भेट तुझी माझी स्मरते... sakal
सप्तरंग

भेट तुझी माझी स्मरते...

आज संध्याकाळी ती भेटायला येणार होती. नुकताच जोराचा पाऊस येऊन थांबलेला होता.

सकाळ वृत्तसेवा

बाहेर मस्त गार गार वारा. हलकासा पाऊस. तिचे केस हवेने भिरभिर उडत कधी गालावर कधी ओठावर चिपकत होते. ती एका हाताने केस बाजूला करायची पण लगेच येऊन ते पुन्हा चिपकायचे. मी मात्र उगाच तिच्याकडे फक्त एकटक बघत होतो. तीला हे समजताच ती गालातच हसू लागली.

आज संध्याकाळी ती भेटायला येणार होती .नुकताच जोराचा पाऊस येऊन थांबलेला होता. थोडी रिमझिम अजूनही सुरूच होती..ती दुरूनच येताना दिसली मनात एकच उत्साह. तिला एक नजर बघण्याचा. तिचे चालणे, लाजणे, हवेत उडणारे केस. सुंदर नाजूक वर्क असलेला चुडीदार ड्रेस, मखमली ओढणी. तीचा प्रत्येक क्षण नजरेत तो टिपत होता. ती जवळ येताच मनात एकच धडधड...हुरहूर...

किती दिवसांनी एकमेकांना भेटतोय विश्वासच बसत नव्हता. कित्येक वेळ काहीही न बोलता आम्ही फक्त बघतच होतो. हातात हात घेताच जणु त्या एका सेकंदात पूर्ण आयुष्य जगल्याचा आनंद..एका छोट्याशा हॉटेलमध्ये जाऊन बसलो. खूप वेळ फक्त काय बोलावे हे सुचतच नव्हते. गालातल्या गालात हसत होतो. तिचे बोलके डोळे, त्यात मस्त काजळ रचलेले...लाजेने गाल, ओठ लाल झालेली. हवेने हळूच कानातील झुंबर हलत होती. किती सुखद क्षण गोड सहवास तो..''

प्रत्येक व्यक्तीला जीवनात फक्त आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी आवडती व्यक्तीच हवी असते.आणखी काय हवे मग. खायला बरेच काही होते तिथे. पण आम्हाला फक्त गरमागरम कांदा, भजीच खायची होती. सोबत पेस्ट्री पण..लगेच वेटरने भजी आणली व तिने खाली मान टाकून लाजतच खायला पण सुरवात केली. काय बोलावे हे सुचत नव्हते. म्हणूनच ती भजीच खात बसली व पटकन प्लेटमधील सर्व भजी संपविले मग मी लगेच आपली प्लेट तिच्या समोर सरकवली. दोघेही खूप हसू लागलो.

हे क्षण कधीच संपू नये असे वाटत होते. सोबत कॉफी घेतली. तिला आवडायची म्हणून. "मी बिल देवू काय" ती हळूच पुटपुटली. पुन्हा दोघेही हसू लागलो. निघायचे होते तर पाऊस येत होता म्हणून बाजूला उभे होऊन चिंब बरसणा-या धारा हातात घेत हळूच मी तीला एका हाताने जवळ घेतले.

बाहेर रिमझिम पाऊस सुरूच होता.मात्र काळीज खूप धडधड करीत होते..बराच वेळ सोबत घालविला..आता परतीचे कठीण असे क्षण, बेधुंद कोसळणाऱ्या पावसा सारखे तिचे दाटून आलेले मन वाहू लागले. हातातून हात सुटेना..पाऊल घराकडे वळेना..एकीकडे बरसणारा धो धो पाऊस व डोळ्यातून वाहणाऱ्या धारा सतत वाहत होत्या... तो क्षण शब्दात सांगणे कठिणच...

-ज्योत्स्ना बोरकर, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

BJP-MNS आमने सामने, पोलीस ठाण्याबाहेरच चारचाकी फोडून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपच्या बड्या नेत्यासह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

कैरी घातलेलं कोलंबीचं कालवण, सुकटीची किस्मुर... निवेदिता यांनी सांगितलं कसं असतं त्यांच्याकडचं सारस्वत पद्धतीचं जेवण

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT