कोंडी पुरुषांची! sakal
सप्तरंग

मनमोराचा पिसारा : कोंडी पुरुषांची!

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आजची स्त्री यशाचं नवनवीन शिखर गाठत आहे.

सकाळ वृत्तसेवा

-अनोनी कवडुजी मानापुरे

आजची स्त्री आपली पूर्ण ताकद लाऊन अनेक मोहिमा फत्ते करून देशाचं नाव जगात रोशन करत आहे. मात्र अनेक स्त्रिया रोज काहीतरी चुकीचं करून स्त्रियांचा आदर कमी करत आहेत. यात शिक्षणाचा काही दोष नाही. परंतु समाजात असा गैरसमज झाला आहे की शिकलेल्या मुली घर टिकवून ठेवत नाहीत. कळत नकळत पुरुषांनाही याचा फटका बसत आहे.

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आजची स्त्री यशाचं नवनवीन शिखर गाठत आहे. स्वत:ची वेगळी अशी ओळख बनवत आहे. स्वतःचा स्वाभिमान जपून एक नवं आयुष्य जगण्याचा प्रयत्न ती करतं आहे. पण यामध्ये पुरुष काही प्रमाणात भरडले जात आहेत याकडे क्वचितच लक्ष दिलं जात आहे. संसाररूपी जीवनाची दोन चाके म्हणजे स्त्री व पुरुष. आई, पत्नी, मुलगी असं आयुष्य तो या तिघींभोवती गुंफत असतो. यात अनेक पुरुषांची आई आणि बायको यामध्ये कोंडी होत असताना दिसते.

एक त्याची जन्मदात्री तर दुसरी त्याची अर्धांगिनी. दोघीही त्याच्यासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या. आज आईवडील आपल्या मुलींना उच्च शिक्षण देत आहेत. अन्यायाविरुद्ध उभं रहायला पण शिकवत आहेत. पण उणीव फक्त एका प्राथमिक शिक्षणाची भासत आहे ती म्हणजे की प्रत्येक मुलं हे आपल्या आईवडिलांच्या काळजाचा तुकडा असते. एका मुलाला त्याच्या आईवडिलांपासून दूर करणं हा सुद्धा एक अन्याय आहे हे कोणाच्याच कसं लक्षात येत नाही.

आज भरपूर कायदे हे महिलांच्या बाजूने आहेत. पण त्याचा योग्य उपयोग न होता स्वार्थीपणामुळे दुसऱ्यांच्या जिवाशी खेळ सुरु असलेला दिसतो. आपला नवरासुद्धा कोणाच्या तरी काळजाचा तुकडा आहे हे विसरू नका आणि आपल्या सासुसासऱ्याची स्वत:च्या आईवडिलांप्रमाणे काळजी घ्या. येणारी पिढीही त्यातूनच शिकणार आहे, तोच मार्ग अवलंबणार आहे. पुरुषांच्या मनाचा त्याच्या विचारांचा आदर करणे ही काळाची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

SCROLL FOR NEXT