Dr. Rahul Ranalkar article on mosam river esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : मालेगावातील ‘ती’ मोसम नव्हे, तर मोक्षगंगा !

Marathi Article : अत्यंत तुरळक मुस्लिम नावे नद्यांना दिली गेली, किंवा या नावांचा अपभ्रंश होत गेला. अशाच अपभ्रंश झालेल्या नद्यांमधील एक नाशिक जिल्ह्यात आहे, ती म्हणजे मोसम.

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

भारतात दीर्घकाळ मुस्लिम आक्रमकांचे राज्य असले तरी नद्यांची नावे गंगा, ब्रह्मपुत्रा व भीमा अशीच आहेत. अत्यंत तुरळक मुस्लिम नावे नद्यांना दिली गेली, किंवा या नावांचा अपभ्रंश होत गेला. अशाच अपभ्रंश झालेल्या नद्यांमधील एक नाशिक जिल्ह्यात आहे, ती म्हणजे मोसम.

बागलाणमध्ये उगम पावलेली मोसम नदीचे मूळ नाव मोक्षगंगा असल्याचे इतिहास संशोधकांनी आता पुढे आणले आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे मधल्या काळात जसे शहरांचे नामांतर झाले तसे मोसमचेही व्हायला काय हरकत आहे? असा एक मतप्रवाह सध्या जोर धरतोय.

इतिहास तज्ज्ञांच्या या संशोधनाची नोंद सरकार दप्तरी देखील घ्यावी लागणार आहे. मोक्षगंगा हेच मोसमचे मूळ नाव असल्याचे दाखले देणारी काही जुनी जाणती मंडळीही आहेत, हे विशेष.... (nashik saptarang article on malegaon mosam river marathi news)

मोक्षगंगा नदीचा उगम साल्हेरच्या टेकड्यांमधून होतो. हळुहळू ती दक्षिण पूर्वेकडे वाहत जावून मालेगावजवळ गिरणा नदीला येवून मिळते. मोक्षगंगा बागलाण परिसरातील महत्त्वाची नदी आहे. धरणे आणि तिच्या काठावर वसलेल्या प्राचीन स्थळांसाठी मोक्षगंगा प्राचीन काळापासून ओळखली जाते.

मुल्हेर, ताहाराबाद, सोमपूर, जायखेडा आणि नामपूर ही महत्त्वाची गावे मोक्षगंगेच्या किनारी आहेत. आरम अर्थात अक्षगंगा ही नदी साल्हेरच्या दक्षिण डोंगरातून उगम पावते. आणि पूर्वेकडे वाहत जावून सटाणाजवळ दक्षिणेमुखी होते. ठेंगोडाच्या पूर्वेला ती गिरणेला जाऊन मिळते. कणेर, हातणी, उत्तरार्ध, सुकरी, कोळठी या लहान नद्यांनी बागलाणचा परिसर सुपिक केला आहे.

बागलाणमधील नद्या या लहान धरणांसाठी किंवा बंधाऱ्यांसाठी ओळखल्या जातात. ज्यामुळे फड सिंचनाची व्यवस्था होते. लक्षात घेण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे नद्या त्यांच्या उगमापासून फार कमी अंतरावर सुपीक खोऱ्यांमध्ये रुंदावल्या आहेत, त्यामुळे या सुपीक प्रदेशात फळबागांसाठी उत्तम जमीन उपलब्ध करून दिली.

केवळ ४० किलोमीटरच्या या परिसरात उत्तुंग पर्वतराजीत तब्बल ११ किल्ले व २ प्रमुख नद्यांचे उगमस्थान हे बागलाणचे भौगोलिक वैशिष्ट्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बागलाणवर आत्यंतिक प्रेम होते. भगवान परशुरामांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहून त्यातून अक्षगंगा (आरम) व मोक्षगंगा (मौसम) या नद्या निर्माण झाल्याचा पौराणिक संदर्भ आहे.  (latest marathi news)

केवळ 'कसमा' संस्कृतीचा नव्हे संपूर्ण खानदेशचा अभिमान बाळगणाऱ्यांसाठी ही बाब इतिहाससंशोधक व उद्धव महाराज संस्थानचे श्री क्षेत्र मुल्हेर प्रमुख ह.भ.प. डॉ. रघुराज महाराज पंडित यांनी समोर आणली आहे. 'ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ बागलाण' या इंग्रजी पुस्तकात हे संदर्भ इतिहास अभ्यासक निवृत्त विंग कमांडर डॉ. एम. एस. नरावणे यांनी अधोरेखीत केलेले आहेत.

बागलाणमधील नद्यांचे खासकरुन मोक्षगंगा, अक्षगंगा या नद्यांचे संवर्धन व्हायला हवे. मोक्षगंगेत तर कमालीचे प्रदूषण वाढलेले आहे. खासकरुन मालेगावसारख्या शहरात मोक्षगंगेचे रुप अतिशय दयनीय आणि गलिच्छ बनलेले दिसून येते. शहरातून वाहणाऱ्या नद्यांचे उत्तम पद्धतीने संवर्धन, संगोपन झाल्यास शहरांच्या सौंदर्यातही मोठी भर पडते.

शिवाय जलस्त्रोत म्हणूनही या नद्यांद्वारे जनकल्याण होत असते. बागलाण आणि मालेगावातील लोकप्रतिनिधींनी या जीवनदायिनी नद्यांसाठी पावले उचलावीत, नामांतर, नामकरणही होईल, पण जेव्हा या नद्यांचे पुनरुज्जीवन होईल, तो दिवस बागलाणसाठी खऱ्या अर्थाने भाग्याचा ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT