व्हेलसारखे खेळ किंवा गेम सुरू करण्यात आलेले आहेत. हा खेळ रशियात सुरू झाला आणि बघता बघता तो सार्‍या जगात पसरला आहे. त्या खेळामध्ये काहीतरी जबाबदारी दिलेली असते आणि एकेक अवघड जबाबदारी पार पाडत गेला की त्याला अधिक अवघड जबाबदार्‍या दिल्या जातात आणि एका क्षणाला अक्षरशः जीवघेणी जबाबदारी सोपवली जाते. त्यातच मुंबईतल्या या मुलाने आत्महत्या केलेली आहे. कारण त्याला त्याच्या गेममध्ये उंच इमारतीवरून खाली उडी मारण्याचा टास्क दिला गेला होता. जो माणूस हिप्नोटाईज होऊन आपल्या मनाची सूत्रे असे गेम सुरू करणार्‍यांच्या हातात सोपवतो तोच अशा गेममध्ये आपले नुकसान करून घेतो. मात्र आपण नेमके काय करत आहोत याचे भान त्याला नसते.

काय आहे ब्ल्यू व्हेल
हा व्हिडोओ गेम असून त्यांची निर्मिती रशियात झाली. यात सोशल मीडीयाच्या माध्यमातून मुलांशी संपर्क केला जातो.  हा गेम खेळणं सुरू झाल्यावर तुम्हाला एक मास्टर मिळतो. हा मास्टर तुम्हाला युजर्सला पुढचे पन्नास दिवस कंट्रोल करतो. तो दररोज युजर्सला एक टास्क देतो. ज्यात युजर्सला स्वतःच्या शरीरास त्रास करून घ्यायचा असतो. हे आव्हान पूर्ण झाल्यावर त्याचा पुरावा मास्टरला द्य़ावा लागतो. या गेमचा शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे आत्महत्या करून घ्यायचा. जर तुम्ही हे टास्क पूर्ण केले नाही तर तुम्हारा मास्टर धमकीचे मेसेज पाठवितो.

टास्क काय आहे
हातावर ब्लेडने ब्ल्यू व्हेलचे चित्र काढणे, ओठांवर, हातावर ब्लेडने जखमा करून घेणे, उंच ठिकाणी जाणे,गच्चीवरून उडी मारणे, रात्रभर जागणं आदी कुटुंबाशी, मित्रांशी संबध तोडणे.

पालकांशी भूमिका 
आपला पाल्य कोणता खेळ खेळतो याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांच्या मित्र- मैत्रिणींशी संवाद साधणे, तो मोबाईवर कोणते गेम खेळतो याविषयी नेहमीच लक्ष ठेवणे गरजेचे आहे.या गेमबाबत सोशल मिडीआवरून अर्लट मेसेज येत आहे. चांगले अन् वाईट खेळ, गेम कोणते याविषयी त्यांना समजेल अशा भाषेत त्यांचे मित्र बनून त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

हातात स्मार्ट फोन असल्यावर सतत काहीतरी बघण्याची, किंवा संदेश पाठवण्याची अथवा आलेले संदेश वाचण्याची चटकच मुलांना लागते आणि अशी चटक लागणार्‍या व्यक्तीला हातात मोबाईल नसेल तर क्षणभरसुध्दा चैन पडत नाही. त्यातही सतत एकच एक प्रकारची माहिती किंवा व्हिडीओज किंवा गेम्स पहावे लागत असतील तर अशा छंदिष्ट मुलांना वेड लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी बेचैन झालेली मुले सध्या मुंबईच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल होताना दिसत आहे. शास्त्रीय शोध हा माणसाच्या सोयीसाठी किंवा कल्याणासाठी लागलेला असतो. परंतु त्याचा वापर करण्याचे तारतम्य सुटले म्हणजे असे जीवघेणे खेळ सुरू होतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT