Feast Sakal
सप्तरंग

फिष्ट आंब्याच्या झाडाखालची !

पप्या आन मी सकाळच्या पारी चिंपाट घिवून वड्याला जायचो...तिकडबी दोस्तांची मैफल रंगायची... तासभर कसा निगून गेला त्ये कळायचं न्हाय... विधी आटपला की वड्याच्या पाण्यात खेळत बसायचो...

नितीन पवार koripati.production@gmail.com

साळंला रयवारी सुट्टी आसली की आय वाळवणापाशी बसवायची... मोक्कार चिमन्या येऊन राखनदाराला पार घाईला आणायच्या..चारदा हाकलून त्या परत याच्या आन मलाबी त्या याव्या असं वाटायचं... त्येंचा आवाज मला लै आवडायचा...

पप्या आन मी सकाळच्या पारी चिंपाट घिवून वड्याला जायचो...तिकडबी दोस्तांची मैफल रंगायची... तासभर कसा निगून गेला त्ये कळायचं न्हाय... विधी आटपला की वड्याच्या पाण्यात खेळत बसायचो... खेळून झालं की वड्याच्या कडंला आसल्याला गवतावर आणि झालडूरावर भुंगं बसल्यालं आसायचं त्यासनी धरायला जायचो... झालडुरं म्हंजी मेथीच्या भाजीगत एक गवताचा पण खाता येणार नाही आसा प्रकार आसायचा...त्याज्यावर लाल काळ्या रंगाचं लांबड्या शेपटीवालं भुंग बसायचं... कुणी कुटला धरला याची पैज लागायची.. लाल भुंगा धरणाऱ्याला मान आसायचा... पण धरायला गेलं की भुंग उडून जायचं आन दुसऱ्या गवतावर बसायचं... कधी काट्याच्या पांजरीवर नाहीतर कधी वड्याच्या पाण्याच्या मधोमध उभ्या असलेल्या दगडावर बसायचं... त्याच्या मागं लागलो की घरला जायचं भान राहयाचं न्हाय... न्ह्याहरीपावतर वड्या वड्यान फिरायचो.. एकदा भुंगा घावला की त्याज्या शेपटीला दोरी बांधून त्याला हवेत सोडायचं.. पुस्तकात बघितल्याल हेलिकॉप्टर उडतंय असं वाटायचं...

मग मन भरलं की त्याला सोडून द्यायच... त्यातबी एकदा भुंगा मेला तर मनाला घोर लागून राहयाचा... मग सगळी पोर मिळून त्यला खड्डा काढून पुरायचो...पुन्हा दोन दिसत टायम ठरवून तिकडं जाऊन याचो...

दुपारच्याला जोस्कतल्या रानात भर उन्हात आंब्याच्या झाडाखाली गार सावली पडायची... तिथं सगळी पोर बसायला याची... एका बाजूला मोठ्या माणसांचा पत्याचा डाव चालायचा तर दुसरीकड आम्ही एकमेकांची आब्रू काढत तिथंच तास दोन आडवं हुयाचो... आयच्या कुशीत लागती तशीच निवांत झोप फक्त त्या आंब्याच्या कुशीत लागायची...कधी त्या झाडावर सुर पारंब्या खेळायचो तर कधी त्याज्यावर येणाऱ्या पोपटासनी शीळ घालायचो...हिरवागार पोपटांचा थवाच्या थवा यवून बसायचा...रातची फिष्ट असली तर याच आंब्याखाली असायची त्यामुळं इथं एक चूल आन राख कायम पडल्याली दिसायची...दर आठ दहा दिवसांन फिष्ट ठरल्याली असायची... कवा गऱ्याची... पावटयाच्या सीजन मधी फुडणीच्या भाताची... आन कवातरी आवस पुनवला घरच्या कोंबडीच्या आंड्याचीबी फिष्ट करायचो... मटणाची फिष्ट करायला एवढं पैसे हुतंच कुणाकडं तवा.. पण कुणाच्या घरनं तांदुळ आला न्हाय, गरा आला न्हाय, तरी फिष्टीत जागा फिक्स आसायची..

आता पैसे आलं, अगदी बारक्या पोराकडं मोबाईल आलं... मटणशिवाय कालवण न्हाय आन बिर्याणी शिवाय भात न्हाय...फिष्टीत दर चार दिवसाला मटान हाय... पण गऱ्यातला गोडवा आन भातातला पावटा गेला त्यो कायमचा... सकाळी सगळं घरातनच करून बाहेर याच..त्यामुळं सकाळची मैफिल संपली..कधी वड्याच्या वाटला गेलोच तर तिथं आता भला मोठा पूल बांधलाय... गवत हाय पण भुंगा काय त्याज्यावर बसल्याला दिसला न्हाय... त्यो कुटं गेला आसल...? पत्र्याची घर जाऊन सिल्याबच्या माड्या आल्या त्याज्यावर वाळवण आजबी हाय मग त्या चिमण्या कुटं गेल्या...? घराच्या कामासाठी कुणीतरी ते आंब्याचं झाड पाडलं त्याज्या फळ्या केल्या... आता त्ये पोपट कुट गेलं..? भर उन्हात कामं करताना सावली शोधायला लागती तवा त्यो आंबा आटवत आसल का माणसांसनी...? गावाचं गावपण आन सगळं पक्षी आपल्याला सोडून, लांब गेलं आपून माणसांत राह्यलो न्हाय का ?

(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी’ या ‘यू ट्यूब’ वरील वेबमालिकेचे लेखक-दिग्दर्शक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Fighter Jet Crash: एअर शोमध्ये मोठा अपघात! भारताचे तेजस लढाऊ विमान कोसळले; थरारक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : आजरा नगर पंचायतसाठी तिरंगी लढत

BIBI-ka-Maqbara: जागोजागी पडझड, सौंदर्य काळवंडले! हेच आहे का वारसा संवर्धन? बीबी-का-मकबरा विचारतोय प्रश्न

Viral Video: बिबट्या ड्रेस घालून नेहा कक्करने अंगावर ओतलं पाणी, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये केलं अस काही की, नेटकरी म्हणाले...'मोगली सेना'

Controversy on Marathi: मराठी न बोलल्याने तरुणाला मारहाण! तणावातून विद्यार्थ्याने जीवन संपवले; ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT