actor yatin karyekar sakal
सप्तरंग

सोनेरी स्वप्नं : पप्पा भेटले औरंगजेबाला!

‘पप्पा तोका त्या औरंगजेब बादशहानं आपल्या शिवाजी महाराजांना तीन महिने नजरकैदेत ठेवलं होतं ना?’ लेक असं म्हणत माझ्याकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागला.

नितीन थोरात

‘पप्पा तोका त्या औरंगजेब बादशहानं आपल्या शिवाजी महाराजांना तीन महिने नजरकैदेत ठेवलं होतं ना?’ लेक असं म्हणत माझ्याकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागला.

‘पप्पा तोका त्या औरंगजेब बादशहानं आपल्या शिवाजी महाराजांना तीन महिने नजरकैदेत ठेवलं होतं ना?’ लेक असं म्हणत माझ्याकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागला. मी पटकन त्याच्याकडं पाहत म्हणालो, ‘अरे बाबा, ते अभिनेता यतीन कार्येकर आहेत. त्यांनी फक्त औरंगजेबाचा अभिनय केला होता. चल त्यांना भेटू आपण.’

असं म्हणत मी लेकाचा हात धरला. ‘काय नको’ असं म्हणत त्यानं हात झटकला. मी कुतूलहानं त्याच्याकडं बघत होतो. तो यतीन कार्येकरांकडं रागानेच बघत होता. दोन दिवसांपूर्वी ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाच्या प्रीमिअर शोला जाण्याचा योग आला. अमोल कोल्हे आणि यतीन कार्येकरांच्या अभिनयानं चित्रपट कमालीच्या उंचीवर गेलाय. इंटरव्हल झाला आणि मी लेकाला घेऊन बाहेर आलो. तोच समोर लाल रंगाचा कुर्ता घालून यतीन उभे होते. त्यांना पाहून माझ्या चेहऱ्यावर स्मित उमललं. लेक मात्र त्यांच्याकडं रागानंच बघत होता. मी त्याला समजावलं तरीही तो त्यांना भेटण्यास तयार नव्हता.

शेवटी लेकाला तिथंच थांबवत मी कार्येकरांसमोर गेलो आणि म्हणालो, ‘सर, चित्रपटात तुमचा अभिनय एवढा सुंदर आहे की थिएटरमध्ये तुमचा राग येत होता, पण तुम्हाला प्रत्यक्ष पाहिल्यावर आनंद झाला.’ स्मित करत त्यांनी आभार मानले आणि मी पुन्हा लेकाजवळ आलो. लेक अजूनही कार्येकरांकडं रागानंच बघत होता. काय करावं समजेना. मी हळूच म्हणालो, ‘तुला पॉपकॉर्न खायचे का? तसा तो नाक वाकडं करत म्हणाला, ‘पप्पा, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्यामुळंच आपण आज पिक्चर पाहायला जाऊ शकतो, हे मघाशीच तुम्ही मला सांगत होता आणि तुम्हीच त्या औरंगजेबाला भेटता? मी मम्मीलाच तुमचं नावं सांगणारहे. तुम्ही खूप खोटारडे आहात म्हणून.’

असं म्हणत पोरगा पाय आपटत थिएटरमध्ये गेला. गुमान मान खाली घालून मीही त्याच्या मागोमाग थिएटरमध्ये निघालो. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यावरुन निघाले तेव्हा कुठं ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत लेकाचा राग शांत झाला. नाहीतर काय खरं नव्हतं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT