Smita-Joshi 
सप्तरंग

#MokaleVha समस्यांवर बोलू काही

स्मिता प्रकाश जोशी

मी २८ वर्षांची तरुणी असून मी प्रेमविवाह केला. चार महिन्यांनंतर त्याचे गावाकडे यापूर्वीच लग्न झालेले असून सध्या त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नाही, असे समजले. मला आता त्याच्यासोबत राहायचे नाही. मी दुसरा विवाह करू शकते का? 
- प्रेमविवाह करताना बऱ्याच वेळेला सर्व गोष्टींचा विचार न करता, सर्व माहिती न घेता फक्त व्यक्ती आवडली म्हणून प्रेमविवाह केला जातो. त्यामुळेच बऱ्याच वेळेला अशा प्रकारची फसवणूक होते. तू ज्या तरुणासोबत लग्न केले आहेस, त्याचा यापूर्वी विवाह झाला असल्यामुळे तुझा विवाह हिंदू विवाह कायद्यातील कलम ५ प्रमाणे विवाह होऊ शकत नाही. परंतु तुम्ही विवाह विधी केलेले आहेत, त्यामुळे सदरील विवाह हा हिंदू विवाह कायद्यातील कलम ११ नुसार विवाह शून्य ठरवून घ्यावा लागेल. तसा न्यायालयाकडे तुला अर्ज करावा लागेल. सदरील विवाह हा ‘विवाह’ नाही असे न्यायालयाने घोषित केल्यानंतरच तुला पुन्हा विवाह करता येईल. सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता करून नंतरच तू दुसऱ्‍या विवाहाचा विचार करावा, म्हणजे भविष्यात अडचण येणार नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझे लग्न होऊन सहा महिने झाले असून, पतीला लगेच मूल हवे आहे. मुलाचा विचार करताना पतीने मुलाच्या भविष्याबाबत आर्थिकदृष्ट्या काय विचार केला आहे, याबाबत तो काहीही सांगत नाही. त्यामुळे मला मुलाचा विचार करणे योग्य वाटत नाही. 
- सध्याच्या काळात मुलांच्या लग्नाचे वय वाढलेले आहे. कारण आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आर्थिक स्थिरता मिळाल्यानंतर मुले लग्न करतात. पण त्यामुळे मूल होण्याबाबत विचार करताना पुन्हा वेळ घालवणे, हे फार त्रासदायक होऊन जाते. कारण वय वाढल्यानंतर मूल होण्याबाबतही बऱ्याच अडचणी निर्माण होतात. आत्तापर्यंत तुम्हा दोघांनाही एकमेकांच्या स्वभावाची ओळख झाली असेलच. मुलाबाबत विचार करण्यासाठी हे योग्य वय आहे. मुलाची जबाबदारी ही तुमच्या दोघांचीही आहे, याबाबत तुम्ही एकमेकांशी बोलणे गरजेचे आहे. त्याची सर्व आर्थिक बाजू समजावून घेताना केवळ हक्क म्हणून न विचारता, प्रेमाने काही गोष्टी समजावून घेतल्यास माहिती मिळू शकेल. ही आनंदाची गोष्ट तुम्ही दोघांनी मिळून स्वीकारावी. विनाकारण मनात शंका न आणता सारासार विचार करावा.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चित्रपट संस्कृतीचा मानदंड! २२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात; कधी आणि कुठे होणार सोहळा?

Jemimah Rodrigues बनली कर्णधार, आता स्मृती मानधना, हरमप्रीत कौरलाही देणार टक्कर! तीन वेळा उपविजेत्या ठरलेल्या संघाचा मोठा निर्णय

Swiggy food trends 2025 : भारतीयांनी २०२५ मध्ये ‘स्विगी’वर सर्वाधिक ऑर्डर केला ‘हा’ पदार्थ; तुम्ही खाल्लाय का?

Solapur News : विद्या मंदिर चे स्नेहसंमेलन म्हणजे ग्रामीण मुलांसाठीची पर्वणीच- तहसीलदार मदन जाधव.

Latest Marathi News Live Update : सदानंद दाते लवकरच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक!

SCROLL FOR NEXT