Corona Deathbody
Corona Deathbody Sakal
सप्तरंग

...माज्या दोस्तांना सुखात ठिव

नितीन पवार koripati.production@gmail.com

लहानपणी आय सोडून गिली... तवापासन बानं सांभाळलं... आईच्या वरचं केलं. सगळं घर - दार बघित स्वतःच कामं सुदा केलं... लग्नाच्या वयाचा हुस्तवर कवा मला सोडून राह्यलां न्हाय बाप... कायम काळजाला धरून असायचा... एक दिवस ताप आला म्हणून ॲडमीट केला आन मोटा रोग निगाला... सगळ्या नातेवाईकांसनी फोन केल पण कुणी आलं न्हाय... आता प्रत्येकाच्या जवळच कुणीतरी आजारी हाय... मदत तरी कुणा म्हनुन मागायची.. त्यात जिल्हा बंदी... जाया याची सुदा आडचण हायच की... लय इचार केला आन विशल्याला फोन केला... विशल्या सगळी कामं टाकून हजर झाला... म्हणलं दवाखान्यात ये, आता नगो तरी ऐकलं न्हाय... सगळी काळजी घेत काचेतनं आय सी यु मधल्या पप्पासनी हात दाकवून आला... म्हातारं चार दिवसात आज वाईचंस हासलं हुत... डॉक्टर न बोलवून घेतलं... पैसे भरायला आन इंजक्शन आणायला सांगितलं... इंजक्शन सहजासहजी मिळणार नव्हतं... आम्ही फोनाफोनी सुरु किली... एका जागी हाय म्हणून समजलं...४५ हजाराला एक... तीन लागणार हुती... मी माझ्याकडंच असल्यालं सगळं दवाखान्यात भरलं हुत... तसं १२०० ते १५०० रुपयाला मिळणारं इंजक्शन माणसाला गरज असतांना महाग करणारी माणसच हायत का ? आस वाटायला लागलं...

माणसाच्या मरणाचा धंदा करणारी कीडं पडून मरत कशी न्हायत आस पप्पा रोज म्हणायचं.. आज मलाबी तसेच वाटलं... श्रीमंताचा आजार गरिबाला हू नाय... गरीबाच पोट हातावर असत आन हातावरच्या पोटाला दवाखान्याचं बिल पचत न्हाय... दोगं बाहेर आलो पैशाची जुळवाजुळव किली... मी कमी, विशाल्यांनच केल समदं... रोडचा डबा याचा घरन. रात न दिस त्यो माझ्याबर हुता दवाखान्यात... कुठल्या जन्मीच पुण्य म्हणून आसा दोस्त घावला कुणास ठावक... सगळी नाती फिकी पडत्याल अशी दोसती हुती आमची... सगळी इंजक्शन दिवून म्हातारं वाचलं न्हायंच... प्रेत ताब्यात घेतलं आन गावात आणलं खरं पण खांदा द्याला कोण यणार याजा इचारच केला न्हाय... समद्यासनी जीवाचं भ्या हुत हाक तरी कुणाला मारणार हुतो... बापाला प्लास्टिकमधी गुंडाळल्यालं बघवत नव्हतं... चार इंजेक्शन दिवून सुदा... कुणी म्हटलं इंजेक्शन खोटं हुत... कुणी म्हणलं माणूस बरं हुत... कुणी म्हण डॉक्टरन बघितलं न्हाय तर कुणी म्हण कोरोनाच न्हाय... कोरोना हाय का न्हाय ह्ये डोळ्या देखत बगता बगता सरणावर गेलेल्या... न्हायतर दर्शन न देताच अग्नी दिलेल्या पोराला इचारा...जिचा पोरगा गेला त्या यड्यावानी झाल्याल्या माउलीला इचारा, न्हायतर कायचं चूक नसताना मोकळ कपाळ घिवून उंबऱ्यावर नवऱ्याची वाट बगत असल्याला त्या बायकुला इचारा... कोरोनान त्यांचं काय नेलं ह्ये लक्ख दिसलं तुम्हास्नी...त्यासाठी स्वतःच्या घरातल कुनी जावं दिव नगा...

बराच यळ झाल्यावर दोगबी हतबल झालो... विशल्यानं दोन फोन केल अन लहानपणीच आजून दोन दोस्त आलो... सगळ्यांनी पिपीई किट घातलं आन बापाला खांद्यावर घेतलं तवा मला दोस्त न्हाय एकाच बापाची चार लेकरं वाटलो आम्ही... काय करायला पायजे हुत मी... समोर बापाचं प्रेत जळत हुत आन खांद्याला खांदा लावून माझं दोस्तं उभ हुत... बाप म्हंजी आधारच गेल्यासारखं...

खंबीर साथ गेल्या सारखं, पण कवाच या दोस्तानी बाप गेल्याच जाणवू दिल न्हाय...ही सगळी नसती तर माझ काय झालं आसत... ह्यो दुखाचा वार स्वतःच्या छातीवर झेलणाऱ्या माझ्या दोस्तांच्या पायाची धूळ व्हावंसं वाटतंय... कधी त्येंच्या कामी पडता आलं तर धन्य होईन, म्हणून त्यांच्यावर कवा आसल संकट आणू नगोस, त्यास्नी सुखात ठिव ह्येच मागतो मी देवा... माझ्या दोस्ताला सोबत ठेव..

(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी ’ या ‘यू ट्यब’ वरील बेवमालिकेचे लेखक -दिग्दर्शक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT