Psychiatrist 
सप्तरंग

#MokaleVha नवं ठिकाण; पण जुनीच मी..!

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचारतज्ज्ञ

आदित्यचा तरुण वयात अपघाती मृत्यू झाला आणि दोन मुलं पदरी असलेल्या श्वेतावर आकाश कोसळलं. तिच्या आणि आदित्यच्या मित्र-मैत्रिणींनी, नातेवाइकांनी भरपूर आधार दिला. आदित्यच्या ऑफिसनं नियमाप्रमाणे श्वेताला नोकरी दिली. पण, श्वेता खचून गेली होती. तिला महिनाभरात जॉइन व्हायचं होतं. श्वेताचं भावनिक विश्व पार उद्ध्वस्त झालं होतं; पण उभं तर राहायलाच हवं होतं. मुलांच्या भवितव्यासाठी आणि स्वत:साठी तिला उभं राहायलाच हवं होतं. आदित्यच्या ऑफिसमधल्या मित्रांनी खूप धीर दिला. पण, मुख्य अडचण पुढंच होती. 

तिला ऑफिसच्या नवीन वातावरणाशी जुळवून घेता येईना. ऑफिसची बिल्डिंग लांबून दिसली, तरी ती अस्वस्थ व्हायला लागली. दिवसभर ती कशीबशी ऑफिसमध्ये थांबायची. मनापासून काम शिकायचा प्रयत्न करायची. बॉसनं बोलावलं तरी प्रेशर यायचं. कामात लक्ष लागायचं नाही. सुरुवातीला नवीन असल्यामुळं असं होतंय, असं तिला सगळ्यांनी समजावलं. कसेबसे दोन महिने गेले आणि तिला शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता विलक्षण वाढल्याचं लक्षात आलं. ऑफिसमध्ये गेली, की मळमळायला लागायचं, डोकं दुखायचं, हातपाय कापायचे. सर्व शारीरिक तपासण्या झाल्या. सगळं नॉर्मल होतं. मग हे सगळं काय होतं? आदित्यच्या अकाली मृत्यूचा धक्का आणि नवीन ऑफिसमधलं नवीन विश्व, याचं विलक्षण ओझं तिला पेलता आलं नाही. नव्या परिस्थितीशी तिला जुळवून घेता येत नव्हतं. नैराश्याबरोबरच, Adjustment disorder किंवा stress responce syndromची ही 
लक्षणं होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Adjustment disorder, हा घटना घडल्यानंतर किंवा विपरीत परिस्थिती निर्माण झाल्यावर साधारण तीन-चार महिन्यांत जाणवू लागतो व आठ-दहा महिन्यांपर्यंत राहू शकतो. परिस्थिती बदलली किंवा उपचारांमुळे लक्षणं हळूहळू नाहीशी होऊ लागतात. लक्षणं अतिशय त्रासदायक किंवा तीव्र असू शकतात. अनेक कारणं यासाठी कारणीभूत असू शकतात. त्यातील काही पुढीलप्रमाणे ः 

  • जवळच्या व्यक्तीचा मृत्यू 
  • घटस्फोट किंवा वैवाहिक नात्यातील अडचणी 
  • स्वत:च्या किंवा जवळच्या नातलगाचं गंभीर आजारपण 
  • नवीन घरात/शहरात/नोकरीत बदली आणि नवीन वातावरण 
  • अचानक आर्थिक परिस्थिती ढासळणं 
  • लहान मुलांसाठी पालकांच्या नोकरीचं ठिकाण बदलल्यामुळं, नवीन शहरात नवीन शाळेत जावं लागणं 
  • कुटुंबात असलेला विसंवाद, पालक वेगळे होणं, यामुळं निर्माण होणाऱ्या अडचणी 
  • तारुण्यात पदार्पण करताना होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांशी जुळवून घेताना येणाऱ्या अडचणी.

याची लक्षणं म्हणजे अस्वस्थता, चिडचिडेपणा, निराश वाटणं, असहाय्य वाटणं, मधूनच रडू येणं, सतत पूर्वीची त्रास नसतानाची स्थिती आठवत राहणं, लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं, ऑफिस/शाळा/कॉलेजला जाणं टाळणं, छातीत धडधडणं, घाम येणं, हात थरथरणं, अपचन तसेच डोकं दुखणं.
यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं, औषधोपचाराबरोबरच वेगवेगळ्या थेरपीज्‌चा उपयोग होतो. 

अ) DIALECTICAL BEHAVIOR THERAPY (DBT) - ही थेरपी, CBT (cognitive behavioral therapy) या दोन्ही पद्धतींमध्ये तुमचे विचार, भावना आणि वर्तन व त्यांचा एकमेकांवर होणारा परिणाम तपासला जातो. विशेषतः, चुकीची विचार करण्याची पद्धत ही अंतिमतः वागणुकीवर, तिच्या विपरीत परिणामांवर आणि मन:स्वास्थ्यावर कशी परिणाम करते, हे लक्षात आणून दिलं जातं. वेगवेगळ्या युक्त्या वापरून विचार, भावना आणि वर्तन सुधारण्याची कौशल्यं शिकवली जातात. विपरीत किंवा बदललेल्या परिस्थितीचा स्वीकार करायला शिकवलं जातं. घडलेल्या घटनेचा विनाअट स्वीकार करायला शिकवलं जातं. मग मन:स्वास्थ्य सुधारायला लागतं. व्यक्तीला हा मानसिक आजार आहे, याची खात्री करून घेतली जाते. मग त्याची कारणं आणि स्वरूप समजावलं जातं. यावर मात कशी करायची, हे समजावलं जातं.   
ब) वेगवेगळी स्वस्थतेची तंत्रं वापरून स्वत:ला स्वस्थ आणि शांत ठेवणं महत्त्वाचं आहे. 
क) Acceptance and commitment थेरपी (ACT) आणि Cognitive behavioral therapy (CBT) ह्या थेरपीज् उपयुक्त ठरू शकतात. 
ड) नियमित शारीरिक व्यायाम, मनाचे व्यायाम, संगीत आणि ध्यानधारणा-ताणाच्या निर्मूलनासाठी वरील सर्व गोष्टी करण्याबरोबरच चलपद्धतीचा (aerobic) व्यायाम नियमित करणं अपरिहार्य आहे. ज्यामुळे शरीरात सेरोटेनीन यासारखी उपयुक्त संप्रेरके नैसर्गिकरीत्या स्रवतील. त्यानं ताण कमी व्हायला मदत होईल.

आज श्वेता नोकरीत छान स्थिरावली आहे. तिनं दु:ख स्वीकारायची, त्याच्याकडं साक्षीभावानं पाहायची आणि नव्यानं आव्हान पेलण्याची शक्ती स्वत:त निर्माण केलीय. आयुष्यात आकस्मिक आघात होतात. परिस्थितीचं आव्हान स्वीकारावं लागतं. पण, त्यातून सावरण्याची शक्ती आपल्यात निर्माण होऊ शकते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT