Diwali Faral sakal
सप्तरंग

सोनेरी स्वप्नं : बेचव आनंदाची श्रीमंती

सकाळी सकाळी तांबरलेल्या केसांचा एक बारका पोऱ्या दारासमोर आला आणि दार आपटत म्हणाला, ‘कायतरी खायला वाढा व माय.’

नितीन थोरात

सकाळी सकाळी तांबरलेल्या केसांचा एक बारका पोऱ्या दारासमोर आला आणि दार आपटत म्हणाला, ‘कायतरी खायला वाढा व माय.’

सकाळी सकाळी तांबरलेल्या केसांचा एक बारका पोऱ्या दारासमोर आला आणि दार आपटत म्हणाला, ‘कायतरी खायला वाढा व माय.’

मुलगा टीव्हीवर कार्टून पाहत बसलेला. दाराबाहेरून आवाज येताच तो खिडकीत आला आणि बाहेर पाहू लागला. मी पेपर वाचतच बसलेलो. खिडकीतून बाहेर पाहिलं. दहा वर्षांचा पोरगा आणि त्याच्या कडेवर एक दोन वर्षांची चिमुकली. हातात स्टीलची कटोरी. तसा मुलगा माझ्याकडं पाहत म्हणाला, ‘यालापण दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या असतील का?’ ‘भुकेला सुट्टी नसते बाळा.’ मी असं म्हणालो, पण त्याच्या डोक्यावरून गेलं. बायकोला आवाज दिला आणि त्या लेकरांना काहीतरी खायला द्यायला सांगितलं. बायकोनं दिवाळीच्या फराळाची एक प्लेट भरली आणि ओट्यावर जात त्या पोराच्या कटोरीत ओतली. लेकराच्या चेहऱ्यावर आनंद नाचू लागला. त्याच्या बहिणीनं पटकन शंकरपाळी घेतली आणि हसत हसत इवल्या इवल्या तोंडात टाकली.

तसे ते दोघंही ओट्यावरच बसले आणि दिवाळी फराळ करू लागले. मी मुलाकडं पाहून विचारलं, ‘तुलाही खायचा का दिवाळी फराळ?’ तसा लेक तोंड वाकडं करत म्हणाला, ‘रोजच खातोय ते.’ ‘मग काय खातो, पोहे, शिरा, मॅगी, पास्ता की उपीट?’ असा प्रश्न विचारताच त्यानं क्षणभर विचार केला आणि ‘द्या काहीपण,’ असं म्हणत टीव्हीसमोर जाऊन बसला. बायकोनं पोहे बनवायला घेतले. ओट्यावर बसलेल्या पोराला पाणी देत मी म्हणालो, ‘तू मॅगी खाल्लीये का रे?’

तसा करंजीचा तुकडा तोडत तो म्हणाला, ‘नाय मी नाय खाल्ली कधी. पण माय म्हणती म्होरल्या जत्रंला गावाला गेलो की तुला मॅगी खाऊ घालते. तवा मी आणि तायडी आम्ही दोघंही मॅगी खाणारहे. कनाय गं तायडे?’ असं म्हणत तो छोट्या बहिणीला गुदगुल्या करू लागला आणि तिही हसू लागली. दोघांनी मनसोक्त हसत पोटभर दिवाळी फराळ केला आणि पाणी पिऊन निघून गेले. थोडा वेळाने पोहे झाले. लेकानं पोह्याची डिश घेतली आणि टीव्हीसमोर बसला.

घरात शांतपणे बसलेला लेक आणि घराबाहेर उधळणारी लेकरं. एकदम विरुद्ध चित्र होतं. आयुष्यात सगळं सहज मिळालं, की आयुष्य रुक्ष होऊ लागतं. कधी कधी काही न मिळणंही आनंद अबाधित राहण्याचं कारण बनून जातं, हे या दोन चित्रांतून जाणवत होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT