Manisha-Gawali
Manisha-Gawali 
सप्तरंग

#MokaleVha : मोबाईलपासून सुटी पाहिजे?

ॲड. मनीषा गवळी

मुलांच्या प्रगतीसाठी मोबाईल गरजेचा आहेच; परंतु अजाणतेपणे मोबाईलचं व्यसनच जडलं तर यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं, याबाबत ‘मोकळे व्हा’ ‘पुरवणीअंतर्गत मोबाईलपासून सुटी पाहिजे?’ या विषयावर नुकतेच मार्गदर्शन आयोजित केले होते. तिथे आलेल्या काही प्रश्‍नांना समुपदेशक डॉ. सपना देव यांनी इथे उत्तरे दिली आहेत.

अडीच वर्षांच्या मुलाला मोबाईलपासून कसं परावृत्त करावं?
उत्तर -
अडीच वर्षाच्या मुलांना मोबाईलची नाही, तर आईवडिलांची गरज आहे. मोबाईल हा बेबी सीटर नाही. मुलांना मोबाईल हातात न देता आपण स्वतःला स्वतःसाठी स्वतःच्या मुलांसाठी वेळ देतोय हे समजून त्यांना आपली गरज आहे. लहान मुलांना आपल्या आईवडिलांची गरज आहे त्यांच्या आवाजाची गरज आहे. मुलंही आई-वडिलांचा आवाज ऐकून मोठे होतात त्यांचे अनुकरण करतात. सध्या मोबाईलवर लोकांचा आवाज लोकांनी सांगितलेल्या गोष्टी हे ऐकून नेमकी त्यांनी कशा पद्धतीने वागावे हे आपण त्यांना सांगू शकत नाही. आई-वडिलांनी आपल्या पाल्याला बाहेर घेऊन जाणे, घरात त्यांना खेळायला देणे. काहीच घरात नसलं तरी आपण लहान मुलाला त्यांच्याशी गप्पा माराव्यात.

मुलांच्या हातात मोबाईल देताना पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे?
- पालकांनी स्वत: फोनचा वापर गरजेपुरता करावा. मुलांना झोपेची आवश्‍यकता असते आणि मोबाइलच्या स्क्रीनमुळे झोपेचे त्रास होऊ शकतात. आपण झोपण्यापूर्वी एक तास मोबाईल डिव्हाइस न वापरणे चांगले. फोनच्या वापरासाठी कौटुंबिक नियम सेट करा. आपली मुले ऑनलाइन काय करू शकतात आणि काय करू शकत नाहीत यासाठी मानक सेट करा. मुलांशी जास्तीत जास्त सुसंवाद करा, त्यांना वेळ द्या, त्यांच्याबरोबर वेळ घालवा. त्यांना मैदानी खेळाची सवय लावा रोलर स्केटिंग, चालणे, पोहणे, ट्रॅकिंग, गेम्स इत्यादी स्वतः त्यांच्याबरोबर खेळा. होमवर्क पूर्ण करण्यासाठी त्यांना मोबाईल हातात न देता स्वतः बसून त्यांच्याकडून करून घ्या. इंटरनेटचा वापर करताना शक्‍यतो मुलांबरोबर सोबत राहा. आपल्या मुलास माहितीचे मूल्यांकन करणे आणि ऑनलाइन सापडलेल्या माहितीबद्दल गंभीरपणे जागरूक होणे शिकवा. आपल्या मुलांना वैयक्तिक माहिती खासगी ठेवण्यास शिकवा. आपल्या मुलांना सामाजिक नेटवर्किंग साइट सुरक्षितपणे वापरण्यास सांगा. तसेच आपल्या मुलांना सायबर गुन्ह्यांपासून सावध करा.

कायदा ज्येष्ठांची मदत करू शकतो का?
मी व माझी पत्नी ज्येष्ठ नागरिक असून, आम्हाला मूलबाळ नाही. माझ्या भावाची मुले काही वर्षे आमच्याकडे शिक्षणानिमित्त राहिली. त्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्चही आम्ही केला. आता आमच्या उतारवयात आम्ही सतत आजारी असतो. माझ्या तुटपुंज्या बचतीमध्ये आमच्या औषधपाण्याचा खर्चही भागत नाही. या वयात तब्येतीमुळे नोकरी करू शकत नाही. नातेवाईकही आमच्याकडे दुर्लक्ष करतात. स्वतःचा उदरनिर्वाह चालवणेही कठीण झाले आहे. कायदा आम्हाला काही मदत करू शकतो का?

तुमच्यासारख्या व इतर ज्येष्ठ नागरिकांच्या हिताकरिता केंद्र सरकारने ‘आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम कायदा २००७’ अस्तित्वात आणला आहे. ज्या ज्येष्ठांना सांभाळणारे कोणी नाही अथवा ज्यांची मुले, नातेवाईक त्यांना सांभाळत नाहीत, हे सर्व ज्येष्ठही समाजाचाच घटक आहेत व त्यांच्याकडे दुर्लक्ष न होता त्यांचे वृद्धापकाळातील आयुष्य आनंदी व सामान्य असावे, याचा विचार या कायद्याने केला आहे. जवळच्या नातेवाइकांना जसे कायदेशीर अधिकार मिळतात. त्याप्रमाणे त्यांची कायदेशीर कर्तव्येही आहेत. त्यानुषंगाने या कायद्यांंतर्गत सज्ञान मुलांव्यतिरिक्त इतर नातेवाईक यांनाही ज्येष्ठांची जबाबदारी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे तुम्ही या कायद्यांतर्गत तुमच्या जिल्ह्यातील विशेष ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे अर्ज करून तुमच्या भावाची मुले किंवा तुमच्या अथवा पत्नीच्या इतर जवळच्या नातेवाइकांकडून तुमच्या व तुमच्या पत्नीचा औषधपाणी व दैनंदिन खर्च, उदरनिर्वाहाचा खर्च देण्याचे आदेश मिळवू शकता. अर्जावर सुनावणीच्या आधी न्यायाधिकरणातील समुपदेशक तुमच्या नातेवाइकांशी बोलून अर्ज न चालवता तुम्हाला ते उदरनिर्वाह देण्यास तयार होतील का, हे बघतील. तसे न झाल्यास अर्ज चालवून दोघांची बाजू ऐकून आदेश करेल. तरीही, आधी तुम्ही नातेवाइकांशी वैयक्तिकरीत्या या विषयावर चर्चा करून त्यांना त्यांची कायदेशीर कर्तव्ये आणि तुमचे अधिकार समजावून सांगा. चर्चेने कदाचित कायद्याची मदत न घेता तुमच्या प्रश्नावर तोडगा निघेल. 

मुलगी विनयभंगाची तक्रार द्यायला घाबरते
माझी मुलगी १२ वर्षांची आहे. जवळ राहणारा १५ वर्षांचा मुलगा माझ्या व सोसायटीतील इतर मुलींना त्रास देत असतो. त्याला व त्याच्या पालकांना समज देऊनही त्याच्या वागण्यात फरक पडला नाही. काही दिवसांपासून तो माझ्या मुलीचा पाठलाग करतो. एकदा त्याने मुलीचा हात पकडून छेडही काढली. त्यामुळे सोसायटीतल्या लोकांनी तक्रार करायचे ठरविले आहे. परंतु, माझी मुलगी घाबरल्याने ती पोलिस स्टेशनला यायला तयार नाही. आम्हालाही तक्रारीनंतर तो आणखी त्रास देईल, अशी भीती वाटते. यावर मार्ग सांगा.

मुलाच्या पालकांना सांगूनही त्यांनी दुर्लक्ष करणे गंभीर बाब आहे. बहुतांश पालक आपले मूल वाईट वागणार नाही, याच मनोधारणेत असतात. परंतु, मुलांच्या अशा वागणुकीला वेळीच आळा घातला नाही, तर त्यांच्यातील गुन्हेगारी मानसिकतेला खतपाणी मिळून पुढे तो गंभीर गुन्हे करण्याची शक्यता असते. तुमची तक्रार पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल होईल. यातील मुलगा अज्ञान असल्याने विधिसंघर्षग्रस्त आहे. तक्रारीनंतर त्याच्यात सुधारणा व्हावी, यासाठी त्याला योग्य ते समुपदेशन केले जाईल. तुमच्या मुलीला जबाब नोंदवायला पोलिस स्टेशनला जावे लागणार नाही. हा कायदा मुलांसाठी मैत्रीपूर्ण असा आहे. तिचा जबाब घरी अथवा तिला मोकळे वाटेल अशा ठिकाणी साध्या वेशातील सीनिअर (शक्यतो महिला) पोलिस अधिकारी घेतील. तो मुलगा तिच्या संपर्कात येणार नाही, याची जबाबदारी पोलिस व कोर्टाची आहे. मुलीचे नाव, पत्ता व इतर माहिती, याची गुप्तताही पोलिस पाळतील. तुम्ही तुमच्या मुलीला व इतर त्रास झालेल्या मुलींनाही त्यांच्याबरोबर सतत आहात, याची जाणीव करून देऊन जबाब देण्यास तयार करा. तुम्ही हिंमत करून तक्रार केली, तर भविष्यात त्यांच्याबरोबरच इतर मुलींनाही अजून गंभीर स्वरूपाचा त्रास होण्याचा संभाव्य धोका निश्चित टळेल. तुमच्या मुलींना तुम्ही स्वत:ही स्वसंरक्षणाचे धडे द्या. (child helpline no. 1098)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT