Niraj Chopra and Sarojdevi Chopra sakal
सप्तरंग

नीरज चोप्राच्या आईची गोल्डन प्रतिक्रिया!

जगभरात आज धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाने हैदोस घातला आहे. धर्मा-धर्मात आणि देशा-देशात संघर्षाचे वातावरण आहे.

डॉ. श्रीमंत कोकाटे

जगभरात आज धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाने हैदोस घातला आहे. धर्मा-धर्मात आणि देशा-देशात संघर्षाचे वातावरण आहे. अशा पार्श्वभूमीवर ऑलिंपिक विजेता नीरज चोप्राच्या आईची प्रतिक्रिया धार्मिक आणि देशा-देशातील विद्वेषाला मूठमाती देणारी आहे.

पॅरिस ऑलिंपिक २०२४ च्या भालाफेक स्पर्धेत पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीमला गोल्ड मेडल मिळाले, तर भारताचा खेळाडू नीरज चोप्राला दुसऱ्या क्रमांकाचे सिल्व्हर मेडल मिळाले. नीरज हा भालाफेकीत आघाडीचा खेळाडू आहे. २०२०च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये त्याने गोल्ड मेडल जिंकले होते. या चार वर्षांत तो भालाफेकीच्या जागतिक मानांकनात पहिल्या क्रमांकावर आहे.

त्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये तो गोल्ड मेडल जिंकणार, अशी भारतीयांना खात्री होती; परंतु पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर पर्यंत फेक टाकून पहिला, तर नीरज चोप्राने ८९.४५ मीटरचा फेक टाकून दुसरा क्रमांक पटकाविला. स्वाभाविकपणे नीरज आणि त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली; परंतु या पार्श्वभूमीवर नीरज चोप्रा यांच्या मातोश्री सरोजदेवी यांची प्रतिक्रिया खूपच प्रगल्भ आणि क्रीडाविश्वाला प्रेरणादायक आहे.

सरोज देवी म्हणाल्या, ‘नीरजने जिंकलेले सिल्व्हर मेडल आमच्यासाठी गोल्ड मेडलइतकेच महत्त्वाचे आहे. अर्शद नदीम (ज्याला गोल्डमॅन मिळालेले आहे) हाही मला मुलासमानच आहे. तिघेही मला मुलासमानच आहेत. त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत,’ अशा आशियाची प्रतिक्रिया नीरजच्या मातोश्री सरोज देवी यांनी व्यक्त केली आहे. सरोज देवी चोप्रा यांची ही प्रतिक्रिया जाती, धर्म आणि देश-विदेशातील वैरभाव नष्ट करणारी आहे. ही प्रतिक्रिया अत्यंत प्रगल्भ आणि सर्वांसाठी प्रेरणादायक आहे, ही प्रतिक्रिया क्रीडाविश्वाची अर्थात ऑलिंपिकची उंची वाढविणारी आहे.

अलीकडच्या काळात आपण पाहतो की देशांतर्गत, देशा-देशात, विविध जातीधर्मात प्रचंड संघर्षाचे आणि विद्वेषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. प्रत्येक बाबतीत राजकारण केले जात आहे. क्रीडाविश्वातदेखील राजकारण, द्वेष, वादविवाद आणि टोकाचे मतभेद आहेत. अशा काळात नीरजची आई सरोज देवी यांची प्रतिक्रिया खूप महत्त्वपूर्ण आहे. भारत-पाकिस्तान तर हाडवैर असल्यासारखेच वागत असतात. एकमेकाविरुद्ध सतत लढत असतात.

दोघांच्या मधून विस्तवदेखील जात नाही, अशी परिस्थिती आहे. एकमेकांचे कौतुक करणे, अभिनंदन करणे, प्रोत्साहन देणे या बाबी तर खूपच दुर्मिळ झालेल्या आहेत. भारत-पाकिस्तानचा कोणताही सामना म्हणजे इर्षा, ठसल, अटीतटीची लढत ठरलेले असते; मग ते राजकारण असो किंवा खेळ असो. भारत-पाकिस्तान समोरासमोर आले की जगाच्या नजरा दोघांच्या लढतीकडे असतात. अशा काळात सरोज देवी यांनी व्यक्त केलेले विचार क्रीडाविश्वाला आणि राजकीय क्षेत्रालादेखील दिशादर्शक आहेत.

राजकारणात आणि खेळात आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे अशीच पालकांची भूमिका असते; परंतु कालच्या भालाफेकीच्या निकालानंतर सरोज देवी यांनी आपल्या मुलाचे म्हणजे नीरजचे कौतुक करतानाच प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीमचे आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या खेळाडूचेदेखील कौतुक केलेले आहे.

नीरजप्रमाणेच ते दोघेही मला मुलासमानच आहेत. त्यांनी खूप मेहनत केलेली आहे, अशी प्रतिक्रिया सरोज देवी यांनी दिलेली आहे. सरोज देवी यांची प्रतिक्रिया गोल्ड मेडलपेक्षा महान आहे. त्यांची प्रतिक्रिया नीरज, भारत देश आणि ऑलिंपिक स्पर्धा यांची उंची वाढविणारी आहे. त्यांची प्रतिक्रिया खेळात द्वेष, असूया, राग, अहंकार, बडेजाव या बाबी निरर्थक आहेत, असे दर्शविते. खेळ हा खेळासारखा खेळला पाहिजे. खेळातील खेळाडू हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात, ते एकमेकांचे दुश्मन, शत्रू किंवा विरोधक नसतात, असेच ही प्रतिक्रिया सांगते.

सरोज देवी यांची ही गोल्डन प्रतिक्रिया हा खरा मानवी संस्कृतीचा आविष्कार आहे. सरोज देवी यांची प्रतिक्रिया केवळ क्रीडाविश्वासाठीच नव्हे, तर राजकीय क्षेत्रासाठीदेखील प्रेरणादायक आहे. आज राजकारणात प्रचंड शत्रुभाव, अहंकार, अरेरावी, असूया आणि जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. राजकीय विरोधक आपला प्रतिस्पर्धी असतो, तो आपला दुश्मन किंवा शत्रू नसतो, हा लोकशाहीभाव नष्ट होत चाललेला आहे.

राजकीय विरोधकांशी वैरभाव ठेवून राजकारण केले जात आहे, हे पक्षांतर्गत, पक्षा-पक्षात, देशांतर्गत आणि देशा-देशात सुरू आहे. भारत-पाकिस्तान म्हणजे एकमेकांचे शत्रू, असे समीकरण झालेले आहे. भारत -पाकिस्तान यांच्यामधून विस्तवदेखील जात नाही, अशी जगभर समजूत आहे. अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानी खेळाडूला मुलासमान मानणे, त्याच्या आनंदात आपला आनंद मानणे, हे सरोज देवी यांची उदात्त भावना हा भारतीय संस्कृतीचा आविष्कार आहे.

सरोज देवी यांची गोल्डन प्रतिक्रिया स्पष्ट करते, की भारतीय कोणाचा द्वेष करत नाहीत. भारतीय कोणाशी वैरभाव ठेवत नाहीत. भारतीयांची विचारधारा प्रगल्भ आहे, ती शेजारील राष्ट्राची आपुलकीने वागणारी आहे.

शेवटी खेळ, क्रीडा हे मानवी कल्याणासाठी आहेत. वैरभाव विसरून आंतरराष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी आहेत. उपजत गुणांना वाव देण्यासाठी आहेत. खेळ हे जगातील मानवी समूहाला जोडण्यासाठी असतात, मानवी समूहाला एकमेकांपासून विभक्त करण्यासाठी नसतात. सरोज देवी यांची प्रतिक्रिया जगातील मानवी समूहाला जोडणारी प्रतिक्रिया आहे.

आई ही कधीही स्वार्थी आणि संकुचित विचार करत नसते, तर आई ही व्यापक, वैश्विक आणि सकारात्मक विचार करत असते. हेच सरोज देवी यांची प्रतिक्रिया सांगते. याचा विचार जगाने करावा, ही अपेक्षा! नीरजचे, त्याच्या सहकारी खेळाडूंचे आणि त्यांच्या आई-वडिलांचे हार्दिक अभिनंदन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT