medicine production complicated and challenging story by s r pendse novel Tablet  Sakal
सप्तरंग

एका केमिस्टचे प्रभावी व्यक्तिचित्रण!

औषध निर्मिती तर कितीतरी गुंतागंतीची, आव्हानाची. त्याचीच एक गोष्ट ‘टॅब्लेट’ या कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न लेखक शं.रा. पेंडसे यांनी केला आहे.

अवतरण टीम

- महेंद्र सुके

कादंबरीत अनेक घडामोडी घडत असताना लेखकाने ‘टॅब्लेट’शी असणारे नायकाचे नाते कुठेही ढळू दिले नाही. तोच या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे.

दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वस्तू आपण वापरतो. त्या वस्तूच्या निर्मिती प्रक्रियेमागची गोष्ट मात्र आपल्याला ठाऊक नसते. त्यातही औषध निर्मिती तर कितीतरी गुंतागंतीची, आव्हानाची. त्याचीच एक गोष्ट ‘टॅब्लेट’ या कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न लेखक शं.रा. पेंडसे यांनी केला आहे.

‘टॅब्लेट’ची कथा फार्मसीची पदवी घेतलेल्या महेश या तरुणाच्या आयुष्याची गोष्ट आहे. तोच या कथेचा नायक आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका भारतीय कंपनीत काम करणारा सर्वसामान्य कुटुंबातील महेश आपल्याला मोठ्या कंपनीत नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्न करतो.

एका बहुराष्ट्रीय कंपनीतील अशीच एक जाहिरात त्याला खुणावते. तो त्या कंपनीत मुलाखतीला जातो. मुलाखत उत्तम होते, पण नियुक्तीपत्राच्या प्रतीक्षेत बरेच दिवस निघून जातात. हा काळ असतो, १९६०चा. तेव्हा ना मोबाईल ना इमेल.

संपर्काचे माध्यम केवळ पत्रव्यवहार. कंपनीने इतर कुणाची शिफारशीने वैगेरे नियुक्ती केली असेल, असा महेशचा समज होतो आणि एका मोठ्या कंपनीत मिळणारी नोकरी गेली असे समजतो.

काही दिवसांनंतर ज्या कंपनीत तो काम करतो, तिथल्या टेलिफोनवर त्याच्यासाठी फोन येतो. तो असतो त्या बहुराष्ट्रीय कंपनीचा. ‘नियुक्तीपत्र पाठवूनही तुम्ही काहीही उत्तर दिले नाही, तुम्हाला ही नोकरी करायची नाही का?’ असे त्याला विचारले जाते.

तो पत्र मिळाले नसल्याचे सांगतो. येऊन भेटतो, असे सांगून तो त्या कंपनीत जातो आणि आधीच्या कंपनीचे सोपस्कार आटपून नव्या कंपनीत रुजू होतो. याच दरम्यान त्याला नियुक्तीपत्र का मिळू शकले नाही, याचाही उलगडा कादंबरीत होतो.

आज जे साधारणत: आयुष्याच्या पन्नाशीत असतील, त्या अनेकांना अशा पत्रव्यवहारांच्या त्यांच्या आयुष्यातील आठवणी या प्रसंगात ताज्या होतील, असा हा प्रसंग वाचकांशी नाते जोडणारा आहे.

औषध बनवणाऱ्या कंपनीत केमिस्ट म्हणून रुजू होणारा महेशचा प्रवास टप्प्याटप्प्यांवर उत्कंठा वाढवणारा आहे. ब्रिटिश कंपनीत दाखल झाल्यानंतर महेशला सॅम्पलिंगसाठी मदत करणारी झरीना.

तिच्यासोबत वाढत गेलेली सलगी आणि पुढे जुळलेले आणि ताटातूट झालेले अनामिक प्रेमही कादंबरीच्या प्रवासाला वेगळ्याच केमिस्ट्रीने वळणदार करणारे आहे. असे अनेक टप्पे या छोट्याशा कादंबरीत आहेत, जे वाचकांची उत्सुकता जागवतात आणि पुढे काय होईल, या उत्कंठेपोटी हे पुस्तक एका बैठकीतच वाचून पूर्ण करण्यास भाग पाडतात.

कादंबरीचा काळ १९६० ते १९९० असा अधोरेखित करण्यात आला आहे. त्यामुळे त्यावेळची मुंबई आणि अवतीभवतीचा परिसर, प्रवासाची साधने, त्या काळची आंदोलने अधोरेखित झाली आहेत. त्यातही या कादंबरीतील नायक हा कामगार असल्याने, त्या कंपनीतील कामगार चळवळी, झालेले कामबंद आंदोलन,

कामगारांचे निलंबन, बडतर्फी, पदोन्नती अशा घटनाघडामोडींत हा नायक कुठे असतो, हे कादंबरी वाचूनच जाणून घ्यायला हवे. कंपनी म्हटली की शिफ्ट आल्या. त्यात रात्रपाळी. महेश तरुण मुलगा. त्याचे लग्न होते. त्याच दरम्यान त्याची रात्रपाळी सुरू असल्याने त्याच्या आयुष्याची उलथापालथ कुठल्या टोकावर जाते, याचे वर्णनही पेंडसे यांनी फार उत्तम केले आहे.

कादंबरीत अनेक घडामोडी घडत असताना लेखकाने ‘टॅब्लेट’शी नाते कुठेही ढळू दिले नाही. तोच या कादंबरीचा केंद्रबिंदू ठेवलेला आहे. नायकाच्या लग्नाविषयी, त्याच्या आयुष्यातील अवांतर प्रसंगांचे उल्लेख नायकाचे व्यक्तिचित्र परिपूर्ण करण्यासाठी आलेले आहेत.

त्यामुळे महेश काम करतो, त्या कंपनीच्या बाह्यजगात फार काळ वाचकांना ठेवायचेच नाही, त्यांना विरंगुळा म्हणून जराचे बाहेर न्यायचे आणि पुन्हा त्या औषध निर्मितीत गुंतवून ठेवायचे, याचे सूत्र पेंडसेंनी जाणीवपूर्वक सांभाळले आहे.

औषध निर्मिती कंपनी असल्याने तिथे औषध तयार करण्यासाठी वेगवेगळ्या साहित्याचा वापर होत असे. ते साहित्य (टॅब्लेटसाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे पावडर, रसायन) किमती असायचे. त्यामुळे त्याची आणि तयार झालेल्या औषधांची देखभाल करणे,

स्टॉकची नोंद ठेवणे, ते व्यवस्थित वापरले गेले की नाही याविषयी तयार झालेल्या औषधांचे क्वालिटी कंट्रोल असे अनेक विभाग होते. त्यातही एक दिवस सायंकाळी सात वाजताच्या जेवणाच्या सुटीकाळात सुरक्षा रक्षकाला कुणीतरी एक मूलद्रव्याचा डबा वरच्या मजल्यावरून खाली फेकल्याचे कळते. तो आरडाओरडा करून, तो कुणी फेकला याविषयी विचारणा करतो आणि मोठी चोरी या निमित्ताने उघडकीस येते, ही गोष्ट औषध निर्मितीप्रक्रियेतील ‘अंदर की बात’ सांगणारी आहे.

कादंबरीच्या संहितेनुसार सरदार जाधव यांनी काढलेले ‘टॅब्लेट’चे मुखपृष्ठ चित्र यथोचित ठरले आहे. हे पुस्तक वसईच्या डिंपल पब्लिकेशनच्या नम्रता मुळे यांनी प्रकाशित केले आहे.

खरे तर ‘टॅब्लेट’ ही कादंबरी बहुराष्ट्रीय औषध निर्माण कंपनीत केमिस्ट म्हणून काम करणाऱ्या महेशचे व्यक्तिचित्रण म्हणावे, असे आहे. खूप बारीकसारीक तपशील यात प्रभावीपणे शं. रा. पेंडसे यांनी मांडले. महेशचा प्रामाणिकपणा, कामाप्रति असलेली निष्ठा, सजगता आणि नवे शिकून घेण्याची वृत्ती आजच्या तरुणाईला प्रेरणादायी ठरेल, असा विश्‍वास ही कादंबरी देते.

‘टॅब्लेट’ ही कादंबरी बहुराष्ट्रीय औषध निर्माण कंपनीत केमिस्ट म्हणून काम करणाऱ्या महेशचे व्यक्तिचित्रण म्हणावे, असे आहे. खूप बारीससारीक तपशील शं. रा. पेंडसे यांनी प्रभावीपणे मांडले आहेत. महेशचा प्रामाणिकपणा, कामाप्रति असलेली निष्ठा, सजगता आणि नवे शिकून घेण्याची वृत्ती आजच्या तरुणाईला प्रेरणादायी ठरेल, असा विश्‍वास ही कादंबरी देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

SCROLL FOR NEXT