Ambabai sakal
सप्तरंग

सोनेरी स्वप्नं : अंबालक्ष्मी भेटल्या!

महिनाभरापूर्वीची गोष्ट. ‘महायोद्धा अंबालक्ष्मी’ कादंबरी लिहायला घेतली होती. बऱ्यापैकी लेखन झालं होतं. संदर्भ म्हणून कोल्हापूर फिरायचं ठरवलं.

नितीन थोरात

महिनाभरापूर्वीची गोष्ट. ‘महायोद्धा अंबालक्ष्मी’ कादंबरी लिहायला घेतली होती. बऱ्यापैकी लेखन झालं होतं. संदर्भ म्हणून कोल्हापूर फिरायचं ठरवलं.

‘महालक्ष्मी संपत्ती देते, तर अंबाबाई आशीर्वाद देते. तुम्हा दोघींना काय पाहिजे?’

मी असा प्रश्न विचारला आणि दोन्ही चिमुरड्या पोरी भुवयांचा आकडा करून माझ्याकडं पाहू लागल्या. त्यांना काय बोलावं तेच समजेना.

महिनाभरापूर्वीची गोष्ट. ‘महायोद्धा अंबालक्ष्मी’ कादंबरी लिहायला घेतली होती. बऱ्यापैकी लेखन झालं होतं. संदर्भ म्हणून कोल्हापूर फिरायचं ठरवलं. सोबत कुणा जोडीदाराला नेलं तर फिरता येणार नाही म्हणून एकटाच एसटीने गेलो. दोन दिवस राहिलो. भरपूर फिरलो. अंबाबाई आणि महालक्ष्मीचे नवनवे पैलू समोर येत होते. कोल्हापूरची अंबाबाई की महालक्ष्मी हा प्रश्न तर सारखाच समोर उभा ठाकायचा. त्यात अंबाबाई गरिबांची देवी आणि लक्ष्मी श्रीमतांची देवी असाही सूर कानावर पडला होता. महालक्ष्मीची पूजा केल्यास धनप्राप्ती होते आणि अंबाबाईची पूजा केल्यास संकट नाहीसं होतं, असंही एका पुजाऱ्याने सांगितलं होतं. कुणाचं खरं कुणाचं खोटं कसलाच मेळ बसत नव्हता.

अखेर अंबालक्ष्मी या दोघीही एकच आहेत आणि त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या भाविकाला दोघीही मातेसमान आहेत, असा निष्कर्ष काढून मी एसटी स्टँडकडं निघालो. तोच वाटेत दोन भिकारी पोरी आडव्या आल्या. एकीच्या हातात वाडगं तर दुसरीच्या कडेवर तान्हं लेकरू. त्या मला वाडगं दाखवत होत्या आणि त्यात चिल्लर टाक म्हणत होत्या. जाता जाता या पोरींच्या नजरेतूनही अंबालक्ष्मी शोधू, असा विचार करत मी त्यांना म्हणालो, ‘ये पोरीओ, महालक्ष्मी संपत्ती देते, तर अंबाबाई आशीर्वाद देते. तुम्हा दोघींना काय पाहिजे?’ मी दोघींच्या तोंडाकडं पाहत होतो. त्या काय उत्तर देतील, याकडं माझं लक्ष लागलं होतं. मोठीने क्षणभर धाकटीकडं पाहिलं आणि बळजबरी स्मित करत म्हणाली, ‘त्याच्यापेक्षा खायला देता का? लय भूक लागलीया,’ तिच्या या उत्तराने काळीजच हादरलं. क्षणात बॅगमधला जेवणाचा डबा काढून तिच्या हातात ठेवला आणि घाम पुसत तरातरा चालत एसटी स्टँडच्या दिशेने निघालो.

संपत्ती आणि आशीर्वादासमोरही भूकच सर्वश्रेष्ठ आहे, या वास्तवाचं भान करून देणाऱ्या जिवंत अंबालक्ष्मी भेटल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT