Dada Bhuse, Dr. Subhash Bhamre, Bharti Pawar, Bhaskar Bhagre. Rajabhau Vaje, Shobha Bachhav
Dada Bhuse, Dr. Subhash Bhamre, Bharti Pawar, Bhaskar Bhagre. Rajabhau Vaje, Shobha Bachhav esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : पक्षीय सहकार्याचा 'नाशिक-धुळे ट्विस्ट'! दिंडोरीत पडद्यामागे वेगवान घडामोडी

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

नाशिकमध्ये शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार राजाभाऊ वाजे प्रचाराला लागले आहेत. दुसरीकडे महायुतीतील उमेदवारी संदर्भात संदिग्धता अजून कायम आहे. धुळे लोकसभेसाठी महायुतीतील 'पक्षीय सहकार्य' नाशिकच्या उमेदवारीवर अवलंबून आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नाशिक न सुटल्यास डॉ. सुभाष भामरे यांना नाशिक जिल्ह्यातील तीन मतदार संघात सहकार्य न करण्यावर दादा भुसे यांचे समर्थक ठाम आहेत, ही धुळे-नाशिकमधील खरी मेख आहे.

 नाशिकचे पालकत्व दादा भुसे यांच्याकडे असल्यामुळे नाशिकची जागा खेचून आणणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. दिंडोरीत भाजपाच्या डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्यात सामना रंगेल. तर खानदेशातील चारही लोकसभा मतदारसंघांत उमेदवार निश्चित झाले आहेत.  (Nashik saptarang latest article on Dindori lok sabha constituency election 2024)

नाशिकच्या उमेदवारीचा तिढा सुटण्यासाठी अजून किमान दोन दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून नेमका कोणता पक्ष आणि कोणता उमेदवार लढणार या संदर्भात चर्चांच्या फेऱ्या सुरु आहेत. या चर्चांचा केंद्रबिंदू ठाणे आणि मालेगाव आहे.

नाशिकमध्ये उमेदवारीच्या संदर्भात खरा 'ट्विस्ट' अजून यायचा आहे. महायुतीत तिन्ही पक्षांना चालणारा, सर्वसमावेशक, विकासाची दृष्टी असलेल्या नाशिक शहरातील उमेदवारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. घोषित उमेदवार राजाभाऊ वाजे यांना सालस प्रतिमेतून आव्हान देणारा उमेदवार असावा, याकडे महायुतीचा कल आहे.

लढत स्पष्ट नसल्याने वाजे यांच्या प्रचारात रंग अद्याप चढलेला नाही. महायुतीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर प्रचाराची चुरस खऱ्या अर्थाने वाढेल. धुळ्यात सुभाष भामरे, शोभा बच्छाव यांच्यात लढत होणार असली तरी दोघांना पक्षांतर्गत नाराजीचा त्रास सोसावा लागत आहे. धुळ्यातून समर्थन मिळविणे शोभा बच्छाव यांच्यासाठी तर नाशिक जिल्ह्यातून पाठिंबा मिळविणे सुभाष भामरे यांच्यासाठी आव्हानात्मक आहे.

नाशिक जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघांसाठी राज्यातील हेविवेट मंत्री दादा भुसे भाजपाची पर्यायाने डॉ. सुभाष भामरे यांना कितपत साथ देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. धुळ्यात शिंदेंची शिवसेना भाजपासाठी किती कार्यरत राहील, हे नाशिक कुणाला सुटते? यावर अवलंबून असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. डॉ. बच्छाव यांना नाशिक आणि धुळ्यातून काँग्रेसअंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे. धुळ्यात काँग्रेसने दिलेल्या पहिल्या महिला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.   (Latest Political News)

दिंडोरी मतदार संघात डॉ. भारती पवार यांच्या आशा ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते जे. पी. गावित यांच्यावर टिकून होत्या. गावित निवडणुकीच्या मैदानात असते तर भाजपाला फायदा संभवत होता. बैठकांच्या अनेक फेऱ्यांनंतर माकपाने महाविकास आघाडीला दिंडोरीत समर्थन दिले. त्यामुळे भास्कर भगरे यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मात्र, तिसऱ्या प्रबळ उमेदवाराच्या आगमनाची प्रतीक्षा भाजपाला आहे. 'तो' तिसरा चेहरा अजून ठरायचा आहे. सध्या जरी सरळ मुकाबला दिसत असला तरी दिंडोरीतील खरा 'ट्विस्ट' तिसरा आल्यावर येणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी दिंडोरीत प्रमुख मुद्दा आहे.

त्यामुळे संघ परिवाराने नव्याने 'फिडबॅक' घेत आहे. प्राप्त परिस्थितीत नेमके काय करता येतील? हा त्यामागचा हेतू असल्याचे सांगण्यात येते. भास्कर भगरे यांची कार्यकर्त्यांप्रमाणे साधी वागणूक लोकांसाठी सध्या चर्चेचा विषय ठरतोय. नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांना पक्षांतर्गत विरोधक, महायुतीतील विरोधक आणि प्रत्यक्षातील विरोधक अशा तिघा घटकांचा सामना करावा लागत आहे.

ही नाराजी गोवाल पाडवी यांच्यासाठी उपयुक्त आहे. नाराजीची तीव्रता वाढल्यास नंदुरबारमध्ये सत्तापालट शक्य आहे. डॉ. विजय गावित यांच्या विरोधकांच्या संख्येत नजिकच्या काळात मोठी वाढ झाली आहे. के. सी. पाडवी आणि त्यांचे पुत्र गोवाल हे तुलनेने सौम्य असल्याने आदिवासी जिल्ह्यातील मतदारांचीच आता कसोटी लागेल.   (Latest Political News)

भाजपाच्या स्मिता वाघ आणि करण पवार ही लढत चांगलीच रंगतदार ठरणार आहे. जळगाव भाजपाचा पारंपरिक मतदार संघ असला तरी करण यांच्या रुपाने शिवसेना (ठाकरे) सध्या जळगावात जोर पकडू पाहतेय. विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे बळ करण पवार यांना मिळाले आहे.

पाचोऱ्यात नेटवर्क असलेल्या डॉ. अस्मिता पाटील ठाकरे गटात आल्या आहेत. अस्मिता यांच्यामुळे राजपूत समाजाचा तर धरणगावातील लकी टेलर यांच्यामुळे गुजर समाजाचे पाठबळ करण पवार यांना मिळू शकते. स्मिता वाघ अभाविपमध्ये विद्यार्थी दशेपासून असल्यामुळे संपूर्ण संघ परिवाराचे निर्विवाद पाठबळ त्यांना मिळेल. 

रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्यासमोर श्रीराम पाटील यांचे आव्हान असेल. रक्षा यांचे काम आणि नेटवर्क प्रस्थापित आहे. तर श्रीराम पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन भाजपामार्गे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी डेरेदाखल झाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून इच्छुक असलेले भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी श्रीराम पाटील यांच्या उमेदवारीमुळे नाराज आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरु केले आहे. त्यामुळे श्रीराम पाटील यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर असेल. रक्षा खडसे यांची उमेदवारी दाखल करतेवेळी एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाची शक्यता आहे. गिरीश महाजन यांची उपस्थिती यावेळी असल्यास भाजपासाठी वातावरण निर्मिती होईल, श्रीराम पाटलांचे मात्र 'टेन्शन' वाढेल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT